Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/432

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२२ एकनाथी भागवंत. नित्य सेविल्या देख । त्यासी बाधीना कोणी विख । पाताळगरुडाचे प्राशिल्या मुख । त्यासी देहदुःख वाधीना ॥ ६॥ पूतिकावृक्षाचे मूळीं । असे महाशकीची पुतळी । ते साधल्या अप्सरांचे मेळी । कीडे तत्काळी साधक ॥ ७ ॥ अनंत औषधी अनंत सिद्धी । त्याची साधना कठिण त्रिशुद्धी । तपादि सिद्धीचि विधी । ऐक सुबुद्धी उद्धवा ।।४।। कृच्छ पराक चाद्रायण । आसार जलाशय धूम्रपान । तप करी जे जें भावून । ते ते सिद्धी जाण तो पावे ॥ ९॥ ऐक मंत्रसिद्धीचे लक्षण । प्रेतावरी बैसोनि आपण । एक रात्र केल्या अनुष्ठान । प्रेतदेवता संपूर्ण प्रसन्न होय ॥२१०॥ तेणे भूत भविष्य वर्तमान । ते सिद्धी प्राप्त होय जाण । करितां सूर्यमंत्रविधान । दूरदर्शनसिद्धी उपजे ॥ ११ ॥ जैसा मंन जैसी बुद्धी । तैसी त्यास प्रकटे सिद्धी । या सकळ सिद्धीची समृद्धी । योगधारणाविधीमाजी असती ।। १२ ।। नेहनियां आसना । ऐक्य करोनि प्राणापानां । जो धरी योगधारणा । सकळ सिद्धी जाणा ते ठायीं ॥ १३ ॥ म्यां सांगीतली सिद्धींची कथा । झालिया प्राणापानसमता । आलिया योगधारणा हातात सिद्धी समस्ता प्रकटती ॥१४॥ प्राणापान समान न करिता । योगधारणाही न धरितां । मज एकातें हृदयीं धरितां । सिद्धी समस्ता दासी होती ॥ १५ ॥ मज पावावया तत्त्वतां । मज एकातें स्मरता ध्यातां । पावो देऊन सिद्धींचे माथा । चारी मुक्ति स्वभावतां दासी होती ॥१६॥ नाना सिद्धींची धारणा धरितां । माझी सलोकता समीपता । हाता न ये गा सरूपता । मग सायुज्यता ते कैची ॥ १७ ॥माझे अतिशयें शुद्ध भक्त । ते मुक्तीसी दूर दवडित । माझेनि भावार्थं नित्यतृप्त । ते पूज्य होत मजलागीं ॥ १८ ॥जो सकळ सिद्धींचा ईश्वरू । तो मी लागें त्याची पूजा करू । तेथिली जो सिद्धींचा सभारू । घेऊनि निजवेव्हारू पळताती ॥१९॥ सकळ सिद्धीच्या स्वामित्वेसी । मी भगवंत तिष्ठ भक्तांपाशीं । तेचि श्लोकार्थे हपीकेशी । उद्धवासी सागत ॥ २२० ।। सर्वासामपि सिद्धीनां हेतु पतिरह प्रभु । मह योगस्य सारयस्य धर्मस ब्रह्मवादिनाम् ॥ ३५ ॥ सकळ सिद्धीचें मी जन्मस्थान । माझेनि सिद्धीचे थोर महिमान । सिद्धीसी मजमाजी निदान । यापरी मी जाण स्वामी त्याचा ॥ २१ ॥ जे जीवात्म्याची ऐक्यता । त्या योगाचा स्वामी भी तत्त्वता । जेथ जीवत्वाची मिथ्या वार्ता । त्या ज्ञानाचाही सर्वथा स्वामी मीचि ॥२२॥ ज्ञानोपदेप्टे जे साधू । त्याचाही स्वामी भी प्रसिद्ध । माझेनि प्रसादें ज्ञानबोधू। होतसे विशदू सज्ञाना ॥ २३ ॥ उपदेशी उपनिपदागें वेद । त्या वेदाचाही स्वामी मी गोविदू। मजवेगळा घेदवादू । उच्चारी शब्दू नुमचारे ॥ २४ ॥ धर्म ह्मणजे ज्ञानसाधन । त्याचाही स्वामी मीचि जाण । मी सवाह्य परिपूर्ण । चैतन्यधन सर्वात्मा ।। २५॥ मी सर्वात्मा सर्व व्याप्त । सबाह्य परिपूर्ण समस्त । हे माझ्या ठायीं सहज स्थित । ऐक सुनिश्चित उद्धचा ॥२६॥ महमात्मान्तरो याशोनात सर्वदेहिनाम् । यथा भूतानि भूतेषु पहिरन्त स्वय तथा ।। ३६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्वन्धे भरायदुद्धवसवादे पचदशोऽध्यायः ।। ३५॥ जीवाच्या जीवामाजी माझा चास । जीव मजमाजी सावकाश । माझें स्वरूप गा प्रतविशेष २.पावसाच्या धारा ३रावच्या वस्तु पाहणे ४ लक्षपूर्वक पाहून, दृढ करून ५पमाती तेथे लाजोनि भगर पाठ आहे तोही चागला आहे आपापले व्यापार ८ समाप्ति, शेवट सनाखरूप १० आत्म्यात