________________
२७८ एकनाथी भागवत मुक्त । जाण निश्चित उद्धचा ॥ ९५ ॥ [मुक्त लौकिकी वर्तत । जंढ-मूह-पिशाचवत । ह्मणोनि कळे इत्थंभूत । तेही चिन्ह यदर्थ सागेन ॥ ९६ ॥] नैष्कर्म्य ब्रह्म पावला दृदु । अंतरी निजबोधे अतिगोडु । बाह्य लौकिकी दिसे जडु । अचेतन दगडू होऊनि असे ॥९७ ॥ उठीवैसी करिते मन । ते स्वरूपी जालें लीन । पडले ठायींहूनि नुठी, जाण । यालागी जडपण आभासे ॥ ९८ ॥ शब्दब्रह्म गिळोनि चेगें । निःशब्द वस्तु जाला अंगें। निदास्तुतीचें नांव नेघे । मुका सर्वांगें सर्वदा ॥ ९९ ॥ ब्रह्म सर्वथा न बोलवे कोणा । जरी सांगे तरी दावी खुणा । यालागी,मुका ह्मणती जाणा । अवोलणा, स्तुतिनिंदा ।। ५०० ।। द्रव्यलोभ नाही चित्तीं । कदा द्रव्ये नातळती । यालागी लोक पिशाच ह्मणती । जाण निश्चिती उद्धवा ॥१॥ नवल त्याचे पिसेर्पण । जगास न करवे में प्राशन । ते वस्तूचे करी आँपोशन । अभक्ष्य जाण भक्षितू ॥ २॥ जेथ जगासी गमन नव्हे जाण । तेथ हा करी अगम्यागमन । जगाचे जेथ न रिघे मन । तेथ सर्वांगें जाण हा वेघे ॥३॥ न धरी विधिनिषेधविभाग । न करी कर्माकर्माचा पांग । स्वानंदें नाचवी सांग । यालागी जग पिसे ह्मणे ॥ ४ ॥ एवं जड मूक पिशाच । समूळ लक्षणीं तोचि साच । मिथ्या नव्हती अहाचवहाच । वृथा कचकच तो नेणे ॥ ५॥ जाण पां मुक्ताच्या ठायीं । कोणे विपयीं आग्रह नाही । जो अतिशयसी आग्रही । तो बद्ध पाही निश्चित ॥ ६ ॥जी बोलिली मुक्ताची लक्षणे । तींचि साधकाची साधने । सिद्धासी असती सहजगुणे । साध करणे दृढनिष्ठा ॥७॥ बोलिलिया लक्षणां । सिद्धचि भोक्ता जाणा । साधकूहि येथ लहाणा। जो या साधना साधू जाणे ॥ ८॥ इतर जे पंडिताभिमानी । आही शास्त्रज्ञ ज्ञाते हाणीनी । ते वौळिले येथूनी । जेवी सज्जनी दुर्बुद्धी ॥९॥ जो न साधी येथींच्या साधना। कोरडा शास्त्राभिमानी जाणा । सदा वांच्छिता धनमाना । तो येथींच्या ज्ञाना अलिप्त ॥५१० ॥ आली कर्मकुशळ याज्ञिक । शास्त्रसपन्न वेदपाठक । सदा अर्थकामकामुक । त्यासी हे सुख अप्राप्त ॥ ११ ॥ तिहीं जे कष्ट केले सर्वथा। ते समस्त जाण जाले वृथा । उद्धवा तेहीविखी तत्त्वतां । ऐक आता सांगेनः ॥ १२ ॥ 1 शब्दब्रह्मणि निष्णातो न निष्पायारपरे यदि । नमलस्य श्रमफलो यधेनुमिव रक्षत ॥ १८ ॥ । शब्दब्रह्म वेदशास्त्रार्थ । पढोनि वाचोनि अति पडित । चारी वेद मूर्तिमंत । सदा तिष्ठत वाचेसी॥१शासहिता पद क्रम स्वरयुक्त । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्त जिंटा माला ध्वज रथ । पढा जाणत वर्णक ॥१४॥आयर्वेद धनवंद ।गाधर्ववेदींचा जाणे भेद । काव्यनाटकी अतिशुद्ध । वेद उपवेद तो जाणे ।। १५॥ व्याकरणी अतिनेटक । सांख्य पातळ जाणे तक । शास्त्र जाणे वैशेषिक । कर्ममीमासक यज्ञांत ॥१६॥ विवर्ण वाचस्पति वेदात । शास्त्र जाणे वार्तिकात । तिन्ही प्रस्थाने मूर्तिमंत । पुढा, तिष्ठत योग्यत्वें ॥ १७ ॥ शिल्पशास्त्रीं अतिनिपुण । सूपशास्त्रामाजी प्रवीण।रत्नपरीक्षालक्षण । जाणे आपण चौजिवाह ॥ १८॥ आगमी १ यासाठी २ सहेतुक कर्मे सुटलेला ३ आत्मज्ञानाने ४ मन सकल्पविकल्प उभारते व मोडते ५ प्राप्त होत नाहीत ६ वेड ५ नि शेष प्राशन करण, अपेयपान ८ चढतो ९ कर्तव्यास्तव्यविचार १० खटाटोप ११ वरवर १२ वटे, तुझे माझे किंवा तू मी करणे १३ सिद्धाची सहज लक्षणे ती साधने आहेत १४ लाभाचा विभागी - १५ दर टाकिले १६ कोरडा १७ विपयाभिलाषी १८ उपनिषदे १९ जा, माला, घन, रथ इखादि वेदाच्या निरनिराळ्या विकृति साहेत २० मागतात, जिन्हेबर राहतात २१ योगशास्त्र २२ मायशास्त्र, २३ पाकशास्त्रात. २४ अवशान