Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८८ एकनाथी भागवत,, बंध । करावा विनोद कीर्तनीं ॥ ३२ ॥ जेणें आत्मतत्त्व जोडे जोडी । ऐशिया पदांची घडीमोडी । कीर्तनीं गावी गा आवडी । सतपरवडी बैसवूनी ॥ ३३ ॥ श्रुति मृदंग टाळ घोळ । मेळयूनि वैष्णवांचा मेळ । कीर्तनी करावा गदारोळ । काळवेळ न ह्मणावा ॥ ३४॥ दशमी दिंडी जागरणे । आळस सांडूनि गावें वॉणे । हावभावो दाखवणे । कर्म स्मरणे माझेनि ॥ ३५ ॥ ओढूनि धनुष्याची वोढी । त्र्यंबक मोडिले कडाडी । मी राम ह्मणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनी ॥ ३६ ।। गोवर्धन उचलिला । दावाग्नि प्राशियेला । तो तो विन्यासू दाविला । सेतु बाधिला अनुकारू ॥ ३७॥ आळस दवडूनि दूरी। अभिमान घालोनिया वाहेरी । अहर्निशी कीर्तन करी । गर्व न धरी गाणिवेचा ॥ ३८ ॥ गाणीव जाणीव शहाणीव । वोवाळूनि सांडावे सर्व । सप्रेम सावडी कथागौरब ! सुख अभिनव तेणे मज ॥ ३९ ॥ गर्जत नामाच्या कल्लोळी । नामासरसी बाजे टाळी । महापातकां जाली होळी । ते वैष्णवमेळी मी उभा ॥७४० ॥ जे सुख क्षीरसागरी नसे । पाहतां वैकुंठीही न दिसे । तें सुख मज कीर्तनी असे । कीर्तनवशे डुल्लतु ॥४१॥ मज सप्रेमाची आवडी भारी | भक्तभावाचिया कुसरी । मीही कीर्तनी नृत्य करीं । छंदतालावरी विनोदें ॥४२॥ ऐशिया कीर्तनपरिपाटी । वुडाल्या प्रायश्चित्तांच्या कोटी । खुंटली यमदूतराहाटी। काढिली कांटी पापाची ॥४३॥ नामस्मरणाच्या आवडी । लाजल्या मंत्रवीजाच्या कोडी। तपादि साधने वापुडी । जाली वेडी हरिनामें ॥ ४४ ॥ ऐकोनि हरिनामाचा घोखें । योगयागी लपविले मुख । धाके पळालें विषयसुख । विराले देख अधर्म ॥ ४५ ॥ हरिनामाच्या कडकडाटीं । दोष रिघाले दिक्पटीं । तीर्थाची उतरली उँटी । कीर्तनकसवटी हरिप्रिय ॥ ४६ ॥ माझेनि प्रेमें उन्मत्त होउनी । आवडी कीर्तन अनुदिनीं । मनसा वाचा कर्म करूनी । मजवाचूनी नेणती ॥४७॥ मदर्थे धर्मकामार्थानाचरन्मदपाश्रय । लभते निश्चला भक्तिं मय्युद्धय सनातने ॥ २४ ॥ माझे भक्त जे उत्तम । त्यांचा धर्म अर्थ मीचि काम । मजवेगळा मनोधर्म । अन्यथा कर्म करूं नेणे ॥४८॥ माझं भजन उत्तम कर्म । मैज अर्पे तो शुद्ध धर्म । मजकामने हा शुद्ध काम । ज्याचा आराम मजमाजी ॥ ४९ ॥ वेचूनियां नाना अर्थ । संग्रहो करिती परमार्थ । नन्वर अर्थ में वित्त । ते माझे भक्त न सचिती ॥७५० ॥ ज्याचें धनावरी चित्त । ते केवळ जाण अभक्त । ते जें जें कांहीं भजन करित । तें द्रव्यार्थ नटनाट्य ॥५१॥ भक्तीमाजी विरुद्धपण | विरुद्ध धर्माचें लक्षण । तेंही करीन निरूपण । सावधान अवधारी ।। ५२ ॥ मनसा वाचा कर्म जाण । जेथ नाहीं मंदपेण । तें तें दांभिक भजन । केवळ जाण उदरार्थ ॥ ५३॥ माझें भजन करूनि गौण । जो करूं रिघे धनार्जन । हे भजनविरुद्ध लक्षण । मुख्य जाण भक्ताचें ॥ ५४॥ गाठींचें वेचू नेणे धन । कोरडे करी माझें भजन । मजसी जेणे केले वचन । विरुद्धलक्षण मुख्यत्वे ॥ ५५ ॥ या नांव अर्थ १ ठेव २ सताचे समुदाय, मेळे ३ आरोळ्या, मोठा गजर, निरूपण' ४ मासरेदार, सुरेस ५ मायचि. ६ व्ययकाची ७ सत्वरजतमात्मक व्यवधनुष्य राम झाल्याशिवाय मोडता यावयाचें नाहीं ८ जय अम् तानुभव २-१९ ९ किया, प्रसार १० गायनचातुर्याचा ११ साधी, प्रेमळ, डामटौलाशिवाय १२ महामहा पताका १३ चतुराईन १४ बुपण, गज १५ घोप १६ दिशेकडे, दिगतास गेले,लोपले १७ माहात्म्य, मोठेपणा. १८ कीर्तनाचे चातुर्य १५.त्याचा धर्म अर्थ मीचि काम. २० विधाति २१ मला समर्पण करर्ण २२ पदरचे