________________
एकनाथी भागवत. उठाउठी। धुरेसि गोठी सांगेन ॥ ६६ ॥ आंतुले दृष्टी पुढिले चालीं । गोचींचें पाऊल उगयोनि घाली । उंच नीच भूमीची खोली । चुकवूनि चाली चालेन ॥ ६७ ।। संकल्पविकल्पांचे झोक । ज्यात वाम सव्य अनेक । ते आंवरूनियां देख । पाहत श्रीमुख चालेन मी ॥६८॥ न चुकतां निजमार्ग । त्यहाळूनि धुरेचे अग । न करितां आणिकाचा पांग । भोई चांग मी होईन ॥ ६९ ॥ सुखासनाचेनि पडिपाडें । चालतां सुख अधिक वाढे। मागील सूंड काढूनि पुढे । सुखसुरवाडे चालेन ॥५७०॥ चढणे पडणे अडखळणे । दडकणे फडकणे अडकणें । साभाळूनिया निष्ठेनें । टेणकपणे चालेन ।। ७१ ।। उरी शिरी खांदी कोंपरी । मागील सूंड पुढे धरी । दृष्टी ठेऊनि पायावरी । निर्विकारी चालेन ||७२।। आटी मुरडी उलट लोट । धापकाप पडे मेंट । आधार धरूनि सुभट । चढती वाट चालेन ॥ ७३ ।। उल्लंघूनि कामाचा पाट । आंवरूनि क्रोधाचा लोट । चुकवूनि खोलव्याची वाट । धुरेसकट मी चालेन ॥७४॥ ममतेची ओल प्रवळ । ते ठायीं रुती गुंती सबळ । नेय न माखतां पाउल । लंघूनि तत्काळ जाईन ॥७५ ॥ मोहनदीची थोर करौडी। माजी सवळ जळें प्रवळ वोढी । शितोडा न लगतां धूर मी काढौं । परॉपर थडी तत्काळ ॥७६॥ दृष्टी ठेवूनि स्वामीकडे । सवेग चालतां मागेपुढे । भोई होईन दोहींकडे । सूड सुडे काढीन ॥७॥ एवं मीचि मी मार्गे पुढे । सुखासनाचेनि सुरवाडे । स्वामीची निर्जेनिद्रा न मोडे। तेणे पडिपाडे बाहेन ॥७८॥ उच्छिष्ट अन्नाचा पोसणा । आठां प्रहरांचा जागणा । सदा गुरुगुरु करीत जाणा । गुरुद्वारी सुंणा मी होईन ॥ ७९ ॥ विजाती देखोनि नयना । सोहं भाचे भुंकेन जाणा । भजनथारोळी वैसणा । गुरुदारी सुणा मी होईन ॥ ५८० ॥ ऐसऐशिया भावना । गुरुसेवेलागी जाणा । अतिशय आवडी मना । नाना विवंचना विवंची ॥८१॥ जरी दैववशे दूर गेला । परी तो भावव जवळी आला । गुरुसेवे जो जीवे विकला । तो शास्त्र पाचला सद्विद्या ॥ ८२ ॥ असो जवळी अथवा दूरी । परी गुरुभक्तीची आवडी भारी । जीवित्व ठेविले सेवेवरी । गुरूच्या द्वारी भजनासी ॥८३॥ ऐसा गुरुभक्तीसी सादर । चढत्या आवडी एकान । तेचि सद्विद्यालक्षण शस्त्र । गुरुकृपाकुठार पै पावे ॥४४॥ लावोनि वैराग्याचे साहाणे । प्रत्यावृत्तिबोधकपणे । शस्त्र केलें जी सणाणे । तीक्ष्णपणे अतिसज्जै ।। ८५ ॥ शस्त्र सजिले निजदृष्टी । दृढ धरिले ऐक्याचे मुष्टी । शस्त्र आणि शस्त्रधरा एकी गांठी । करूनि उठी भवच्छेदा ॥ ८६ ॥ दृढ साधोनिया आवो। निजवळे घालिता घावो । झाला भववृक्षाचा अभावो । घायेंवीण पहा वो छेदिला ।।८७॥ जीवाशेयाची वासना । ते छेदावी निजकल्पना । तोचि भववृक्षाचा छेद जाणा । सावधाना धृतिवळे ॥८८॥ झालिया चैतन्यपदप्राप्ती । सकळ साधने सहजे जाती । भोजनी झालिया पूर्ण तृप्ती । ठायींच राहती पक्वान्नें ॥८९ ॥ परमतृप्ती उथळल्या पोटी । अमृतही १पालखीच्या दाण्याला सादा घातला असतानाही २सागत ३ वाहनात बसलेल्या गुरुकडेच नजर लावून ४ श्रीगुरूचे मुस ५न हालता ६ वाहनाच्या दाव्यास घातलेला सादा न हालविता ७ गरज ८ अदमास ९ उमदान, कपटपट चालेना १० चढ़ ११ रुतू न देता १२ दरड १३ परात्पर १४ समाधी १५ चालेन १६ पासलला. १७ कुना १८ थारोळा, भुई खणून विस्तवाकरिता वगैरे केलेली जागा १९ खखरूपाकारवृत्तीने २० तीक्ष्ण धारेचे २१ नेम, आकार २२ लिंगशरीराची २३ बुद्धिबळाने २४ आत्मसाक्षात्कार, ब्रह्मप्राप्ति निजपदप्राप्ती २५ जागच्या जागी २६ उत्पन्न झाल्यावर