पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/398

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत गेलें । तें असें संचलें तो जाणे ॥ ६६ ॥ तेवी अज्ञानें न यावें । कां ज्ञान झालिया यावें । तैसें वस्तूसी न संभवे । ते असे स्वभावे संचले ॥ ६७ ॥ तैसें देसते आणि दाखवितें। दोनी जाऊनिया तेथे । माझें मीपण जे जुने होते । तें दावियले मातें जनार्दनें ॥ ६८ ॥ जेवी सूर्याचेनि प्रकाशे । सूर्यचि की सूर्ये दिसे । तेवीं माझेनि निजप्रकाशे । मज मीचि असें देखत ॥ ६९॥ ऐशियाही गयीं जाण । कैचे नवे जुने ज्ञान । वहु काळ ठेविले सुवर्ण । त्यासी ह्मणे कोण कुहजकु ॥ ७७० ।। कालचाचि आजि उगवला । तो सूर्य काय हाणाया शिळा । की आजिचा अग्नि सोवळा । कालचा काय वॉवळा ह्मणों ये ॥७१॥ तेवीं सनकादिकांचें जें ज्ञान । तेंचि मराठीभाषेमाजी जाण । येथे ठेवू जाता दूषण । दोपी आपण होइजे ॥७२॥ कां सुवर्णाचे केले सुणे । परी ते मोले नव्हेचि उणे । तेवीं सनकादिकांची ज्ञानें । देशभाषा हीने नव्हतीच ॥ ७३ ॥ जेवी का गुळाचें कारलें केलें । परी ते कडूपणा नाही आले । तेवीं हंसगीत मराठे झाले नाही पालटलें चिन्मान ।। ७४ ॥ जे मोल मुकुटीच्या हेमासी । तेंचि मोल सुवर्णश्वानासी । जो का प्राहिक सुवर्णासी । दोघे दोघासी समत्वे ॥७५॥ तैसें आत्मानुभवी जे येथे । ते मानितील या ग्रंथातें। येर ते हेळसितील याते । निजभावार्थे न घेती ॥ ७६ ॥ जे बंदिती का निंदिती । ते दोघे आमा ब्रह्ममूर्ती । हे निजात्मभावाची प्रतीती । केली निश्चिती जनार्दने ॥ ७७ ॥ एका जनार्दना शरण । रिधता विराले एकपण । जेवी का समरसोनि लवण । स्वयं जाण समुद्र झाले ॥ ७८ ॥ तेथे एका आणि जनार्दन । एक झाले हे ह्मणे कोण । जेवी डोळ्याचे देखणेपण । डोळाचि आपण स्वयें जाणे ॥ ७९ ॥ डोळ्यांनी आरिसा प्रकाशिजे । तेथे डोळेनि डोळा पाहिजे । तेवी हे ज्ञान जाणिजे । देखणे देखिजे देखणेनी ॥ ७८० ॥ साडोनियां एकपण । एका जनार्दना शरण । हेचि हंसगीतनिरूपण | झाले परिपूर्ण पूर्णत्वे ॥ ७८१ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां श्रीकृष्णोद्धवसवादे हंसगीतनिरूपणं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। ।। मूळ श्लोक ॥४२॥ ओंव्या ।। ७८१॥ अध्याय चवदावा. ॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो स्वामी सद्गुरू । तूं निजागें क्षीरसागरू । तुझा उगवल्या प्रबोधचंद्रू । आहादरू जीवासी ॥१॥ ज्या चंद्राचे चंद्रकरी । निविड अज्ञान अधारी । त्रिविध ताप दूर करी । हृदयचिदेवरी उगवोनी ॥२॥ ज्या चंद्राचे चद्रकिरण । आर्तचकोरालागी जाण । स्वानंदचंद्रामृते सवोन । स्वभावे पूर्ण करिताती ॥३॥ अविद्याअधारौं अध बंधे । सकोचली जीवदेहकुमुदें । ती ज्याचेनि किरणप्रवोधे । अतिस्वानंद विकासली ॥ ४ ॥ जो चंद्र देखताचि दिठी । सुख होय जीवाच्या पोटी । अहंसोमकात १ कुजलेले 'कुहिजक' असाही पाठ आहे २ अने, श्वान ३ देशमात ज्ञाने भाख्यान हीन होत माहात ४ का कारले गुळाचे केले ५ विकारतील ६ भकीन ज्ञानरूप चद अनुभवज्ञान, प्रत्यक्षमान ८ आनद देणारा ९ वर फिरणानी १० पूर्ण अज्ञान आपण कोण है विचारानेही न समजणे ११ देहबुद्धीमुळे उत्पन होगारे देहाचे निविध ताप १२ हदयरूप चिदाकाशामध्ये १३ जीय पूर्ण व्यापक असून अविद्या अधकारामुळे त्याची व्यापक दृष्टि सकुचित होऊन दाहापुरती व्यापकता राहिली १४ कमले १५ असह स्वरूपाकार वृत्तीच्या योगान १६ भहकाररूपी चद्रकातमण्याचा गाला