Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. भक्ति जाण । अविद्यानिरसन तिचेनी ॥१॥ येर आर्त जिज्ञासु अर्थार्थी । जे जे भक्तीतें आदरिती । ते अविद्यायुक्त निश्चितीं । चौथी भक्ति मुख्यत्वे माझी ॥२॥ जे भक्तीमाजी कंहीं । अविद्येचा विटाळू नाहीं। भजन तरी ठायींच्या ठायी । अनायासे पाहीं होतसे ॥३॥ ते माझी आवडती भक्ती । उद्धवा जाण निश्चितीं । जीसी अविद्या असे धाकती । सर्व धर्म कापती सर्वदा ॥ ४॥ ते भक्तीची देखोनि गुढी । अविद्या धार्केचि प्राण सांडी । सर्व धर्माची आवडी । घायेंवीण बापुडी निमाली ॥ ५॥ हा मद्भक्तीचा पर्यावो । आवडीच्या गोडिया सागे देवो । ऐक भक्ताचा भजनभावो । 'जेणे निर्वाहो भक्तीचा ॥ ६ ॥ माझेनि अनुसधानेवीण । स्नान सध्या जप होम दान । ते अवघेचि अधर्म जाण । मद्धजन ते नव्हे ॥७॥ गोडी आवडी ते परपुरुषी । मिथ्या लुडबुडी निजपतीपाशी । ते पतिव्रता नव्हे जैगी । जाण भक्ति तैशी व्यभिचारी ॥ ८॥ नाना विपयी ठेवूनि मन । जो करी ध्यान अनुष्ठान । तें जारस्त्रियेच्या ऐसे जाण । नव्हे पायन ते भक्ती ॥९॥काया वाचा मनसा । माझे भक्तीचा पडला ठसा । भजतां नाठवे दिवसनिशा । भक्तीची दशा या नाव ॥१११० ॥ जवीण नाम वदनीं । धारणेवीण ध्यान मनीं । संकल्पेंवीण मदर्पर्णी । सर्व कर्मे करूनी सर्वदा ॥ ११॥ निरोधेवीणं वायुरोधू । मर्यादेवीण स्वरूपवोधू । विपयेंवीण सदा स्वानदू । मद्भक्त शुद्धू या नांव ॥ १२ ॥ भक्त मणवितां गोड वाटे । परी भजनमार्गी हृदय फुटे । अंकृत्रिम भक्ति जै उमटे । तैं मी भेटें उद्धवा ॥ १३॥ ऐसेनि भजनें जो भजत । तो मजमाजी मी त्याआंत । भक्तामाजी जो उत्तम भक्त । साधू निश्चित या नांव ॥ १४ ॥ तो पुरुपामाजी पुरुषोत्तम । साधूंमाजी अतिउत्तम । तो माझें विश्रामधाम । अकृत्रिम उद्धवा ॥ १५॥ तयालागी मी आपण । करी सर्वांगाचें आंथरुण । जीवे सर्वखें निंबलोण । प्रतिपदी जाण मी करीं ॥१६॥ तो मज आवडे ह्मणशी कैसा । जीवासी पढिये प्राण जैसा । सागतां उत्तम भक्तदशा । प्रेमपिसा देवो जाला ॥१७॥ मग न धरतु न सांवरतु । उद्धवासी कडिये घेतु । भुलला स्वानंदें नाचतु । विस्मये स्फुदतु उद्धवू ॥१८॥ मी एकु देवो हा एकु भक्तु । हेही विसरला श्रीकृष्णनाथु । हा देवो मी एकु भक्तु । तें उद्धवाआतु नुरेची ॥ १९ ॥ ऐसे भक्तिसाम्राज्यपटीं । दोघा पडली ऐक्यगाठी । तंव देवोचि कळवळला पोटीं । निजभक्तगोठी सागावया ।। ११२० ॥ ऐशी उत्तम भक्तांची कथा । अतिशय आवडे कृष्णनाया । रुचलेपणे तत्वतां । मागुता मागुतां सागतू ।। २१ ॥ श्लोकी प्रमेये दिसतां अनेगें। ते श्रीकृष्णे साडूनि मागें । हा ग्रथाधू श्रीरगें। साक्षे स्वांग लिहविला ॥ २२ ॥ हे माझे युक्तीची कथा । नव्हे नव्हे जी सर्वथा । सत्य मानावे श्रोता । ये अर्थीचा वक्ता श्रीकृष्ण ॥ २३ ॥ श्रोता व्हावे सावधान । मागील कथाअनुसधान । दोघा पडिले होते आलिंगन । विस्मयें पूर्ण उद्धवू ॥ २४ ॥ चढत प्रेमाचे भरते । ते आवरोनि कृष्णनाये । थापनि उद्धवात । सावध त्याते करी हरी ॥ २५ ॥ उडवात मिणारी २ नाहीशी झाली ३ प्रकार ४ जाणे ५ ध्यान, सानसंध्यादि कमें अधर्म नव्हत, ही कम करीत असताना । भगयताचें अनुसंधान जर कायम नसेल तर हा निरर्यक्य होत की खतपणाने काही उद्धार करणारी नव्हत, जर फर्म मदर्पण असेल तर तो धर्म ६ जपायाचून नामस्मरण हाच जप होतो ७ प्राणायामादि आठारी न करिताही मगरपणा समजलागी ज का दृदय १० अव्यभिचारिणी ११ स्वस्थतेच घर १२ तो मजफाडे १३ प्रिय. १४मा बेटा १५ भादरम्याम शस्य. १६ ओक १७ भापडीच्या उद्योगाने