पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/486

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥ ३५ ॥ आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म । दैवाधीन जाणे वर्म । निजकर्मप्राप्तीसी ॥३६॥ एवं प्राप्ताप्राप्ताची कथा । जाणे देवाधीन तत्त्वतां । यालागी हर्षविषादता । त्याचे चित्ता स्पर्शेना ॥ ३७॥ दैवाधीन प्राप्ती प्राणियासी । ऐसे सत्य कळले त्यासी । तै भिक्षेसी का हिडणे ह्मणसी । तेचि हपीकेशी सांगत ॥ ३८ ॥ ___आहारार्थ समीहेत युक्त तत्प्रागधारणम् । तर विमृश्यते तेन तद्विज्ञाय विमुच्यते ॥ ३५ ॥ पाळावया आश्रमधर्मासी । अवश्य हिंडावे भिक्षेसी । मधुकरी संन्याशांसी । स्वध. मासी अतिविहित ॥ ३९ ॥ साधकां तरी आहारार्थ । अवश्य हिडावे लागे येथ । आहा- रेंवीण त्यांचे चित्त । विक्षेपभूत हो पाहे ॥ २४० ॥ तिही रसासक्ति सांडून । भिक्षेसी करावा प्रयत्त । आहारेंवीण त्यांचे मन । अतिक्षीण सर्वार्थी ॥४१॥ साधकासी आहारेंवीण । न सभवे श्रवण मनन । न करवे ध्यान चितन । अनुसधान राहेना ॥ ४२ ॥ संन्याशांसी ध्यान न घडे । तै आश्रमधर्माचे तारूं वुडे । यालागी भिक्षेसी रोकडें । हिडणे घडे हितार्थ ॥४३॥ मिळावे मिष्टान्न गोड । हे सांडोनि रसनाचाड । करावे भिक्षेचे कोड । परमार्थ दृढ साधावा ॥४४॥ आहार घेतलिया जाण । साधकांसी घडे साधन । साधन करिता प्रकटे ज्ञान । ज्ञानास्तव जाण निजमोक्ष लाभे ॥ ४५ ॥ सर्वथा न वांछावे मिष्टान्न । तरी भिक्षा मागावी कोण । ऐसे कांही कल्पील मन । तेचि श्रीकृष्ण सागत ॥ ४६॥ ____ यदृच्छयोपपनानमधाच्छेएमुताऽपरम् । यथा चासम्तथा शारया प्राप्त प्राप्त भजेन्मुनि ॥ ३५ ॥ सहज भिक्षेसी आले जाण । शुष्क अथवा मिष्टान्न । तेणे करावे प्राणधारण । रसनालालन सांडोनी ॥४७॥ निद्रालस्याचें न ये प्रस्थान । तैसें करावे प्राणधारण । दृढ - ठसावे आसनध्यान । युक्ताहार जाण या नाय ।। ४८ ॥ वल्कल अथवा अजिन । नवे अथवा वस्त्र जीर्ण । सहजे प्राप्त झाल्या जाण । करी प्रावरण यथासुखें ॥४९ ।। कथा हो का मृदु आस्तरण । तृणशय्या का भूमिशयन । स्वभावे प्राप्त झाल्या जाण । तेथही शयन करी मुनि ॥२५० ॥ मी एक भोक्ता शयनकर्ता । हेही नाही त्यासी अहंता । स्नानादि कर्मी तत्त्वता । त्याची निरभिमानता हरि सांगे ॥५१॥ शौचमाचमन मान न तु चोदनया चरेत् । अन्याश्च नियमान ज्ञानी यथाऽह लीरयेश्वर ॥ ३६॥ आचमन स्नान शौचाचार । करितां नव्हे विधिकिंकर । कर्माभिमानाचा मोडला थार । जैसा मी अवतार तैसा तो ॥ ५२ ॥ जैसा मी लीलावतार धरी । अलिप्तपणे कर्म करी । तैसीचि जाण योग्याची परी । सर्व कर्माचारी अलिप्त ॥५३ ॥ ज्यासी विधीचे भय नाही पोटी । तो कम करावया कदा नुठी । "तेचिविखींची विशद गोठी । कृष्ण जगजेठी सागत ॥५४ ।। न हि तस्य विकल्पारया या च मदीक्षया हता। आदेहान्ताताचिग्यातिस्तत सपधते मया ॥ ३७ ।। कर्म करणे न करणे । ऐशिया संदेहाचे ठाणे । पळाले माझेनि दर्शने । सकल्पाचे हर्ष पावत नाही २ चित्तत्ति ३ प्रार धानुसार ४ आनद व खेद ५ चचल, अस्थिर ६ इट पदाथाची लाल ७ सयध ८ जिमेची भावद ९ रुक्ष, निग्ध व सात्विक व्हे ते १० झोप व आळस याच ११ नमस्त भोजन । १२ मृगचर्म १३ भाच्छादा १४ गोचडी १५ भागबण, निशा १६ देही १७ मलमूनत्यागाने देहशुद्धी १८ आभार १९ त्याविषयाची