________________
४६४ एकनाथी भागवत हृदयाआंत मोहित ॥ २६ ॥ त्या मोहाचे मोहविधी । मूढ जाहली हृदयबुद्धी । ऐसा निमालो जो त्रिशुद्धी । तो प्रवेशे अंधी महातमी ॥ २७ ॥ ज्या तमाचेनि महावळे । ज्ञान होऊनि ठोके आंधळें । तेथ सूर्याचे फुटती डोळे । ते ती लोळे तो तामसू ॥ २८ ॥ ज्या तमापासूनि उपरती । हों नेणे गा कल्पांतीं । त्या अंधतमातें पावती । मूढमति अतिमंद ॥२९॥ महामोहाचे परिपाटी । नश्वर विपयासाठी । चुकोनि अनंतसुखाची पुष्टी। दुःखकोटी भोगिती ॥ ५३०॥ यालागी मनुष्यदेही जाण । करोनियां भगवद्भजन । चुकवावे जन्ममरण । आपणा आपण उद्धरावे ॥३१॥ जीवा जे जे योनी जन्मगती । तेथ तेथ विपयासक्ती । तेचि मनुष्यदेहीं विपयस्थिती । तै परमार्थप्राप्ती कोणे देही ॥ ३२ ॥ विशेषे उत्तमोत्तम । प्राप्त जाहल्या ब्राह्मणजन्म । ज्याचे नित्यकर्मों परब्रह्म । अतिसुगम सहजचि ॥ ३३ ॥ ज्यासी चर्ततां अहोरातीं। संध्यावंदनविधानस्थिती । त्रिकाळ पापाची निवृत्ती । जाण निश्चिती ब्राह्मणा ॥ ३४ ॥ सकळ साराची सारमूर्ती । तो गायत्री मंत्र ज्याचे हातीं । वेद मुखाची वास पाहती । एवढी प्राप्ती ब्राह्मणा ॥ ३५ ॥ ब्राह्मणांचे हृदयी जाण । वेदरूपें नारायण । स्वयें राहिला आपण । धन्य ब्राह्मण निलोकीं ॥ ३६ ।। ज्या ब्राह्मणासी सदा जाण । गिरी वंदिती सुरगण । ज्या ब्राह्मणाचा श्रीचरण । स्वये नारायण हृदयीं वाहे ॥ ३७॥ जयाअंगी एक रती । पाप न राहे सध्येहाती । यालागी ब्राह्मण पुण्यमूर्ती । स्वये रमापति बोलिला ॥ ३८ ॥ ज्याची भगवंत करी'वर्णना । 'किं पुनोंह्मणाः पुण्याः' त्या भगवद्गीतावचना । सत्यत्व जाणा या हेतू ॥ ३९ ॥ ब्राह्मण आणि भगवद्भक्त । तै सकळ भाग्य आले तेथ । त्यासी कोण अर्थ ,अप्राप्त, ज्याचे वोलात हरि तिष्ठे ॥ ५४० ॥ ते काठपापाणप्रतिमें पहा.वो । प्रतिष्ठिती तेथ प्रकटे देवो । एवढा ब्राह्मणी सद्भावो । सहजान्वयो सामर्थ्य॥४१॥ पावोनियां ब्राह्मणजन्म। जो करी क्षुद्र विषयकर्म । त्याचे हातींचा गेला पुरुषोत्तम.। अंधतम तो पावे ॥४२॥ एका जनाः दनाची विनंती । येऊनि मनुष्यदेहाप्रती । करोनिया भगवद्भक्ती। निजात्मप्राप्ती साधावी ॥ ५४३ ॥ ॥ इति श्रीभागवत महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसवादे ब्रह्मचर्यगृहस्थकर्मधर्मनिरूपणे एकाकारटीकाया सप्तदशोऽध्यायः ।। १७॥ श्लोक ॥ ५८ ॥ ॥ +
. . अध्याय अठरावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विधाविधिविवेका । कर्मधर्मप्र तिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥१॥ वर्णाश्नमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविदा । तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥२॥ तूं शुद्धशब्दसृष्टीचा अकू, । तूं वेदगुह्यप्रकाशकू । तूंचि एकला अनेकू । व्याप्य - व्यापकू तूंचि तूं ॥ ३ ॥ तूंचि तू विधि विधान । तूं घोलका तूं मौन, एका आणि जनार्दन । दोनी सपूर्ण तूं गुरुराया ॥४॥ १अधमहावांत, नरकांत २ जाते. ३ पापी पुरुष ४ मोकळे होणे ५ घाट ६ श्रीवरस. ७ लेशही. ८ अध्याय ५-३३ पहा ९ पदार्थ न मिटण्यासारसा..१० आत्मखरूपाची प्राप्ति. ११ अखिल कर्माचा प्रकाश-प्रसार करणान्या १२ महावियेच्या उपदेशाचा विवेकरूप अशा गुस्येष्ठा. १३ पूल, आधार १४ वितडवाद, महानपुखदायक बाद तो अंबाद. १५ सूर्य. -