पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/480

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७० एकनाथी भागवत. उंछ का कोरान्न । अयाचित कां अध्यापन । अथवा याजन जीविकेसी ॥७॥ जो जीविकेलागी निर्धारीं । शस्त्र घेऊनियां करीं । शूरवृत्तीं जीविका करी । जाणावा क्षत्री ब्राह्मणामाजी तो ॥ ८॥ जो वाणिज्यवृत्तीवरी । नित्य जीविका आपुली करी । तो ब्राह्मणांमाझारी । वैश्य निर्धारी निश्चित ॥९॥ जो शूद्राचे शुद्रक्रियेवरी । सदा सर्वदा जीविका करी । तो ब्राह्मण शूद्रक, करी । शुद्रत्वधारी क्रियायोगें ॥ ११० ॥ जे उत्तमोत्तम मिक्षा न लभे । तै क्षत्रियब्राह्मणी भिक्षा लाभे । क्षात्रब्राह्मणांचेनि अला) । वैश्यादि ब्राह्मणी लाभे भिक्षाग्रहण ॥११॥ ब्राह्मणक्षत्रियवैश्यब्राह्मणी । भिक्षेस अप्राप्त हे तिनी। ते शूद्रजीविकाब्राह्मणी । भिक्षाग्रहणी अधिकारू ॥१२॥ यात निंद्य जे ब्राह्मणाआंतू । केवळ दोपी अथवा अभिशप्त । ते भिक्षेसी न लावा हातू । हा स्वधर्मायूं भिक्षेचा ॥१३॥ तेही भिक्षा अतिनेमस्त । भिक्षेसी येतो हे कळों नेदित । मागावी मविली घरें सात । जे भाले प्राप्त तेणे सुसी ॥ १४ ॥ जे साता घरी भिक्षा प्राप्त । ते भिक्षेचा धर्म विहित । स्वयें सागे श्रीकृष्णनाथ । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥ १५ ॥ बहिर्जलाशय गत्वा तमोपस्पृश्य वाग्यत । विभज्य पावित शेष भुञ्जीताऽशेषमातम् ॥ १९ ॥ ग्रामावाहेर गंगातीरीं । अथवा तडागाचे परिसैरी । भिक्षा धरोनियां करी । आचमन तीरी करावे ॥ १६ ॥ याचित जे भिक्षेचे अन्न । ते द्वादशप्रणवें अभिमंचून । तेणे मनोदके प्रोक्षिता जाण । होय पावन पवित्र ।। १७ ॥ चतुर्धा करावे त्या अन्नातें । चार अधिकारी त्या भागाते । ब्रह्मा विष्णु अर्क आणि भूतें । अर्पण तेथें अवधारी ॥ १८ ॥ विष्णुकल्पित जो भाग । तो जळी घालावा सांग । भूतकल्पित जो विभाग । तो पृथ्वीवरी चाग ठेवावा ॥ १९ ॥ उरले जे विभाग दोनी । यतीसी अधिकार सेवनीं । दीन मागों आलिया ते क्षणी । भूतदयागुणी अन्न द्यावे ॥ १२० ॥ परी मी एक अन्नदाता । हे आठवोहि नये चित्ता । आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता सन्यासी ॥ २१ ॥ मधुकरीचे अवघड चिह्न । समयीं मागो येतां दीन । येणे उद्देशे अधिक अन्न । सर्वथा जाण मागों नये ॥ २२॥ करिता मधुकरीभोजन । अधिक उरलिया अन्न । ते साडितां अतिपतन । अवघेच जाण भक्षावे ॥ २३ ॥ सन्यासधर्मी लघु आहार । नित्य करावा निरतर । अधिक आहारी विकार । निद्रा आळस फार बाधिती ॥ २४ ॥ ज्यालागी कीजे चतुर्थाश्रम । तो सन्याशाचा मुख्य धर्म । स्वयें सागे पुरुषोत्तम । जेणे आत्माराम पाविजे ॥२५॥ ___ एकश्चरेन्महीमेतां नि सङ्गः सयतेन्द्रिय । आत्मक्रीड आरमरत आरमवान् समदर्शन ॥ २० ॥ सदा वैराग्य अगी पुरते । जो अपेक्षीना सांगात्यांते । निःसग होत्साता चित्तें । सुर्खे पृथ्वीते विचरतू॥२६॥ इंद्रियें बाधोनि चित्ताच्या पायीं । चित्त लावी चैतन्याच्या ठायी । तेणे चिन्मान ठसावे पाही। देहत्व देही स्मरेना ॥२७॥ ऐसा आत्मस्थितीचा उधमातण आस्मक्रीडेचा आराम | आत्मसुखाचा सभ्रम । अनुभव परम तो ऐक ।। २८ ॥ आत्म १शुद्धत्व धरी २क्षत्रियवृत्ती राहणाऱ्या ब्राह्मणाचे घरी ३ ज्याच्यावर काही अपवाद आहे असे ४ मजिकी। ५सलावाचे किंवा नदीचे कोठी ६ अयाचित. ७ बारा प्रणनमन जपून. ८ या हेतूने ९ सोबत्याला