Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५० एकनाथी भागवत आणि कांता । येविपयीं अतिलोभता । उपरमु चित्ता असेना ॥२१॥स्त्रीकामाचेनि नांवें। लिंगमात्र असावे । मग सेव्यासेव्यभाये । विचारू जीवे स्मरेना ॥ २२ ॥ तैसेंच जाण द्रव्यार्था । भलतैसें पावो हाता । न विचारी विहिता अविहिता । अतिकामता अर्थार्थी ॥ २३ ॥ अविहित कामस्थिती । हा स्वभाव ज्याचे वृत्ती । ते अंत्यजादि प्रकृती । जाण निश्चिती उद्धवा ॥ २४ ॥ पाहें पां कामिकांच्या पोटीं । सदा क्रोधाची आगंटी । कामप्राप्ती ऐकता गोष्टी । भडका उठी प्रळयात ॥ २५ ॥ ज्याचिये शरीरस्थिती । उँसतू नाही क्रोधाहाती । सदा धुपधुपीत वृत्ती । ते जाण प्रकृती अतिनीच ॥ २६ ॥ प्राप्तभोगें तृष्णा न वाणे । ऐकिल्याही भोगाकारणे । अखंड मनाचें वैसे धरणें । ते प्रकृति जाणे अतिनीच ॥ २७ ॥ म्यां सांगीतले जे आठही गुण । हे ज्याचे प्रकृतीस लक्षण । तो हो कां भलता वर्ण। परी अंत्यजपण त्यामाजी ॥ २८ ॥ अवगण सांगीतले समस्त। एक एक नरकैदानी विख्यात । मा आठही मिळाले जेथ । उँगड तेथ मग कैंचा ॥ २९ ॥ त्यागावया निजस्थिती । या अवगुणांची व्युत्पत्ती । म्यां सांगीतली तुजप्रती । जाण निश्चिती उद्धवा ॥ २३० ।। त्या गुणांतें अंगीकारिती । ते नरकगामी गा निश्चिती । या गुणांत जे त्यागिती । ते पावती पद माझें ॥ ३१ ॥ तेणे माझ्या पदाची प्राप्ती। सर्वा वर्णा उत्तम गती । ऐशिया गुणांची व्युत्पत्ती । सागेन तुजप्रती उद्धवा ॥ ३२॥ सकळ लक्षणांचें निजसार । जें गुह्यगुणाचे भाडार । जेणे पाविजे ससारपार । ऐक साचार उद्धवा ॥३३॥ जो सर्व वर्णाचा सहज धर्म । जेणे पाविजे परब्रह्म । जे नाशिती चित्तभ्रम । ते गुण उत्तम अवधारी ॥३४॥ अहिंसा सत्यमतेयमकामक्रोधलोभता । भूतमियहितेहा च धर्मोऽय सार्ववर्णिक ॥ २१ ॥ हो का उपायो जेणे तेणे । पुढिलासी जे सुख देणे । ते उपतिष्ठे मजकारणे । तो गुण म्यां श्रीकृष्णे बंदिजे ॥ ३५ ॥ तैसेंच परपीडा असुख । पुढिलिया न देणे दुःख । तेहीकरूनि मज होय सुख । जाण निष्टक उद्धवा ॥ ३६ ॥ दुःख नेदूनि सुख देणें । या नांय अहिंसा ह्मणणे । हा पहिला गुण जाणणे । ऐक लक्षणे सत्याची ॥ ३७ ॥ सत्य ते जाण पां ऐसें । ज्याचे मन चाचा असत्यदो । जागृतिस्वमसुषुप्तिव” । स्पर्शले नसे अणुमात्र ॥ ३८ ॥ निंदा आणि नरस्तवन । कदा मिथ्या न चोले वचन । वाचा अनसुट धरणे जाण । सत्य सपूर्ण या नांच ॥ ३९॥ हो कां अधर्माचिये जोडी।कोडी धरोनिया कवडी। जो रिधो नेदी दृष्टी बुडी । फुटकी कवडी स्पर्शेना ॥ २४० ॥ तेथेही चोरी करणे । का दृष्टि चुकवूनि वस्तु घेणे । अथवा न पुसता नेणे । जीवेप्राणे न सभवे ॥४१॥ अन्यायोपॉर्जित धन । स्वमीही नातळे मन । हे अचौर्याचे लक्षण । तिसरा गुण उद्धवा ॥४२॥ स्वधर्मं धन यावे हाता । हेही नसे धनकामता । कामिनीकामांची नेणे वार्ता । परस्त्री ते माता नेमस्त ॥४३॥ हो का स्वदाराभिगमन । तेथेही आसक्त नसे मन । आश्रमधमार्थ १ विधाति २ पाये ३ धनार्जनी ४ अयोग्य, धर्मशास्त्राच्या नियमाला सोडून ५ हीन जातीचे ६ विषयलामेछुच्या ७ शेगडी, भुणी. ८ विधाती ९ साखावलेली १० कोणत्याही जातीचा ११ नरकात घालण्याचे कामी सिद्ध १२ मग १३ उगड किया उगड हागजे उद्धार, सुटका १४ मनाचे चाचल्य १५ प्राप्त होत, येऊन मिळते. १६ निश्व. यानं १७ योग्य पधनात ठेवणे, १८ भन्यायाने मिळविलेले १९ स्त्रीविषयक सुखाची.