Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/506

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. तीतें भक्त चतुर्धा मानिती । अधिकारस्थितिविभागें ॥२८०॥ भक्त कल्पनेचिया भ्रांती। माझी भक्ति चतुर्धा मानिती । ते मिथ्या गा वदंती । माझी निजभक्ती ऐकली ॥ ८१॥ ऐशिये निजभक्तीची प्राप्ती । आत्मनिवेदनाची स्थिती । उद्धया म्या तुजप्रती । यथानिगुती निलंपिली ॥ ८२ ॥ माझिये निजभक्तीचे सार । भक्त पावले जे साचार । त्याचे सर्वही व्यापार । मैंदाकार होऊनि ठाकती ॥ ८३ ॥ तो जेउती वास पाहे । ते दिशाचि मी होऊनि ठायें । तो जेउतें चालत पायें । ते धरा मी होयें धराधर ॥ ८४ ॥ तो करूं बैसल्या भोजन । पड़स होय मी आपण । त्यासी करावया प्राशन । निजजीवन मी होयें ॥ ८५ ॥ त्यासी चालतां निजपदी। बोधे श्याची निवारी मोदी । शांति पायघड्या घाली आधी । करी पदोपदी निंबलोण ॥८६॥ शम दम आज्ञाधारी । हात जोडूनि उभे द्वारीं । ऋद्धिसिद्धी दासी घरीं । विवेक कामारी घरीच सदा ।। ८७॥ त्याचा बैसता अवकाश । अगें मी होय हपीकेश । तो निजावया सावकाश । समाधि मी त्यास आथुरीं ॥ ८८॥ तो जे काही बोल बोले । तें निःशब्द ब्रह्म शब्दा आले । यालागी श्रोत्यांसी वहिले । होय भले समाधान ॥ ८९ ।। तो अवलीला वोले वोठी । शब्दासवे माझी गोठी उठी । श्रोत्याची तेथ पडे "मिठी । स्वभावे गोठी ऐकता ॥२९०॥ चढता परेचे उपरी । वैकुंठ कैलास पायरी । उन्मनी घालोनि बाहेरी । सुखशेजारी तो पहुडे ॥९१ ॥ मिळोनिया मुक्ती चारी । पाणी वाहती त्याच्या घरी । श्रीसहित रावें मी श्रीहरी । येराची थोरी कोण पुसे ॥१२॥ अवचटें ये त्याच्या मुखासी । ह्मणे ज्यासी तूं उद्धरलासी । तो माथां वाहे मी हपीकेशी । शब्द निजधामासी पाठवीं वेगीं ॥ ९३ ॥ जे पावले माझी सहज. भक्ती । त्याचे लळे पाळी मी या रीती । त्यांची मज अनन्य प्रीती । सांगों किती उद्धवा ॥९४ ॥ बहुत बोली काय कारण । मी देहो तो आत्मा जाण । तो माझा जीवप्राण । हे जाणती खूण निजभक्त ॥ ९५ ॥ नादता सहजभक्तिआत । मी देवो तो माझा भक्त । येरवी मी सगळा त्याआंत । तो समस्त मजमाजी ॥ ९६ ॥ निजभक्त मजभीतरी । मी तया आतबाहेरी । ऐसें सामरस्य नांदों भारी । वेगळे वाहेरी नाममात्रे ॥ ९७ ॥ माझिया सायुज्या जे आले । ते मीचि होऊनिया ठेले । परी मी होऊनि मज भजले । ते भक्त मानिले म्या ऐसे ।। ९८ ॥ सायुज्यापरीस भक्ति गोड । याचि निरूपणाचे कोड । उद्धवा तुझी जाणोनि चाड । विशद निवाड सागीतला ॥ ९९ ॥ ऐशिया माझ्या निजभक्तांसी । अवशेप अर्थ नुरेचि त्यासी । मी तुष्टलों गा हपीकेशी । निजभावासी सर्वस्वे ।। ३०० ।। भक्तिप्राधान्य भागवतशास्त्र । तें भक्तीचे निजसार । तुज मी सागीतले साचार । अत्यादरपूर्वक ॥१॥ उद्धवा तुझे प्रीतीचेनि व्याजे । मज गुह्याचे निजगुह्य हे जे । ते भक्तीचे करूनिया खाजें । तुज म्या वोजें दीधले ॥२॥ म्या सागीतले जैशा रीतीं । तैशी सेवावी माझी निजभक्ती। ऐसे बोलतां श्रीपती । उद्धव प्रीती उचलिला ॥३॥ मागा टाकूनि पीतावरें । साडोनियां शंखचक्रं । उद्धव 'उचलिला श्रीधरे । तरी प्रेम न १ वाता, पोष्ट २ एकटी ३ निवेदिली ४ मद्रूप ५ जिक्टे ६ राहतो ७ पृथ्वीचा घारक ८ पाणी ९ समूह १० सेयक, कर्मकरी, कामारी, असा हा शब्द आला आहे, काम करणारा चाकर ११ शीघ्र, तात्काळ १२.सहज तीन हातात १३ परा वाचेच्या पलीकडे १४ चौथी अवस्था १५ चैकुठी -१६ लाड १७ निर्णय १८ साऊ, मेवा