________________
अध्याय अठरावा जिणे निमाले ।। ५५ ।। सकल्पू निर्मताचि पोटीं । विराली लिंगदेहाची गोंठी । भेदाची हारपली त्रिपुटी । मी परमात्मा दिठी देखतां ॥५६॥ ज्यासी नाही भेदाचे भान । त्याचे देहाचे भरणपोपण । मानमोजन शयन । गमनागमन केवीं घडे ॥ ५७ ॥ जो जिणीनियां विकल्पभ्राती। त्रिशुद्धी मिसळला अद्वैती । त्याचे देहाची स्थितिगती। प्रारब्धाहाती निश्चित ॥ ५८ ॥ वृक्ष समूळ उपडलिया पाहें । परी सार्द्रता वृक्षी राहे । तावूल साऊनिया जाये । तरी अधरी राहे सुरंगता ॥ ५९॥ हो का कन्यादान केल्या पाहें। बरू कन्याही घेऊनि जाये । तरी उगा मान उरला राहे । रुसणे फुगणे न जाय देहात ॥२६०॥ तैसा अभिमानाचेनि सकें । मी कर्मकर्ता ह्मणवी बळें । ते अहंता निमे ज्ञानपवळे । तरी शरीर चळे प्रारब्धं ॥ ६१॥ कुलाल दंड भांडे घेऊनि जाये । पूर्वभवंडी चक्र भवत राहे । तेवीं अभिमान गेलिया पाह। देह वर्तताहे प्रारब्धे ।। ६२ ।। स्या देहाचे भरणपोपण । प्रारब्धचि करितें जाण । ज्ञात्यासी प्रपचाचे भान | सत्यत्वे जाण असेना ।। ६३ ।। जैशी मिथ्या छाया देहापाशी । तैसा देह दिसे सज़ानासी । यालागी देहबुद्धी त्यासी । सत्यत्वेसी उपजेना ॥ ६४ ॥ छाया सुखासनामाजी वैसे । का विठेवरी पडली दिसे त्या छायेचे अभिमानवशे । सुखदास नसे पुरुपासी॥६५॥तेची देहाची ख्यातिविपत्ती । वाधीना सज्ञानाचे स्थितीं । प्रारब्धक्षयाचे अर्ती । विदेह पावती कैवल्य ।। ६६ ।। जैशी जळाची लहरी । निश्चळ होय सागरी । तैसा ज्ञाता मजमाझारी । विदेह करी समरसे ।। ६७ ॥ उगम संगम प्रवाहगती । सरितेची नामरूपख्याती। जेवीं प्रळयोदकी हारपती । तेवीं समरसती मजमाजी ज्ञाते ।। ६८ ॥ अपरोक्षसाक्षात्कार सन्यासी । त्याची स्थितिगति स्वधर्मसी । उद्धया सागीतली तजपाशी आता ममक्ष सन्यासी ते ऐक॥६९।। दु खोदकेषु कामेषु जातनिषेद भारमवान् । अविज्ञामितमद्धर्मो गुरु मुनिमुपानजेत ॥ ३८ ॥ शेडी धरूनि समूले । ज्याचे उत्तरोत्तर दु.ख फळ । अतिवाधक विषयजाळ । त्यासी केवळ जो अनासक्त ॥ २७० ॥ माझे प्राप्तीलागी चित्त । सदा ज्याचे आभूत । स्वधर्मकी वर्तत । जो वेदशास्त्रार्थ विवची ॥७१ ॥ इहामुत्रभोगी निश्चित । त्रासले असे ज्याचे चित्त । ऐसा जो का नित्य विरक्त । अतिविख्यात मुमुक्षु ।। ७२ ॥ तेणे साधावया ब्रह्मज्ञान । तेचि साधनी लाविता मन । स्वकर्म झौलिया विलक्षण । आली नागवण प्रत्ययायाची ॥ ७३ ।। तेणे कर्म सन्यासोनि जाण । करावे सन्यासग्रहण । सद्गुरूसी रिधाव शरणतेणे ब्रह्माज्ञानपरमाप्ती ॥ ७४ ॥ एक केवळ भावार्थी नेणे स्वधर्मकर्मगती। नेणे शास्त्रश्रवणव्युत्पत्ती । परी माझी प्रीती अनिवार ।। ७५ ॥ तेणेही सन्यासूनि जाण | गुरूसी रिघावे शरण । त्यासीही गुरुकृपा जाण । ब्रह्मज्ञानअवाप्ति ॥७६ ॥ गुरु करावा अतिशात । शास्त्रार्थपरमार्थपारगत । त्याचे सेवेचा भावार्थ । स्वयं श्रीकृष्णनाथ सागत।। ७७॥ १जिराल्यापर २ वासनात्मक शरीराची प्रथि, वासनांचे बधम ३ दृष्टी ४ चरितार्थ ५निंबून ६ सर्वस्वी भारे पणा ८ सालच्या ठिावर १ लाली १० पुसणे होये देहात ११ छळान, त्रास १२ नष्ट होते २ हालचाल फरते १४ पूर्वी मिळालेल्या भ्रमणुगतान १५ सुसदु स, प्रतिष्ठा किंवा फ्जीति १६ शुद्ध ग्रहाखरूप १७ देहबुद्धीच्या टप्प्यातून निघून माझ्याशी एकरूप होतो १८ नदीची १९ खारामवी २० मोक्षेच्छु २१ मारभापासून अमेरपर्यंत २० प्रबळ २३ उत्सुक २४ ऐहिक व पारनिक सुखभोगाविषयाँ २५ यथासाग शार नाही तर २६ दोषाचा गोता येतो २७ विधिपूर्वक टाकन २८ अति शीत्र २९ परोक्ष य अपरोक्ष शान ज्याला आहे असा, "शाध्दे परे च निष्णात'.