________________
अध्याय दहावा २४३ नियां सांग । उभय लोकीं सुखभोग । कर्मयोग भोगिती ॥ ४५० ॥ कमी ज्याची योग्यता । तो सुखभोगाचा भोक्ता । हेही न घडे गा सर्वथा । ऐक आता सागेन ॥५१॥ न देहिना सुख किंचिद्वियते विदुषामपि । तथा च दु स मृदाना वृथाहकरण परम् ॥ १८ ॥ कर्माचे जे तत्वतां ज्ञाते । तेही दुःखी देखो येथे । सुखी देखिजे मूसातें । जे कर्मात नातळती ॥ ५२ ॥ चुकोनि यज्ञपुरुपा अच्युतातें । अग्निहोत्री करिती यागातें । ते स्वकमचि त्याचे त्यांत । विपरीतार्थे फळतसे ॥ ५३ ॥ अग्नि तो तंव स्वरूप माझें । श्रुतिमंत्र ते तंब माझी बीजे । आणि होमद्रव्य जे जे । तेही माझें स्वरूप ।। ५४ ॥ ऐशिया मज सर्वगतातें । नास्तिक्य देवोनि निजचित्तें । अनीश्वरवादी करिती यागालें । तोचि त्यातें बद्धक ।। ५५ ॥ स्वक् धुवा प्रणीतापात्र । मांडूं शिकले कर्मतत्र । मज निजात्मयाचें चुकले सूत्र । तेचि अपवित्र तो यान।। ५६ ॥ सकळ है सर्वमुखीं। मज आपतसे यज्ञपुरुखीं । हे न मनिजे याज्ञिकी । बुद्धी अल्प की संकाम ॥ ५७ ॥ मज न अर्पिता जें सुकृत । तेचि जाण दुख दुरित । विपा नाव अमृत ह्मणत । तमे सुकृत सकाम ॥ ५८ ॥ माते न पवतां जो स्वर्ग । तो जाणावा उपसर्ग । तेथींचा भोग तो महारोग । मूढ उद्योग याज्ञिकां ।।५९॥ कमी कर्म विगुण होत । तेय स्मरावा मी अच्युत । नामें न्यून ते संपूर्ण होत । हे सामर्थ्य नामाचें ॥ ४६० ॥ तो मी अंगे आपण । याज्ञिका मागो गेलो अन्न । मज नेदितीच ते ब्राह्मण । कर्मठपण तें कर्माचें ॥ ६१ ॥ मज यज्ञपुरुपात सांडून । करिती इंद्रादिकाचे भजन । ते इंद्रादिक मजअधीन । कर्मवैगुण्य हे त्यासी ॥ १२॥ जे कर्म न करिती कृष्णार्पण । त्यांचे मळिण प्राक्तन । तेणें इहलोकी दरिद्रता जाण । पडे विघ्न परलोकी ।। ६३॥ चुकनिया निजमुख । सर्वागी खिरीसाकरेचा देख । लेपू देतां न बचे भूक । अधिक दुःश्व तेणे होय ॥ ६४ ॥ तैसे मज चुकवूनि यज्ञपती । जे यागातें आचरती। बाळविधये गर्भप्राप्ती । तैशी फळे येती त्या यागा ॥ ६५ ॥ कर्मउद्देशे द्रव्य मागतां । यज्ञफळ ने इष्यदाता । याज्ञिक तो राहे रिती । मी कर्ता हा अभिमानु ॥६६॥ जैसा बाद खिरीआंतु । चाटुवेचि खिरी वाढिजेतु । चाटू खरकटल्या सांडितु । भोके भोगितु परमान्न ॥६७ ॥ सरस ऊस घालिजे घाणा । रस पिल्लनि भरे भाणा । रिता चोपर्टी करकरी घाणा । ते गती जाणा याज्ञिकां ॥ ६८॥ तैसे याज्ञिक यज्ञ आचरत । द्रव्यदात्यासी ते फल होत । पशुहिंसा याज्ञिका प्राप्त । दोपी होत अमिमाने ॥ ६९ ॥ एवं कर्मकुशल याज्ञिक । यापरी ते भोगिती दु.ख । कर्म नेणती जे मूर्ख । ते परम सुख भोगिती ॥ ४७० ॥ नेणती कर्माच्या घडामोडी । परी माझी श्रद्धा पोटीं गौढी । तेणें उलयोनि दुःखकोडी । निजात्मगोडी भोगिती ७१।। काँ कर्मादरू नेणत । माझ्या ठायीं श्रद्धायुक्त । भाळे भोळे माझे भक्त । सुख अनंत पावले ॥७२॥ काय कर्म केले गोपाळी जे असङ मजसवे गोकुळी । भोगिली निजसुसनव्हाली । करोनि होळी कर्माची ॥७३॥ पाहता गोपिकाचे कर्म । कर्ममार्गी निद्य धर्म । पावल्या माझें परम धाम । जीवीं पुरुषो १ ईथर माहीं से झणणारे २ बाधक ३ यज्ञांतील उपकरण ४ भारमशानमार्ग ७ रिपयभोगेच्छा ६ बिन ७ सदोप ८ सता ९ फमाचा न्यूनपणा १० यार्ता ११ कोरडा १२ पळी, सार १३ पायस १४ मारें, पान १५ पळकर, मोठी. १६ कोट्यवधि दुर सिल तन आरममुर