Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा यंती भक्ती कोण । तेंही लक्षण सांगावे ।। ८०० ।। भक्तीमाजी भक्ति संधर । जे का तुझी प्राप्तिकर । अतिउत्तम परात्पर । सती निरंतर आदरिली ॥ १ ॥ सती आदरिले जे भक्तीसी । सतासी पुसों जाये हाणसी । मज विश्वास तुझिया वचनासी । पुसी आणिकासी मानेना ॥२॥जे ज्या देवतांतरा भजती । तेती उत्तम भक्ति हाणती । तब मानली जे श्रीपती । ते मजप्रती सागावी ॥ ३ ॥ समान कुळशीळमवादु । ते तसियासीच झणती साधु । तू निजमुखे जो ह्मणसी शुद्ध । तो मज बंधु सर्वथा ॥४॥ती सबोधनी सारंगधरू । उद्धव प्राथूनि करी सादरू । ती विशेषणी निजविचारू । श्रवणाधिकारू सागतु ।। ५ ।। एतन्मे पुस्पाध्यक्ष सरोकाध्यक्ष जगत्प्रभो । मणतायानुराय अपनाय च पथ्यताम् ॥ २७ ॥ पुरुषी पुरुषोत्तम तूचि की । तूंचि कर्मधर्माचा विवेकी । यालागी बोलिजे पुरुपाध्यक्षी । सर्वसाक्षी गोविदा ॥ ६ ॥ जैसे कर्म तैसा फळदाता । यालागीं चोलिजे लोकाध्यक्षता । तंचि ब्रह्मादिकाचा नियंता । प्रतिपाळिता जगाचा ॥७॥हो का भी जगाचा प्रतिपालिता। त्या जगामाजी तूंही असता । तुजचि सागावी ज्ञानकथा । हे अधिकता का ह्मणसी ॥ ८ ॥ जरी तू सर्वज्ञ सर्वेश्वरू । अतर्यामी नियंता ईश्वरू । जरी देखसी माझा अधिकारू । तरी ज्ञाननिर्धारू सागाया ॥९॥ हो का मज अधिकारू नाही । तरी शरण आलो तुज पाहीं । शरणागताची तुझ्या ठायीं । उपेक्षा नाही सर्वथा ॥ ८१० ॥ विषयीं देखोनि योर दुःख झालो तुझिया चरणासमुस । अतिदीन मी तुझें रक । कृपा आवश्यक तुवां कीजे ॥११॥ माझ्या दुर्जय वासना । अनिवार मज निधारतीना । त्या तू निवारीं श्रीकृष्णा । शरण चरणा यालागीं ॥ १२ ॥ मी एक भक्त अनुरक्तु । ऐसे बोलता बहु गर्व दिसतु । तू सर्वज श्रीअनंतु । कृपावंतु दीनाचा ॥ १३ ॥ मी एकु श्रवणाधिकारी । हेही न ह्मणये गा मुरारी । ऐसे बोलोनिया पाय धरी । कृपा करी कृपानिधि ॥ १४ ॥ माझी स्वगोत्र सखे सहज । पाय धरणे न घडे तुज । या ह्मणणियाचें निजवीज । कळले मज गोविदा ॥ १५ ॥ व महा परम व्योम पुरुष प्रकृतेः पर । अवतीर्णोमि भगवन् स्वेच्छोपात्तपथग्य। ॥ २८ ॥ तूं निर्गुण निनिशेपे । चिन्मात्रैक चिदाकाश । पुरुपामाजी उत्तम पुरुष । वद्य सांस तूंएक ॥ १६ ॥ तूं ब्रह्म गा निर्विकार । प्रकृतिपुरुषाहोनि पर । तुझा वेदशास्त्रा न कळे पार । अगोचर इद्रिया ॥ १७ ॥ ऐक आमुचे भाग्याची कळा । त्या तुज प्रत्यक्ष देखती डोळा । मुकुटकुंडले वनमाळा । घनसावळा शोभतु ॥१८॥ सुदर राजीवलोचन । पीतावर परिधान । देखोनि निताहे तनुमन । तू जगजीवन जगाचा ॥ १९ ॥ त्या तुझें दर्शन अतिगोड । देखता पुरे जगाचे कोडे । त्याही देहाची तुज नाही चाड । ऐसा निचोड तू देवा ॥८२० ॥ तरी भक्तकृपेचा कळवळा । धरिसी नानावतारमाळा । भक्तइच्छा तू खलीळा । देहाचा सोहळा दाविसी ॥ २१ ॥ भक्तकृपेने तत्त्वता । तूं अवतरलासी कृष्ण १माझी भक्ति सधर २ श्रेष्ठ ३ अन्य देवताना ४ श्लोक २७ तील ती सबुद्धि ५ ऐकम्याचा अधिकार. ६सचिवज्ञान ७ नजिरल्या जाणा-या पासना ८ हरी ९ तुझ्मा नत जमलेले व तुझे मित्र १० सर रहम्य, गुम भर्थ ११ सर्वन समान १२ दूर, मप्रकट १३ कमलनेत १४ निवात राहे १५ आवड, उद १६ निप्वाम, अलिप्त "मग निळर गहा। उपजेल भात्मज्ञान । तेणे निचाड होईल मन । मापसे तुझें" (शायरी अध्याय २-२८१). १७ कळवळ्याने 4 .