पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत रूपी ॥ ४९ ॥ श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी । रसस्वादु रसना न सोडी । जाये चाखणेपणाची आवडी । चाखणे दवडी चाखोनी ॥ २५० ॥ नवल तेथींचे गोडपण । अमृतही फिर्के केले जाण । यापरी रसना आपण । हरिरसी संपूर्ण सुखावे॥५१॥लागतां श्रीकृष्णसुवावो । अवघा ससारुचि होय वावो । सेविता श्रीकृष्णसुगंधवायो। प्राणासि पाहावो आन नावडे ॥५२॥वासु सुवासुसुमन घेय माता आणि प्राण कृष्णमकरदें जाण । विश्रामा सपूर्ण स्वयें येती ॥५३॥ जयाचेनि अंगस्पर्शे । देह देही देहपण नासे । अंगचि अंगात कैसे । विसरे आपैसे देहबुद्धी ।। ५४ ॥ कठिणाचें कठिणपण गेले । मृदूचे मृदुपणही नेले । कृष्णस्पर्श ऐसे केले। स्पर्शाचे ठेले स्पर्शत्व ॥ ५५ ॥ तयाचेनि पठणे घाचा । ठावो वाच्यवाचकांचा । नेतिशब्द पुसोनि साचा । करी शब्दाचा निःशब्दू ।। ५६ ॥ वोलू बोलणेचि ठेले । बोलतें नेणों काय झाले । कृष्णशब्दें ऐसे केलें । वौच्याने नेले वाचिक ॥ ५७ ॥ चित्त चिंतितांच पाये। चित्तपणा विसरोनि जाये । मग निश्चितपणे पाहे । कृष्णचरणी राह निवांत ।। ५८ ॥ चित्त चिंता चितन । तिहींची नुरे आठवण । चिंतितांचि श्रीकृष्णचरण । ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त ॥५९॥ नवल तयाचा पर्दक्रम । पाहता पारुपे कर्माकर्म । मग कर्म कर्ता क्रियाभ्रम । करी निर्धम पदरजे॥२६०॥पाहतां पाउलांचा माग । तुटती कर्माकर्माचे लोग । कर्माचे मुख्य माया अंग । तिचा विभाग उरों नेदी ॥ ६१ ॥ गाईमागिल कृष्णपाउले । पाहता कर्म कर्तेनिसी गेलें । अकर्म ह्मणणे नाही उरले । ऐसे कर्म केले निष्कर्म ॥ १२॥ जयाचेनि कीर्तिश्रवणे । श्रोता नुरे श्रोतेपणे । वक्ता पारुपे वक्तेपणे । श्रवणे पावणे परब्रह्म ।। ६३ ॥ __ आरिछय कीति सुश्लोका वितत्य राजसा नु को । तमोऽनया तरिष्यतीत्यगास्व पदमीश्वर ॥ ७ ॥ यापरी उदारकीर्ती । थोर केली अवतारख्याती। जेणे जड जीव उद्धरती । श्रवणे निजगती पावन होये ॥ ६४ ॥ स्वधामा गेलिया चक्रधरू । मागां तरावया ससारू । कृष्णकीर्ति सुगम तारूं । ठेवूनि श्रीधरू स्वयें गेला ।। ६५ ॥ नवल त्या तारुवाची स्थिती । वुडवू नेणे कल्पांती । श्रवणे तरले नेणों किती । पुढेंही तरती श्रद्धाळू ॥६६॥ श्रीकृष्णकीती, तारूं । घालितां आटे भवसागरू । तेथे कोरड्या पाउलीं उतारू । श्रवणार्थी नरू स्वयें लाहे ॥६७ ॥ जे कृष्णकीर्ति करिती पठण । त्याच्या ससारासि पडे शून्य । कीर्तिवंत ते अतिपावन । त्यांतें सुरगण वंदिती ॥ ६८ ॥ आदरें पढता श्रीकृष्णकीती । पायां लागती चारी मुक्ती । त्याचेनि पावन त्रिजगती । परमनिवृत्ति हरिनामें ।।६९॥ श्रीकृष्णकीर्ति नामाक्षरें। रिघतांचि श्रवणद्वारें । भीतरील तम एकसरें। निघे बाहेरें गजबजोनी ॥२७०॥ तंव कृष्णकीर्तिकथागजरी । तमासि ठावो नुरेचि वाहेरी । धार्केचि निमे सपरिवारी । कृष्णकीर्तिमाझारी परमानंदु ॥ ७१॥ कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशे । ससार कृष्णमय दिसे । कीर्ति कीर्तिमताऐसे । दे अनायासे निजसुख ॥ ७२ ॥ जो देखिलिया देखणे सरे । जो चालिसा चाखेणे पुरे । जो ऐकिलिया ऐकणे वोसरे । जो चिंतिती नुरे चित्तवृत्ति ॥ ७३ ॥ ज्यासी झालिया भेटी । भेटीसी न पडे तुटी । ज्यासीं वोलता गोठी । पडे मिठी परमार्थी ॥७४॥ ज्यासि दिधलिया खेव ।खेवाची पुरे हाव । ज्याचें घेतांचि नाव ।नासे सर्व महाभय ॥७५॥ जो जाणे चासणेपणाची गोडी २ चाखते ३ श्रीकृष्यरूपी अनुकूल वायु ४ देहपणे नसे ५ वाचर्ने वाचकत्व ६ पावलट, पराक्रम ७ राहे, खुटे ८ पाउलाचे भाग ९ वध, सबध १० कासक्ट निवति १२ पाहाणे १३ खादणे १४ ऐकण्याचे १५ चितिलिया मुरे. १६ आलिंगन