________________
एकनाथी भागवत. द्वादशदळयुक्त । वारा वर्ण न्यसिले तेथ । ककारादि ठकारांत । वर्ण विराजत ते चक्री ॥३४०॥ विशुद्धिचक्रींच्या सोळा दळां । अ इ उ ऋ ल हे वर्ण सोळा । कंठस्थानी मीनला मेळा । याचा वेदी आगळा प्रेताप ॥४१॥ आज्ञाचक्र अतिअवघड । नुघडे काकीमुखाचें कवाड । न चले प्राणांची चडफड । मार्ग अतिगूढ लक्षेना ॥ ४२ ॥ ते आज्ञाचक्र गा द्विदळ । केवळ हंसाचे राउळ । तेथ पावावया योगबळ । अतिप्रवळ पाहिजे ॥ ४३ ॥ हे स्थान पावावयासाठी । योगी झाले महाहटी । अभ्यास करिता अतिसकटीं । तेही शेवटी न पावती ॥ ४४ ॥ हे पावावया माझें स्थान । अतिगुह्य आहे अनुष्ठान । सोहहंसाचे साधन । सावधान जो साधी ॥ ४५ ॥ प्राणाचेनि गमनागमने । सोहंहसाचेनि स्मरणे । सावधानें जो साधू जाणे । तेणें पावणे हे स्थान ॥ ४६॥ त्यासीचि पैवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजी चेंढे । तेथूनिही मार्ग काढी पुढे । अतिनिवाडे अचूक ॥ ४७ ॥ तेथ नानाभोगसमृद्धिफळें । आणिती ऋद्धिसिद्धींचे पाळें । ते डावलूनियां सकळे । निघे निर्मळें निजपंथें ॥४८॥ जो कां ऋद्धिसिद्धीसी भुलला । मी सिद्ध ये श्लाघे आला । तो आज्ञाचक्रावरोनि यवला । केल्या मुकला कष्टासी ॥ ४९ ॥ ज्यासी, वैराग्य असे संपुरतें । तो कदा भुलेना सिद्धीते । लाता हाणोनि भोगमान्यतेते । निगे निजपंथें मजलागीं ॥ ३५० ॥ तै औट पीठ गोल्हाट । सांडूनि भ्रमरगुंफा कचाट । शोखूनि सहस्रदळाचे पाट । मजमाजी सुभट मिसळले ॥५१॥ सागतां आज्ञाचकाची संस्था। पुढे गोडी लागली योगपंथा । मागील विसरलों जी कथा । क्षमा श्रोतां करावी ॥५२॥ ह्मणाल वाहवंटी पडला मासा । तो परतेना जेवीं सहसा । ग्रंथनिरूपणी तूं तैसा । जल्पू वार्यवसा का करिसी ।। ५३ ॥ जेवी चुकलिया बाळकातें । माता शिकवण दे त्यातें । तेवी तुमचे वचन माते । निजहितातें द्योतक ॥५४ा करिता चक्राचे निरूपण । योगारूढ झाले मन । विसरोनि मागील निरूपण । गेले निघून शेवटा ॥ ५५ ॥ हे ऐकोनि हासिले. श्रोते । तू कर्ता नव्हसी येथें । हे कळोनि गेलें आमुतें । नको परिहारातें उपपार्दू ॥५६॥ आलोडिता ग्रंथकोडी । न कळे योगज्ञानाची गोडी । ते तुवां विशद केली फुडी । निजपरवडीविभागें ॥५७॥ तुझेनि मुखें कृष्णनायें। श्रीभागवत में कठिण होते । ते अर्थविले यथार्थे । सत्य आमुते मानले ॥ ५८ ॥ हा बारावा अध्यावो । अतिगूढ बोलिला देवाधिदेवो । तेथींचाही त्यां अभिप्रावो । विर्शद पहावो विवरिला ॥ ५९ ॥ ऐसा संती करोनि आदरू । निर्भय दिधला नामिकारू । एका जनार्दनीं हनिर्भरू । केला नमस्कारू संतांसी ॥३६०॥ १ क पासून उपयंतचे २ या सर्व भोव्याचे तात्पर्य असे आहे "सर्वास जीवन देणारा व सर्वाहमानी असल्यामुळे सास प्रत्यक्ष असा परमेश्वर मूलाधारादि सहा चकाचे ठायी अभिव्यक्त झाल्यासारखा होऊन परावाणीनामक नादयुक्त प्राणासह आधारचकात प्रनिष्ट होऊन मणिपूरचकाचे ठिकाणी पश्यन्तीनामक सूक्ष्म मनोमय रूपास पावून, नतर अनाहतस्थानी आल्यावर मध्यमानामक किचित् व्यक्त परंतु बहुतेक अव्यक भशा रूपास घेतो, आणि मग विशुद्धचकाचे ठिकाणी बसरीनामक व्यकरूप त्याला प्राप्त होऊन, तो मुखाचे ठिकाणी माना, खर, भक्षर इत्यादिरूपान स्थूलपण प्रष्ट होतो व नतर अतिस्थूल वेदशासादिरूप असा होतो" ३ देऊळ ४ प्राणायामाची विद्धि ५ वुडे ६ दूर सारून, ठकलन ७ टकलला, पडला ८ पूर्ण ९ पश्चिममार्गातील पाचवे स्थान १० र ११ ओघात, प्रवाहात १२ लटिका, व्यय १३ आठवण १४ समाधान १५ चाळिता, अभ्यासतां १६ स्पष्ट आपल्या वातुर्यनळापर १८ व्याख्यान क्रूम स्पष्ट मराठीमात सागितले १९ देवो २० उघड, २१ अभय 'मिऊ नकोस असे वचा