Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१८ एकनाथी भागवत. पूजावी ॥ ३१ ॥ हृदय कवच शिखा नेत्र । शक्तिवीज मंत्रास्त्र । स्थंडिली रेखूनियां यंत्र । धराधरमहापूजा ॥ ३२ ॥ यापरी पृथ्वीपूजन । साङ्ग सांगीतले जाण । आपुले आपण पूजास्थान । दहावे लक्षण तें ऐक ।। ३३ ।। आधी एक पुढें पूर्ण । त्या नांव दहावे लक्षण। आपले आपण पूजास्थान । विचित्र विदान पूजेचे ॥ ३४॥ पूज्यापुढें पूज्यकोटी । केल्या गणितासी पडे तुटी । पहिल्या पूज्यासी 5 फाटा उठी । तैं गणितसृष्टी असंख्य ॥ ३५ ॥ पूर्णासी फांटा काढिजे । त्या नांव एक हणिजे । एकपणेही पूर्ण असिजे । सहज निजे परिपूर्ण ॥ ३६ ॥ पूर्णापुढे पूर्ण पडे । तै गणित काय आतुडे । जै निचौडा चाड वाढे। से निजनिवाडें निजपूजा ॥ ३७॥ एकासी एक मेळविजे । ते दोनीपणे होय दुजें । जै एके एक भाँगिजे । तै देखिजे निजपूज्यत्व ॥३८॥ आपणचि आपला देवो । आपुला पूजक आपण पहा यो । आपुला आपणचि भावो । नवल नवलावो पूजेचा ॥ ३९ ॥ हृदयीं भावूनि चैतन्यधन । स्वयें तद्रूप होऊनि जाण । मग जे भोग भोगी आपण । ब्रह्मार्पण सहजेचि ॥ १४४० ।। तो ग्रास घाली स्वमुखी । तेणे मुखें मी होय सुखी । तृप्ति उपजे परमपुरुखी । पूजा नेटकी हे माझी ॥४१॥ तो जे जे काही भोग भोगी । ते अर्पती मजचिलागी । मी रगलों त्याचे रगीं । पावे श्रीरंगी ते पूजा ॥ ४२ ॥ मुख्य पूजेमाजी हे माझी पूजा । तेणेचि पूजिले मज अतिवोजा । पूजामिसे गरुडध्वजा । वश अधोक्षजा तेणे केले ॥ ४३ ॥ हे आवडती माझी पूजा । अत्यंत प्रिय अधोक्षजा । हे भक्ति पढिये गरुडध्वजा । जाण तो माझा प्रिय भक्त ॥ ४४ ॥ हो का सगुण अथवा निर्गुण । दोही रूपं मीचि जाण । तेथ जो करी निजभोग अर्पण । शुद्ध पूजन तें माझें ॥ ४५ ॥ निजात्मभोगी अधोक्षजा। पूजिजे ते हे जाण पूजा । सर्व भूतातें पूजिजे बोजा । समसाम्य समजा समभावे ॥४६॥ अकरावे पूजेचा विवेक । मागा पुढा एकएक । अकरा इंद्रिया पड़े आख । तोचि पूजक सर्व भूता ॥४७॥ मगां पुढां एकएक कीजे । त्या नांव एकादश मणिजे । हाचि विवेक जेणे जाणिजे । तेणे पूजिजे सर्व भूतां ॥४८॥ आत्मभोग मंदर्पणे पाहीं । वस्तू जाणितली स्वदेही । तेचि सर्व भूताच्या ठायीं । देहीविदेही समसाम्य ॥४९॥ सर्व क्षेत्रातें धागविता । मी क्षेत्रजुजाण तत्त्वता । देखताही विषम भूताज्यासी माझी ममता मोडेना ॥१४५० ॥ उच नीच विषमता भूता । वस्तूसी न देखे विषमता । समसाम्य समान समता । सर्व भूतां समत्वे ॥५१॥ माझिया साम्य सर्वसमता । तेचि पूजा सर्व भूतां । तोचि पूजक तत्त्वता । ज्यासी विपमता बाधीना ॥५२॥ जो भावार्थे मजमाजी आला । ते सर्व भूतें तोचि झाला । सहजे ममत्व पावला । पूजू लागला आत्मत्वे ॥ ५३॥ पूजू जाणे रक रावो । परी पालटेना समभावो । न खडिता समतेचा ठावो । यथायोग्य पहा वो पूजित ॥ ५४॥ ऐक यदुवंशध्वजा । सर्व भूती माझी पूजा । माझेनि समत्वे निपजे वोजा। । या अकराही पूजा समत्वे ॥ ५५ ॥ इयें अकराही अधिष्ठानें । मत्प्राप्तिकरें अतिपावने । म्या सांगीतलेनि अनुसधाने । पूजा करणे यथाविधि ।।५६ ।। म्या सांगीतले ज्या निगुती। पूजा करावी त्याचि स्थिती । न कळे तरी माझी मूर्ती । सर्वाहिमती चिंतावी ॥ ५७ ॥ १ प्रसार २ सापटे ३ निष्कामाला ४ पाविजे ५ फार अगत्याने ६ आवडती ७ आकडा ८ मला भर्पण फेल्या, समर्पण शरीराला १. विपमन्यूनता ११ उद्धवा १२ ही १३ माझी प्राप्ति करून देणारी. १४ पद्धतीने १५ सर्वाधिष्ठानी माझी मुर्ती । उत्रित्त चित्ती चिंतावी। -- - - -