पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९० एकनाथी भागवत. प्रकाशीं ॥ ७९ ॥ ऐशिया प्रकाशाची जे प्राप्ती । ते जाण सनातन माझी भक्ती । उडवा म्यां हे तुजप्रती । यथानिगुती सांगीतली ॥ ७८० ॥ निश्चळभक्ती सनातन । हे मुळीचे पदव्याख्यान । यालागी भक्ति सनातन । समूळ जाण बोलिलों ॥ ८१ ॥ साडूनि पदपदार्था । नाही बोलिलों जी वृथा । सावधान व्हावें श्रोतां । पुढील कथा अनुपम ।। ८२॥ उद्धवा हे ऐशी माझी भक्ती । कैसेनि ह्मणसी होये प्राप्ती । भावे धरिलिया सत्सगती। माझी भक्ती उद्बोधे ॥ ८३ ॥ __ सत्सङ्गलब्धया भक्त्या मयि मां समुपासिता । स वै मे दर्शित सद्भिरजसा विन्दते पदम् ॥ २५ ॥ मुख्यत्वे सतांची सेवा । हेंचि साधन आवडे देवा । सतवचने निजभाषा । देतुसे तेव्हां निजभक्ती ॥ ८४ ॥ ज्यासी आवडे सतैसंगाचा मेळू । जो साधुवचनी अति कोलू । जो पडिलें वचन नेणे उंगळू । तोचि पायाळू निजभक्ती ॥ ८५ ॥ साधुवचनी श्रद्धा भारी । देखोनियां निजनिर्धारी । त्यावरी सद्गुरु कृपा करी । साधु चराचरी गुरुरावो ॥ ८६ ॥ गुरुवाचोनि तत्त्वतां । नाहीं ससारी तारिता । गुरुवचने निजभक्तिदाता । मीचि सर्वथा भक्तांसी ॥ ८७ ॥ सद्गुरु जो ससारी । त्याची आज्ञा मी वाहे शिरी । तो ज्यावरी कृपा करी । तो मी उद्धरी तात्काळ ॥ ८८ ॥ त्या सद्गुरूचे भजन । जो मद्रूपें करी जाण । त्याचे मज पढियंतेपण । माझेनिहि जाण न बोलवे ॥ ८९ ॥ त्याचा इहलोक परलोक । दोन्ही चालविता मीचि देख । त्याचे मज अत्यंत सुख । हरिख हरिख चोसडे ॥७९०॥ त्यासी गुरूने जो दाविला मार्ग । चालतां न पड़े प्रयासपार्ग । मी सामोरा धावें श्रीरग । आपुले सर्वांग मी बोर्डवीं ॥ ९१ ॥ तेणे जावे ज्या पदासी । ते पदचि मी आणी त्यापासीं । सतभजनी प्रीति ऐसी । हपीकेशी सांगतु ॥ १२॥ ऐसे ऐकोनिया वचन । उद्धवाचें कळवळलें मन । कोण कोण ते साधुजन । त्यांचे निजचिह्न पुसो पां ॥ ९३ ॥ कोण ते भक्तीचे लक्षण । भजती खूण ते कोण कोण । हें समूळ जाणावया आपण । उद्धवे प्रश्न माडिला ॥ ९४॥ उदय उवाच-साधुस्तयोत्तमश्लोक मत कीग्विध प्रभो । भक्तिस्त्वय्युपयुज्येत कीदृशी सद्भिराहता ॥ २६ ॥ ज्ञाते वक्ते आहेत बहुत । परी ते रजतमगुणयुक्त । गुणानुसार निरूपित । त्यासी पुसो चित्त मानीना ॥ ९५ ॥ अथवा साविक केवळ । तो सत्वगुणे विव्हळ । बोलणे बोलतां जाये वरळ । नव्हे केवळ निजबोधू ॥ ९६ ॥ तैसा तूं नव्हेसि कृष्णनाथा । तुजआधीन गुण तत्त्वता । लीलाविग्रहें देहधरिता । निज्ञानवक्ता तूंचि एक ॥ ९७ ॥ यालागी जी उत्तमश्लोक । तुज ह्मणती तीनी लोक । तुजवेगळा आणिक । आह्मांसी देख मानेना ॥९८ ॥ माझिया प्रश्नाचा वक्ता । तूंचि एक कृष्णनाथा । तरी साधु कोण तत्वता । तुज सर्वथा मानला ॥ ९९ ॥ तुज मानले जे साधुजन । त्याचे सपूर्ण साग लक्षण । तुज पढि १निस २ माथानी येथ 'मूळीचे पदव्याख्यान' ह्मणून जे सागितले आहे ते मूळाशी-निदान छापाल प्रताशा सुखपत नाही पुढील ओवीत नाथानी जी प्रतिज्ञा केली आहे तीवरून असें वाटतं की नायांच्या पोथीतला पाठ 'भक्ति मय्युद्धव सनातनीम' असा असावा छापील प्रतीत 'मायुद्धव सनातने अमा पाठ आहे. नाथाचाच पाठ योग्य दिसतो ३ सगसगतिचा.भुकेलेला ५ कानी पडरेले साबुवचा जो ओकीत-बाहेर टाकीत-अव्हेरीत-नाही ६ जसे पायाला गुप्तधा सापडते, तसेच त्याला सय भकीच रहस्स लाभत भावडतेपण, प्रेम ८ भरतीस येऊन वाहू लागतो ९ पाग-प्रम १० पुढे करितों ११ स्थास १२ त्याना पुसणे चित्ताला आवडत नाही १३ भलतीकडे १४ सखरूपज्ञान सांगणारा १५ पुण्यश्लोक, पवित्र आहे यश ज्याचें असा.