पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. परी । सकामासी विघ्ने भारी । फळ अंतरले दूरी । विघ्नसागरी बुडाले ॥ १९ ॥ स्वर्ग एकु याज्ञिक बहुत । यागी देव विघ्नं करित 1 मुख्य इंद्र विना प्रवर्तत । स्वर्ग राखत निजभोगा ।। ५२० ॥ एकी वेश्या एकी राती । येथ सकाम नहुत येती । ते जैसे कलहो करिती । तैशी गती याज्ञिका ॥ २१ ॥ कां शुनी जैशी ऋतुस्नात । तिसी भोगू येती श्वान बहुत । परस्परें गुरगुरित । तैसा स्वर्ग भोगत सकामं ॥ २२ ॥ तेथ ज्यासी भोग घडे । भोगू जातां अडकोनि पडे । भंडिमा होय जगापुढें । सज्ञान तोडें धुंकिती ।। २३ ॥ जिचे भोगू जाय सुख । अडकल्या ते होय विमुख । मैथुनद्वारे गुंतल्या देख । थुकिती लोक मुखामुखी ॥ २४ ॥ तैशी याज्ञिका स्वर्गप्राप्ती । भोगें होय तपच्युती । स्वर्गभोगी गुतली आसक्ती । विमुख पडती इहलोकी ॥ २५ ॥ एवं कृपीवळाचिया परी । स्वर्गमाप्तीसी विनें भारी । केले कष्ट वृथा करी । भोगु कैशा परी घडेल ॥ २६ ॥ एक ह्मणती कर्मकुशळ । आही कर्म हो "ने, विकळ । अच्छिद्र साधूनि सकळ । स्वर्गसुखफळ भोगू ॥ २७ ॥ उद्धवा ऐसेही न घडे । तें मी सांगेन तुज पुढे । पंचश्लोकी फाडोवाडें । विर्शद निवाडे परियेसीं ।। २८ ।। ___ अन्तरायैरविहतो यदि धर्म स्वहित । तेनापि निर्जित स्थान यथा गच्छति तच्छृणु ॥ २२ ॥ जेणें अंतरीय न पवती । ऐशी अच्छिद्र कम नव्हती । जरी जाली दैवगतीं । तरी स्थानप्राप्ती ते नश्वर ॥ २९ ॥ कर्म ज्या स्थानाप्रति जाये । तेथ गेलिया जें जें लाहे । तें ते सांगेन मी पाहे । सावध होयें उद्धवा ॥ ५३० ॥ इट्वेह देवता यजै स्वर्लोक याति याशिक । भुजीत देववत्तन भोगान् दिल्यान्निजार्जिताम् ॥ २३ ॥ पायोनि कर्मभूमी उत्तम । वर्णवरिष्ठ ब्राह्मणजन्म । ज्योतिष्टोमादिक करिती कर्म । नित्य काम्य अग्निहोत्र ॥ ३१॥ यी विद्या जाणती सकळ । कर्मकलापी अतिकुशळ । ऐसे सज्ञान मूर्ख केवळ । स्वर्गफळ चाछिती ।। ३२ ॥ जेणे पुण्ये मी न जोडे । ते पुण्य ह्मणता वाचा रडे । याज्ञिक विषयासक्त गाढे । स्वर्गभोगाकडे धांविन्नले ॥ ३३ ॥ यजूनि इंद्रादि देवासी । जेणे अतर पडे मजसी । त्या पावले स्वर्गलोकासी । दिव्य भोगासी भोगावया ॥ ३४ ॥ बहुती चघळिले जुने हाड । ते श्वान स्वलाला करी गोड । तैसे याज्ञिका स्वर्गकोड । स्वपुण्य गोड करिताती ॥ ३५॥ कां स्मशानवळीचे अन्न । कलहें श्वानशेष खाय श्वान । तैसाचि स्वर्गभोग जाण । शेष भोजन बहुताचे ॥३६॥ गोठीचे वेचून शुद्ध सुकृत । उच्छिष्ट भोग विकत घेत । याज्ञिक पवित्र झणवित । मोलें सेवित वहुशेप ॥ ३७॥ केवळ वायसाचे मांस । तेही श्वानमुखींचे शेष । मोले न मिळेचि बहुवस । तैसी रसस याज्ञिका ॥ ३८ ॥ स्वर्ग उच्छिष्ट बहुतांचे । त्यासी मोल वेचे अतिकप्टाचें । तेंही न मिळेचि धणीचें। भय पतनाचें अहनिशी ॥३९॥ स्वर्गभोग भोगिती देव । तेही ह्मणताति आमी निर्दैव । योज्ञिकांठायी थोर हाव । दिव्य वैभवभोगार्थ ।। ५४०॥ १ करितो २ कुन्नी ३ फजिती ४ देणार नाही ५ सागन होणे ६ उणीव निलकूल नाही असे ७ रोखठोक ८ सष्ट ९ विध, अडथळे १० नाहीशी होणारी ११जे निष्ठेमाजी १२ या नावाचा यज्ञ १३ तीन वेद १४ सर्व प्रकारच्या कर्मात १५ यशाने संतुष्ट करून १६ खर्गसभोगास १७ चाल्न आपल्याच लाळेने लड़यडवून १८ खगसुखाच प्रेम. १९ पदरच २० रसज्ञता, रस जाणण्याची शक्ति २१ यथेष्ट, २२ याशिकांत २३ खर्गातील ऐवयं भोगण्यासाठी