Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० एकनाथी भागवत चळता वायू जाण । तितुकें मुक्ताचे प्राण । यापरी गंधग्रहण । स्वभावें जाण होतसे ॥६॥ यापरी जाण तत्त्वतां । होय तो गंधाचा भोक्ता । हे प्राणक्रिया जाण मुक्ता । रसभोग्यता अवधारीं ॥ ७ ॥ रस रसना भोजन । तो स्वयेंचि आहे आपण । हातू न माखितां सर्वापोशन । रसनेविण सेवितू ॥ ८॥ पडूसांचा स्वादू जाणे । परी एकी चवी अवघे खाणें । भोक्तेपणा आतलों नेणे । ऐसेनि भोजने नित्यतृतु ॥ ९॥ भूक उपजोचि नेणे । जेयूं बैसल्या पुरे न ह्मणे । सर्व भक्षी नखातेपणे । उच्छिष्ट होणे ' त्या नाही ॥ ३१० ॥ ताट अन्न आणि आपण । तो न देखे मिन्नपण । रसमिसे स्वानंदपूर्ण । सर्वांगे जाण सेवित ॥११॥ जंव रसना घेवों जाय रसस्वादू । तंव तेथे प्रकटे परमानंदू । करूनि रसरसने उच्छेदू । निजानंदू सेवितु ॥१२॥ सकळ गोडियाची मूळ गोडी । तेथ वैसली निजआवडी । सेविता नाना परवडी । तेचि गोडी गोडपणें ॥ १३ ॥ सकळ गोडियां जे गोड आहे । ते गोडीचं तो जाला स्वयें । आतां जो जो रसविषयो खाये । तेय तेथ आहे ते गोडी ॥१४॥ कैसा मुक्ताचा निजवोधू । घेवों जातां रसस्वादू । रसत्व लोपूनि स्वानंदकंदू । परमानंदू वोसडे ॥ १५ ॥ यालागी जो जो रस सेवू जाये। तो तो ब्रह्मरसूच होये । मुक्ताची रसना यापरी पाहे । घेत आहे रसातें ॥ १६ ॥ एवं मुक्ताचे में भोजन । ते करिती क्रिया ऐशी जाण । आतां तयाचें स्पर्शन । तेंही लक्षण परियेसीं ॥ १७ ॥ मुक्तासीं लागतांचि जाणा । शीत सांडी शीतळपणा । स्पर्श उष्ण मुकले उष्णा । स्पर्शनलक्षणा हे त्याची ॥१८॥ जेवीं का टेंकिता अग्नीशी । धुरे आणि चंदनाशी । जालूनि त्यांच्या विकाराशी । आपणाऐशी करी वह्नी ॥ १९ ॥ तेवी मुक्तासी द्वंद्वे आदळता । द्वंद्वाची बुडाली द्वंद्वता । तो सर्वी सर्वपणे असतां । सहजें वंद्वता निमाली ॥ ३२० ॥ तेथ कैचें मृदु कैचें कठिण । कैचे शीत कैचे उष्ण । सर्वी सर्वात्मा तो जाण । द्वंद्वाचे भान स्पर्शेना ।। २१॥ आगीसी पोळीना उन्हाळा । हींव पीडीना हिमाचळा । तैशी द्वंद्वाची हे माळा । मुक्ताचे गळा पडेना ॥२२॥सुवर्णाचे अलंकार भले । सुवर्णपेटीमाजी झांकिले । झांकिले ह्मणतां उघडे ठेले । तेवीं वंद्रे सकळे परब्रह्म ॥ २३ ॥ त्यासी अंगीं जें जें आदळे । ते अगचि होय तत्काळ । कांही नुरे त्यावेगळें । द्वंद्वे सकळे निमालीं ॥ २४ ॥ हाती लीलाकमळ सापडे। तंव कमळी कमळत्वचि उडे । कमळजन्मा तोही बुडे । करी रोक. निजरूप ॥२५॥ स्पर्श स्पर्शते स्पर्शाचे । हेही त्रिपुटी न सभवे । किबहुना आपणचि आघवे । निजस्वभावे होऊनि ठेला ॥ २६ ॥ तो देवपूजा हातीं धरी । तरी मीचि ते देवपूजेभीतरी । अथवा खेळो रिघाल्या पाथरी । त्याहीमाझारी मी त्यासी ॥ २७ ॥ भिंती नानावर्ण चित्राकृती । तेथे जे जे स्पर्शे ते तेंभिंती । तेवीं मुक्ताची स्पर्शनस्थिती । पूर्ण अद्वैती निजबोधू ॥२८॥ यापरी गा तत्वतां । स्पर्शलक्षण वर्ते मुक्ता । त्याचे बोलणे जे सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥ सुरस कथा सागे वाकोडें । अथवा लौकिक बोलणे घडे । परी त्याची समाधिमुद्रा न खंडे । मौन १, श्रवणकार्य. २ सर्वांचे भक्षण ३ कटु, आम्ल (भायट), लयण (सारद), तुरट, तीक्ष्ण (तिपद), व मधुर ४ शिवत नाही ५ काही सात नसून सर्वभक्षण करणारा आहे ! आत्मा जसा सर्वव्यापक तसा मुक्तही सवात्मक पणाचे भोग भोगतो ताट, अन्न व आपण एकपणे पाहतो ६ सप्टें ७ प्रकार या सर्व ओंव्या अत्यत मधुर आहेत. ९ मरून जातो १० रसभोजन ११ त्याच्या ठार्या समत्व असल्यामुळे द्वढे सापाशी येताच आपले गुणधर्म सोडून याच समव अंगीकारितात १२ लोपली १३ दृष्टांत फारच बहारीचा आहे १४ मिडते १५पायर-अन्तर, फसर, दगड