Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/476

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६६ एकनाथी भागवत आकाशवासी । चर्पाकाळी ऐसी तपप्राप्ती ॥ २६ ॥ आलिया 'हेमंतमतूसी । आकंठमग्न जळवासी । जळवास करावा अहर्निशीं । हे वानप्रस्थासी तपक्रिया ॥ २७ ॥ हे तपक्रिया प्रतिवरुपी । विहित वानप्रस्थासी । वयसापरत्वे भक्षणासी । हपीकेशी सांगत ॥ २८ ॥ ___ अग्निपक समझीयारकालपरमथापि या । उलुखलाइमकुष्टो पा दन्तोलगर एव वा ॥ ५ ॥ अग्नीस्तव पाका आली । का का. जी परिपक्व झाली । ती तापसालागी भली । आहारी विहिली उदरार्थ ॥ २९ ॥ दांत असलिया वळी । फळे खावी तेणें सगळी । कां गेलिया दात समूळीं । कांडूनि उखळी सुखें खावीं ॥ ३०॥ जरी उखळ न मिळे वनीं । तरी खावी दगडे ठेचुनी । नाहीं चाड गोडपणी । क्षुधानिवारणी आहारार्थ ॥ ३१ ॥ वय मचिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम् । देशकार यलाभिज्ञो नाददातान्यदाहतम् ॥ ६ ॥ ऋतुकाळी फळे सपूर्ण । ती कालांतराकारणे । सग्रहो सर्वथा न करणे । व्रता धारणे वनस्था ॥ ३२॥ पूर्वदिवसी फळे आणिली । अपरदिवसीं जरी उरली । ती अवश्य पाहिजे त्यागिली । नाही बोलिली आहारार्थ ॥ ३३ ॥ प्रेत्यही आहारार्थ जाण । फळे आणावीं नूतन । "जीर्ण फळाचे भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥ ३४ ॥ आणि फळे जी आणिली । ती अंगीकारा निपिद्ध झाली । जी स्वकप्टें अर्जिली । ती पहिली आहारार्थ ॥ ३५ ॥ देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळले ज्ञान । तरी संग्रह न करावा जाण । अहधारण निर्धारें ॥३६॥ पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण । प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥ ३७॥ यन्येश्वरपुरोडाशैनिर्यपेस्कालनोदितात् । न तु श्रातेन पशुना मा यजेत वनाश्रमी ॥ ७ ॥ जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत । त्यासी अग्निहोत्र झाले प्राप्त । तेव्हा कर्म जें वेदोक्त । तें करावें समस्त वनवासी ॥ ३८॥ धनी जी फळे ज्या ऋतूंस । तोचि कल्पावा चरुपुरोडाश। तेणे यजावा मी यज्ञपुरुष । सावकाश मंत्रोक्त ॥ ३९ ॥ परी श्रौतकर्मविधान । यागार्थ पशुहनन । तें वानप्रस्थासी नाही जाण । वनफळी यजन यागाचें ॥४०॥ अग्निहोत्र च दर्शश्च पूर्णमामश्च पूर्ववत् । चातुर्मास्याी च मुनेरामातानि च नैगमै ॥८॥ पूर्वी अग्निहोत्रक, जैशीं । गृही होती गृहस्थासी । तीचि चालवावी वनवासीं । वेदाज्ञेसी चनस्थे ॥ ४१ ॥ आम्नायें आगमनिगमांसी । जाणोनि करावे यागासी । दर्शपौर्णमासचातुर्मास्यांसी । निष्कामतेसी वेदाज्ञा ॥४२॥ ऐसा मुनीश्वर वनवासी । तपस्वी तेजोराशी । त्याचिये फळप्राप्तीसी । स्वयें हपीकेशी सागत ॥४३॥ एवं चीर्णन तपसा मुनिर्धमनिमन्तत 1 मा तपोमयमाराध्य ऋपिलोकादुपैति माम् ॥ ९॥ ऐसे वेदोक्त तप साचार । आस्तिक्यभावें अत्यादर । साक्षेप करितां निरंतर। अस्थिमात्र देह उरे ॥४४॥ शुष्कशरीरपंजरा । त्वचेने झांकिलिया शिरा । परी सामथ्र्य आत खरा । न.सरे माधारा तपोनिष्ठे ॥ ४५ ॥ ऐसे यावज्जन्म करिता तप । तो सवाह्य झाला १हिवाळ्यात २ तपश्चर्या ३ दरवपी ४ या मतपरत्वे होणा-या रतांना पचामिसाधा, सनावकाश, व उदकवास, अशा अनुम्म नाव आहेत ५ योग्य आहेत इयनकट ७ दसया काळासाठी ८ दुसन्या दिवशी १ दराज १० दिया ११ दुसयानी १२ यथार्थ १३ दान घेणे १४ वेदात सांगितलेल्या विधीन १५ मिहीन, दश, पूर्णमास, थ चातुर्मास्ये, ही कम चालवावीत १६ वैदिक किया १७ भद्धापूर्वक १८ पिंजरा आतील मास सुकून जाऊन अगायर शिरांच जाळें राहिएं । ।