________________
अध्याय अकरावा. २८७ हरिकथा । विषयचिंतनी गोडी चित्ता । ते श्रद्धा नव्हे गा सर्वथा । मुख्य विक्षेपता ती नाव ॥७॥ हावभावकटाक्षगुण । सुरतकामनिरूपण । तेथ ज्याचे श्रद्धाश्रवण । रसवादन त्या नाव ॥ ८॥ हरिकथेपाशीं वैसला दिसे । परी कथेपाशी मनही नसे । चित्त भंवे पिसे जैसे । तो कर्मठवसे विक्षेपु ॥ ९॥ नातरी नाना उद्धेगें । ऐकता कथा मनी न लगे। का कषेमाजी झोप लागे । तो जाणावा वेगें लयविक्षेपू ॥ ७१० ॥ श्रवणी ध्यानी चैसत्या पाठी । सगुण निर्गुण काही नुठी । निळे पिवळे पडे दिठी । गुणक्षोभ त्रिपुटी कपाय ॥११॥ श्रवणी ध्यानी हे अवगुण । तैसाचि त्रिविध प्रेमा जाण । तो वोळखती विचक्षण । ऐक लक्षण सागेन ।॥ १२ ॥ महावीराचे शौर्यपण । ऐकोनि युद्ध दारुण । अत्यंत हरिखें उल्हासे मन । तो प्रेमा जाण राजस ॥ १३ ॥ दुःखशोकाची अवस्था । कां गेल्यामेल्याची वार्ता अत्यत विलापाची कथा। ज्यासी ऐकतां न सठे ॥ १४ ॥नेत्री अचिया धारा । स्फुदने कापे यरथरा । प्रेमविलाप अवसरा । तो जाण खरा तामसू ।। १५ ।। सगुणमूर्तीची सर्पदा । शंख चक्र पद्म गदा । पीतांबरधारी गोविदा । ऐकोनि आनंदा जो भरे ॥१६॥ नेत्री आनंदजीवन । हृदयीं न सठे स्फुदन । कृष्णमय जाले मन । तो मेमा जाण सात्विक ॥ १७ ॥ यावरी जो प्रेमा चौथा । अतळ तर्केना सर्वथा । उद्धवा तूं मजलागी पढियता । तोही आता सागेन ॥ १८ ॥ तुझ्या भावार्थाची अवस्था मोटी । ते बोलविते गुह्य गोटी । तुजवेगळा पाहता दृष्टी । अधिकारी सृष्टी दिसेना ॥ १९॥ श्रीकृष्ण हाणे सावधान ! ऐकोनि निर्गुणश्रवण ज्याचें चिन्मात्री बुडे मन । उन्मजन होऊ नेणे ॥७२० ॥ जेवी का सैर्धवाचा खडा । पडला सिधूमाजिवडा । तो झाला सिधूचियेवढा । तेवीं तो धडफुडा ब्रह्म होय ॥ २१ ॥ चित्तचैतन्या पडता मिठी । सुटता लिगदेहांची गाठी नेत्रीं अधूंचा पूर दाटी । रोमांच उठी सर्वांगी ॥ २२ ।। जीवभावाची दशा आटे । अनिवार वाप्प कंठी दाटे । काही केल्या शब्द न फुटे । पूर लोटे स्वेदीचा ॥ २३ ॥ नेत्र झाले उन्मीलित ! पुजाळले जेथिचे तेथ । विस्मयाचे भरतें येत । वोसडत स्वानंदें ॥ २४ ॥ हाजाण पा प्रेमा चौधा । उत्तम भागवत अवस्था । तुज म्या सागीतली तत्त्वता । इचा जाणता मी एकू ॥ २५ ॥ निर्गुणी जो प्रेमा जाण । तें शोधितसत्वाचे लक्षण । हे मी जाणे उणखूण | का ब्राँसपन्न जाणती ।। २६ ॥ उद्धवा श्रद्धायुक्त श्रवण । तेणे येवढी प्राप्ती आहे जाण । श्रद्धाश्रवणाचे महिमान । अतिगहन तिही लोकीं ॥ २७ ॥ सविवेकनैराश्य वक्ता जोडल्या श्रद्धेने ऐकावी कथा ।का सनोन मीनलिया श्रोता । स्वयं कथा सागावी ॥ २८॥ ज श्रोता वक्ता दोन्ही नाही । ते रिघावे मनाच्या ठायीं । का माझी जन्मकम जे काही । एकलाही विचारी ॥ २९॥ साडूनि विपयाची आस । घालोनि ककिकाळावरी,कास । माझ्या कीर्तनी न होनि उदास । अतिउल्हास करावा ॥ ७३० ॥ त्यजूनिया कामाचे वीज | साडूनि लौकिकाची लाज । कीर्तनी नाचावें भोज । गरुडध्वज स्मरोनी ॥ ३१ ॥ रामकृष्ण हरि गोविद । ऐशिया नामाचे प्रबंध । गातां नाना पदें छद १ मर्कटवे २ उठत नाही ३ दृष्टीस ४ हान ५ साटवत नाही, मन न सठे ६ शोमा, लावण्य ५ पर येणे, देह जागृतीवर येणं ८मिठाचा ९ खरोयर १० वासनात्मर देहाची ११ नाहीशी होते, समते १२ घामाचा १३ निकास पावले १४ उताम येतो १५ शुद्ध झाले आहे सत्व ज्याच त्याचे, सवशुद्धि झालेल्या पुरुषाचे चिन्ह १५ तत्वज्ञानी १८ विवेसी आणि निरिच्छ १९ मर्मज्ञ २०. क्वर बांधून २१ सोंगासार, खेरपणे २२ काव्ये