Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/394

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८२ एकनाथी भागवत. देहासी तटस्थता । झाल्या मानावी समाध्यवस्था । ऐशी लक्षणे सत्य मानितां । ठकले तत्त्वतां परीक्षक ।। ७६ ।। हो का स्वामींचे सज्ञानासी । तोटस्थ्यमुद्रा लागल्या त्यासी । जरी मान्य झाल्या स्वप्नींच्यासी । तरी जागृतीसी नाही आला ॥ ७७॥ हो कां स्वप्नीच्या लोकांप्रती । थोर झाली समाधीची ख्याती । तरी नाही आला तो जागृती । जाणावा निश्चिर्ती निद्रितू ॥ ७८ ॥ तेवीं ताटस्थ्या नांव समाधी । ते अविद्या स्वममूर्छासिद्धी । परी स्वस्वरूपप्रबोधी । जागा त्रिशुद्धी नाही झाला ॥७९॥ तो जागा होऊनि स्वप्न पाहे । ते मिथ्यात्वे देखताहे । त्यातु आपुला देहो सत्य काये । मा ताटस्थ्य राहे ते ठायीं ॥६८०॥ जो जागा होऊनि तत्त्वता । स्वमदेहासी तटस्थता । साक्षेपपूर्वक लावू जाता । लाजे परी अधिकता दशा न मनी ।। ८१ ।। जो जागा होऊनि स्वप्न सांगे। ते मिथ्यापणेचि अवघे । परी सत्यत्वाचेनि पांगें। कदा निजांगें नातळे ॥४२॥ तैशी साचार वस्तुमाधी । तो नातळे देहस्थिता । तरी देह वर्ते कोणे रीती । तो प्रारब्धगतीचेनि शेपें ॥ ८३ ॥ स्थंडिली अग्नि विझोनि जाये । तरी भूमिये उष्णता राहे । कर्पूर सरल्याही पाहें । सुवासु आहे ते देशी ॥८४॥ पाळणा हालविता वोसरे । तरी तो हाले पूर्वसस्कारें। तेवीं अविद्यानाशें प्रारब्ध उरे । तेणे देहो वावरे मुक्तांचा ॥ ८५ ॥ लक्षे भेदोनियां तीरें । वळे चालिजे पुंदारें। तेवी अविद्यानाशे प्रारब्ध उरे । तेणें देहो वावरे मुक्काचा ॥८६॥ शरीराचेनि छाया चळे । परी शरीर छायेवेगळे । तेवी देह मिथ्या मुक्ताजवळे । चळे वळे प्रारब्धं ॥४७॥ हेतुवीण अनायासे । पुरुपासवे छाया असे । तेवी सज्ञानासरिसे । देह दिसे मिथ्यात्वे ॥ ८८॥ जैसें गलित पन वारेनि बळे । तैसें देह वर्त प्राचीन मेळे । परी देहकर्माचेनि विसळें। ज्ञाता न मैळे निजवोधे ।। ८९ ॥ त्या प्रारब्धाच्या पोटीं । सांगों सकळ जगेसी गोठी। का धरोनि मौनाची मिठी । गिरिकपार्टी पडो सुखें ॥ ६९० ॥ तो आचरो सकळ कम । अथवा पिसा हो का निभ्रमें । तेणे तेणे अनुक्रमें । जाण परिणामे प्रारब्धं ॥ ९१ ॥ तो चढो पालखी गजस्कंधी । कां पडो विष्ठामूत्रसधी । ते ते प्रारब्धाची सिद्धी । जाण त्रिशुद्धी ज्ञात्यासी ॥ ९२ ॥ जेथ वाध्यवाधकता फिटली । सकळ अहं अविद्या तुटली । सहज समाधी त्या नाव झाली । हे सख्या केली सिद्धाती ॥९॥ ऐशी जे सैर समाधिअवस्था । तोचि भोग भोगोनि अभोक्ता । कर्मे करोनि अकर्ता । जाण तत्त्वतां तो एक ॥९४॥ तो क्रियाकारणसयोगें । डुलत देखिजे विषयभोगें । परी समाधिमुद्रा न भंगे। भोगसमें अलिप्त ॥९५॥ त्यासी स्त्री ह्मणे माझा भर्ता । पुत्र ह्मणे माझा पिता । शिष्य ह्मणे स्वामी तत्वता । त्याहूनि परता त्यांमाजी वर्ते ॥ ९६ ॥ हो का काष्ठास्तव उत्पत्ती । काष्ठावरी ज्याची स्थिती । तो आकळिता काष्ठी वहुती । नावरे निश्चिती अग्नि जैसा ॥९॥ फुकिता लखलसिला । जो फुकास्तव प्रकटला । तो फुक न साहता ठेला । निर्वातींचा सचला दीप जैसा ॥ ९८॥ तेवी कर्मास्तव उत्पत्ती। कमचि झाली परब्रह्मप्राप्ती । त्या कमोमाजी वर्तती । निष्कर्मस्थिती महायोगी ॥ ९९ ॥ तो व्यवहारी दिसो जनी । की पिसेपणी - - - - -- - १ सा व्यवहार सुदन निश्चल राहणे २ खवरप जाणण्याविषयां ३ थापविला, झोके देणे बाबविल ४ फिरतो ५ याण ज्यावर मारला जातो ते ६ पुढे ७ गळालेले पान ८ देहम झाल्याला स्पर्श करीत नाही व तोही आत्मवरूपापासून च्युत होत नाही १ पर्वताच्या गुहत १० शेवट, सस्था. ११ स्वैर, सहज ।