Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/433

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पंधरावा. असमास । गुणमायेस अनावृत ॥ २७ ॥ जेवीं घटाची वस्ती आकाशीं । आकाश सवाद्य त्या घटासी । तेवीं मी जीवमात्रांसी । सबाह्य हपीकेशी परिपूर्ण ॥ २८ ॥ जैशी महाभूत भौतिकांसी । सवाद्य असती सर्वासी । तेवीं मी सकळ जगासी । सबाह्य हपीकेशी पूर्णत्वें पूर्ण ॥ २९ ॥ जीवन जैसे तरगासी । कां गोडी जैसी गुळासी । तेवी अनतकोटि ब्रह्माडासी । भी पूर्णत्वेसी परिपूर्ण ॥ २३० ॥ मज पूर्णाची पूर्ण प्राप्ती । निकट येतयेता हाती । ते संधी सिद्धी नागविती । भोगसपत्तीउपचारें ॥ ३१ ॥ ज्याचें रायापाशी पूर्ण चलन । त्याचे हाता ये लांचु सपूर्ण । तेणेंचि तो पावे मरण । तैगा सिद्धी जाण घातका ॥३२॥ ये अध्यायींचे निरूपण । सांगावया हेचि गा कारण । माझे प्राप्तीस सिद्धी विघ्न । उद्धवा जाण निश्चिती ॥ ३३ ॥ एकाग्र भजने माझी प्राप्ती । होता ते सधीसी सिद्धी येती । त्या भुलयोनिया भोगासक्ती । नागविती साधकां ॥ ३४ ॥ जे नेणती माझें निजसुख । ऐसे जे का केवळ मूर्ख । त्यासीच सिद्धींचे कौतुक । अलोलिक भोगलिप्सा ।। ३५ ॥ जैसे वेश्येचे हावभाव । तैसे सिद्धीचे वैभव । हे त्यागावया गा सर्व । देवे हा अध्याय निरूपिला ॥ ३६॥ ज्यासी प्राप्त माझे निजसुख । त्यासी सिद्धी तुच्छप्राय देख । न देखती जन्ममरणाचें मुख । माझा पूर्ण हरिख कोंदाटे ॥ ३७॥ सेवितां सद्गुरुचरण । कोंदाटे ब्रह्म परिपूर्ण । तेथ सिद्धीसी पुसे कोण । हे जाणती खूण हरिभक्त ॥ ३८ ॥ हरिभकीसी विकिला भावो । भजनें फिटला अहभावो । तेथ सिद्धीचा भोगसदेहो । नुपजे पहाहो सर्वथा ।। ३९ ॥ भुक्ति मुक्ती ऋद्धि सिद्धी । सद्गुरुचरणीं गा त्रिशुद्धी । हे नेणती जे मदबुद्धी । ते नानासिद्धी वाछिती ॥२४०॥ सकळ सिद्धींचे साधन । निरपेक्षता सत्य जाण । निरपेक्षाचे अगण । सिद्धी सपूर्ण ओळंगती ॥४१॥ सिद्धींची अपेक्षा ज्याचे चित्तीं। सिद्धी त्याकडे न थुकिती। निरपेक्षाचे पायींची माती । सिद्धी बंदिती सर्वदा ॥ ४२ ॥ ज्ञानवैराग्यभक्तीचे माया । सत्य जाण पां निरपेक्षता । ते निरपेक्षता आलिया हाता। मुक्ति सायुज्यता पाया लागे ॥ ४३ ॥ निरपेक्षतेपाशी सई सिद्धी । निरपेक्षतेपाशी विधी । निरपेक्षतेपाशी सुबुद्धी । चरणपदी अहर्निशीं ॥४४॥ निरपेक्षता तेथ "निर्वाहो । निरपेक्षता तेथ सद्भावो । निरपेक्षतेपाशी भगरायो । यथार्थ पहावो तिष्ठतू ॥ ४५ ॥ निरपेक्षतेपाशी उपनिपाएँ । निरपेक्षतेपाशी साचार योग । निरपेक्षता स्वानंदभोगू । सापडे श्रीरगू निरपेक्षा ॥ ४६॥ एका जनार्दना शरण । त्याचे बंदिता श्रीचरण चढती निरपेक्षता जाण । सदा सपूर्ण स्वानंदें ।। ४७ ॥ आह्मा स्वानंदाचा निजबोधू । हा सद्गुरुचरणींचा प्रसादू । महासुखाचा विनोदू । आनंदकदू श्रीचरणीं ॥४८॥ गुरुचरणी करिता भक्ती । अनायासे प्राप्त पारी मुफी । निजशातीसी विरकी । सेवा मागती गुरुभक्त ॥१९॥ एका जनार्दना शरण । त्याचे कृपेस्तव जाण । श्रीभागरताचें निरूपण ।झाला सपूर्ण पधराया ॥२५०॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशरकंधे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारटीकाया सिद्विनिरूपणयोगो नाम पंचदशोऽध्याय ॥१५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। अध्यायश्लोकसख्या ॥३६ ॥ ऑन्या ॥ २५० ॥ ॥मिळून सख्या ।। २८६ ॥ ॥ ॥ - १ अमर्याद, व्यापक २ चेगळे, अवीत ३ भूनापासून पारेया एक्दर पस्तूला ४ ३दक ५त्यावेळी ६गमन, या ७ पूर्णानद भान उरतो ८ नशाला, चहाला. नराश्य, भाचारादित्य १० धूर योगक्षेन १२ दर्शन --- -- - - सोम १२ दर्शन । rink