________________
३३८ एकनाथी भागवत प्रसूती । अव्यक्त व्यक्ती प्रवेशे ॥ ९४ ॥ जळी सविता प्रतिविला । परी तो जलें नाहीं ओला झाला । तेवीं कम करोनि सचला । अलिप्त ठेला निजआत्मा ॥ ९५ ॥ जळी प्रतिविंब आंदोलायमान । तेवीं जीवासी जन्ममरण । थिल्लरी चंद्र अडकला जाण पूर्ण । तेवीं कर्मवंधन जीवासी ॥ ९६ ॥ थिल्लरजळ आटले । तेथे काय चंद्रबिंब निमाले । तें चंद्रबिंब होवोनि ठेले । जाहले निमाले दोनी मिथ्या ॥१७॥ थिल्लरीचा चंद्र काढू जातां । तो मिथ्यात्वे न ये हाता । तेवी देहीं मिथ्या जीवता । ते सत्य मानिता अतिदुःसी ॥१८॥ आरसा थोर अथवा लहान । तेथे सूर्य विवे सपूर्ण । तेवीं मी अंतर्यामी जाण । सर्वाभूतीं समान समग्र असे ॥ ९९ ॥ सूर्य थिल्लराआंतोता । अडकला दिसे समस्तां । तेवीं जीवासी कर्मबद्धता । मूर्ख तत्त्वतां मानिती ॥ ३०० ॥ गगनींचा सूर्यो न देखती। थिल्लरी अडकला मानिती । तेवीं निर्गुणी जयां नाहीं प्रतीती । ते बद्ध ह्मणती जीवातें ॥१॥ अग्निज्वाळा जाळी आकळिता। जाळ जळे आकळू जातां । तेवीं आत्मया कर्मी वांधतां । कर्मी कर्मता निर्धर्म ॥२॥ नाद उत्पत्तीसी ठावो । मुख्य वावो का दुसरा घायो । या दोहीं वेगळा नित्य निर्वाहो । तो नादू पहा हो अनुहैत ॥३॥ अनुहताचा सोलीच शब्दू । परापरतीरी पराख्य नादू । ज्याचा योगिया सदा छंदू । बोलिला अनुवादू नव्हे त्याचा ॥४॥ज्या नादाची सुखगोडी । सदाशिवूच जाणे फुडी । कासनकादिकी चोखडी। चाखिली गाढी ते चवी ॥५॥ वायूचे शोधितां सत्व । त्यासी एकवटले ते शब्दतत्त्व । उभयचेतने जीवित्व । मनोमयत्य धरूं पाहे ॥ ६ ॥ जे चेतनेचे चेतनत्व । तें वायूचे शोधित सत्व । तेंचि शब्दाचें निजतत्त्व । तेणे जीवित्व मनोरूप होय ॥ ७॥ जीवाचा शरीरसयोग । स्वयें सांगे तो श्रीरंग । आधारादिचक्रप्रयोग । क्रोचि साझ सागत ॥ ८॥ अहमिति प्रथेमाध्यासें । जीवासी जीवत्व आभासे । तो जे जे तत्त्वी प्रवेशे। ते मी ऐसे ह्मणतचि ॥९॥ तेय मी देहो हाणतां । तत्काळ जाय पूर्णता । तेव्हां एकदेशी परिच्छिन्नता । देहात्मता लागली ॥ ३१० ॥ निर्विशेष नाद अतिसूक्ष्म प्राण । त्यासहित आधारी प्रवेशोन । अतिसूक्ष्म प्रथम स्फुरण । पावोनि जाण परी झाली ॥१२॥ आधारचक्री सूक्ष्म प्राण । परा वाचा तेथींची जाण । मनाचे कोवळे स्फुरण । अतिसपूरैपण सूक्ष्मत्वे ॥ १२ ॥ स्वाधिष्ठानचक्राच्या ठायीं । मनाचे वाढते वाळसे पाहीं । पश्यती"वाचा तये ठायीं । वोलूं देखे परी काही बोलेना ॥१३॥ तिये चक्री एकवटला प्राण । पुढारा न चलेचि गा जाण । प्राणापाना झाले भाडण । दोघेजण रूसले ॥ १४ ॥ घरकलेहो लागला भारी । मग निघाले वेगळेचारी । पाचही राहिले पांचापरी । ऐक निर्धारी विचारू ॥१५॥ मागें रुसोनि गेला .... १मागे पुढे झोंके साणारें, हालणारं २ डबक्यात ३ योगधारणेनें दशनादाचा ध्वनि ऐकू येतो तो ४ वायूतील शोधित सरव झणजे केवळ चाचल्य "तेथ चाचल्य निखळ । एकलें ठेलें निदाळ" ज्ञाने भ १३-१०० त्या चाचल्याशी शन्दसत मिसळले आणि त्या मिश्रणास चेतनत्वाने व्यापिलं तेव्हा मन तयार झाले ५ 'मी' या पहिल्या अध्यासामुळे मर्यादितपणा ७ आधारचकाचे ठिकाणी निविशेष नाद झणजे नाद असून कानाला गोचर नाही असा सूक्ष्म नाद त्या नादाला सक्षम प्राण व अत्यत कोवळे मनाचे स्फुरण याचा सयोग होऊन परा पाचा झाली ८ पदच -मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञा या सहापैकी पहिले मूलाधार चक्र है गुदद्वारस्थित आहे ९ बारीक १० लुटलुटीतपणा, पुष्टि ११ दुसरी वाचा, हिचे नाव सार्थ आहे हिला शब्द दिसतात, परतु उधारपास वा असमर्थ आहे १२ आपसात भाडण १३ प्राण, अपान, ज्यान, उदान व समान मुख्य पच प्राण पदय -मूलाधारछटीतपणा,