________________
अध्याय एकुणिसावा. गुणदोपदशिन पो गुणस्तुभयवलित ॥ ४६॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे भगवदुद्धवसवादे एकोनविशोऽध्याय ॥ १९ ॥ ब्रहा एक परिपूर्ण । तेथे केचे दोप कैचे गुण । अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोपलक्षण वाढवी ॥ ७४॥ जो देखों लागे दोपगुण । त्यासी अविद्या क्षोभली जाण । जो न देखे गुणदोपभान । तो ब्रह्मसपन्न उद्धवा ॥७५॥ पराचा देखावा दोपगुण । हाचि दोषामाजी महादोप जाण । गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थी ॥ ७६ ।। ब्रह्मीं नाहींत दोपगुण । हे सर्वांधी सत्य जाण । जो देखे गा दोपगुण । ब्रह्मत्व जाण तेथे नाही ।। ७७॥ जे गुणदोष देखों लागले । त्याचे ब्रह्मत्व कैसेनि गेले । त्यापाशी तें बोस जाहले। की रुसूनि गेले तेथूनी ॥ ७० ॥ जेवीं रविविवा राहु ग्रासी । ते दिवसा देखिजे नक्षत्रासी । तेवीं अविद्या ब्रह्मत्व जै प्राशी । तै गुणदोषांसी देसिजे ॥७९॥ आदरें सागे श्रीकृष्ण । उद्धचा न देखावे दोपगुण । हे माझे जीवीची निजखूण । तुज म्या सपूर्ण सागीतली ॥५०॥ जनी चौन्यायशी लक्षयोनी । त्यांत गुणदोष एके स्थानी । न देखावे मनुष्ययोनी । इतुकेनी नित्यमुक्त ॥८१॥ ह्मणसी स्वाचारपरिपाटी । गुणदोप देखावे दृष्टी । उद्धवा हे गोष्टी खोटी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥ ८२ ॥ निजदोप निरसा. चयाकारणे । स्वधर्मकर्म आचरणे । तेणे जे गुणदोप देखणें । ते नागवी धावणे जैसे जाहलें ॥ ८३ ॥ साळी पिकावया शेती । तृण जाळूनि दोड करिती । तेथ पिकली माळी ज जाळिती । ते तोडी माती पडली की ॥ ८४ ॥ व्हावया दोपनिवृत्ती । वेद धोतिली धर्मप्रवृत्ती । तेणें स्वधर्म जै दोष देखती । ते निजप्राप्ती नागवले ।। ८५ ॥ जेवी का सोगें नटनटी । दाविती हावभान नाना गोठी । परी तो भाव नाही त्याचे पोटी । स्वधर्म त्या दृष्टी करावा ॥ ८६ ॥ न देखोनि दोपगुण । स्वधर्ममर्यादा नोसडून । करावे गा स्वधमांचरण । हे मुख्य लक्षण कर्माचें ॥८७॥ ऐशिया स्वधर्मगती । कर्ममळ नि शेष जाती। साधका निजपदमाप्ती । गुणदोपस्थिती साडिता ॥ ८८॥ गुणदोष देहाचे ठायीं । आत्मा नित्य विदेही । गणदोष त्याच्या ठायीं। सर्वथा नाही उद्धवा ।। ८९ ॥ साधन देखाचा दोपगुण । सिद्धासी सहजचि नाहीं जाण । जरी दिसो लागले दोपगुण । तरी आली नागवण दोघासी ॥ ५९० ॥ साधकाची प्राठि बुडे । सिद्धाची सिद्धि तत्काळ उडे । एप गुणदोपाचे साकडें । दोहींकडे उद्धवा ।। ९१ ॥ गुणदोपी भरली सृष्टी । तेथ न ठेवावी निजद्दष्टी। हे कळवळोनिया पोटी। श्रीकृष्णे गोष्टी सागीतली ॥ ९२ ॥ गुणटोप विविधभेद । ऐसे आहेत निपिद्ध । तरी का पा स्वमुखें गोविद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥९॥ येचि अर्थांचा प्रश्न । पुढे उद्धव करील जाण । तेंचि व्यासाचे निरूपण । विसावा जाण जीवशिवा ।।९४॥ तेथ सकाम आणि निष्काम भक्त । याचे अधिकार अभिव्यकं । स्वयें सागेल भगवंत । कथा अद्भुत ते आहे ।। ९५ ॥ सतर्ता द्यावे अवधान । श्रोता व्हावें सावधान ! एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढे आहे ॥ ५९६ ॥ इति श्रीभागयते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकाया भगवदुखवसवादे एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ।। अध्याय ॥ १९ ॥ श्लोक || ४६ ॥ ओव्या ।। ५९६ ॥ १ साम्यावस्था दळली की २ शून्य ३ खपाचारापाठी ४ भात ५ जमिनीची मानावळ, रोपायपिटी ७ मुकरे, फसरे ८ न सोडता ९सकट १० स्पर