________________
२६० एकनाथी भागवत व्यथा । शोक सर्वथा या नांव ॥ ७७ ॥ काढावया आरगांतील धन । करी दर्पणामाजी खनन । फुटल्या नागवलों हाणे जाण । शोक दारुण या नांव ॥ ७८ ॥ नसते वस्तूच्या ठायीं जाण । मी माझे हा अभिमान । तेंचि मोहाचे लक्षण । ममता दारुण ते सधी ॥७९॥ देखोनि मृगजळाचे तळे । येणे पिकती रायकेलें । यालागी मृगतृष्णेची जळें । औटेकाळे राखतू ॥ ८० ॥ मृगजळाकडे कोणी भंवें । त्यासीं सक्रोधे भाई धावे । अतिमोहित मोहस्वभावें । विवेकून करवे सत्याचा ॥ ८१॥ तेवी पुत्रापामोन सुखप्राप्ती । माता पिता होईल ह्मणती । शेखी पुत्र अगोठा दाविती । केवळ भ्रांतिमोहो ।। ८२ ॥ गंधर्वनगरीची रचना । देखोनि अभिलाप होय मना । ते घ्यावया मेळवी सेना । नानासूचनाउपायें ॥ ८३ ॥ तैसा मिथ्या देही अभिमान । देहसबंधाची ममता गहन । हेचि मोहाचे मूळ लक्षण । ममताभिमान प्राणियां ॥ ८४ ॥ एवं अहं आणि ममता । हेचि मोहाची माता पिता । त्याचेनि उत्तरोत्तर वाढता । जनमोहिता व्यामोहो ॥ ८५ ॥ प्रियविपयीं आसक्ति देख । याची नित्यप्राप्ती अनेक । त्याचि नांव ह्मणती सुख । जेवी चाखितां विस अतिमधुर ।। ८६ ॥ विषयप्राप्ती जो हरिख । तया नांय ह्मणती सुख । विषयविनाश तेंचि दुःख । परम असुख त्या नाथ ॥ ८७ ॥ शोक मोह सुख दुःख । येणेचि देहाची प्राप्ती देख । देहाभिमाने देह अनेक । दुखदायक भोगवी ॥ ८८ ॥ जो जेणे तीव्रध्याने मरे । तो तेचि होऊनि अवतरे । का जो निमें" अतिद्वेपकारें । तो द्वेषानुसारें जन्मत् ॥८९॥ सर्प मुंगुस पूर्ववृत्ती । वैराकारें जन्म पावती । जे जे वासना उरे अंतीं । ते ते गती प्राण्यासी ॥९०॥ यालागी हृदयामाजी निश्चिती । जे सबळ वासना उठे अती । तो तो प्राणी पावे तिये गती । श्रुति बोलती पुराणे ॥ ९१ ॥ पुरुपासवे वृथा छाया । तैशी ब्रह्मीं निथ्या माया । ते उपजवी गुणकार्या । देह भासावया मूळ ते ॥ ९२ ॥ जेवी का स्वमीं एकले मन । नानाकार होय आपण । तेची चैतन्याचे अन्यथाभान । तें हैं जाण चराचर ॥ ९३ ॥ एवं वस्तुता ससार नाहीं । तेथें सुखदुःख कैचें कायी । देहेंवीण छाया पाही । कोणे ठायीं उपजेल ॥ ९४ ॥ जे उपजलेच नाही । ते काळे गोरें सांगो कायी । अवघे स्वमप्राय पाहीं। वस्तुतां नाही संसारू ॥ ९५ ॥ इही दोहीं श्लोकी अगाधू । परिहरिला वस्तुविरोधू । आता प्रतीतीने जो अनुरोधू । तो सत्या वाधू करूं न शके ॥ ९६ ॥ डोळा अगुळी लाविती । तेणे दोन चंद्र आभासती । गगनीं दो चद्रां नाही वस्ती । मिथ्या प्रतीती निराकारी ॥१७॥ निद्याऽविद्ये मम तनू विधुद्धव शरीरिणाम् । मोक्षनन्धकरी आये मायया में विनिर्मिते ॥ ३ ॥ निजबोधे येत वोधा । ब्राहमस्मि स्फुरे सदा । ते जाण शुद्ध विद्या । जे अविधीछेदक ॥ ९८॥ मी पापी मी सदा निर्देवो । ऐसा नित्य स्फुरे भायो । तेचि सवळ अविद्या पहा हो । जे नाना सदेहो उपजवी ।। ९९ ॥ एकी जीवाते घाली बंदी । एकी जीवाचें १ खगणे २ युदगलों ३ या काळी ४ राजेळी केळी, नारिकेळे ५ क्षणभर ६ पाहे ७ अगठा दासवितात, सुस देत नाहीत 'अगठा दासवितात' ही लोकोकि प्रसिद्ध आहे. हिचा अर्थ नकारार्थी आहे ८ त्यामोह ९दुरा १० मिळणे ११ मरतो १० 'अते मति सा गति' १३ मिथ्याभान, एक असून दुसरं भासणे १४ पदार्थातील परस्परविरोध १५ मउभया १६ अगुकूलता १७ निराकारावर १८ मी ब्रह्म आह अमें स्फुरण देणारी ती विद्या १९ भविद्यानाशक,