Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० एकमाथी भागवत. सहस्रार्जुन यदु दुसरा । तेणें जनार्दनू तिसरा । शिष्य केला खरा कलियुगीं ॥ ४३० ॥ गुरुप्राप्तीलागी सर्वथा ।थोर जानार्दनासी चिंता । विसरलातीन्ही अवस्था सद्गुरु चिंतितां चिंतनी ॥ ३१ ॥ देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था । येणे जाले श्रीदत्ता । तेणे हातु माथां ठेविला ॥ ३२ ॥ हातु ठेविताचि तत्काळ । बोधू आकळिला सकळ । मिथ्या प्रपंचाचें मूळ । स्वरूप केवळ स्ववोधे ॥ ३३ ॥ कर्म करूनि अकर्ता । तोचि अकतात्मबोधु जाला देता । देही असोनि विदेहता । तेही तत्त्वतां आकळिली ॥ ३४ ॥ गृहाश्रमू न साडितां । कमरेखा नोलांडितां । निजव्यापारी वर्ततां । बोधू सर्वथा ने मैळे ॥ ३५॥ तो वोधू आकळता मना । मन मुकले मनपणा । अवस्था नावरेचि जनार्दना । मूर्छापन्न पडियेला ॥३६॥ त्यासी सावध करूनि तत्त्वतां । ह्मणे प्रेमा राहे सत्लावस्था । तोही गिळोनि सर्वथा । होयी वर्तता निजवोधे ॥ ३७॥ पूजाविधी करोनियां । जब जनार्दनू लागला पायां । तंव अदृश्य जाला दत्तात्रेया । योगमायांचेनि योगें ॥ ३८ ॥ कथेसी फांकली सर्वथा । तो कोपु न मनावा श्रोतां । प्रसगें गुरुविवंचना होता । मीही गुरुकथा बोलिलों ॥ ३९ ॥ मज तव चुकी पडिली मोटी । चुकूनि सांगितली गुरुगोठी । तेही संस्कृत नन्हे मराठी । वृथा चावटी न ह्मणावी ॥ ४४०॥ जो असेल गुरुभक्त । तो है जाणेल मनोगत । जो गुरुस्मरणे सदोदित । त्यासी हे हृद्गत कळेल ॥४१॥ ज्यांसी गुरुचरणी श्रद्धा गाढी । ज्यासी गुरुभजनी अतिआवडी । जिंही गुरुप्रेम जोडिले जोडी । ते हे गोडी जाणती ॥ ४२ ॥ ज्या सद्गुरूचे नाव घेतां । चारी मुक्ती बोर्ड विती माथा । मुक्ति नावडे गुरुभक्तां । नित्यमुक्ता गुरुचरणीं ॥ ४३ ॥ ज्याचे घेतां चरणतीर्थ । चारी मुक्ती पवित्र होत । पायां लागती पुरुषार्थ । धन्य गुरुभक्त त्रिलोकीं ॥ ४४ ॥ चैतन्य नित्य निराधार । निर्धर्मक निर्विकार । त्याचा केला जीर्णोद्धार । सत्य साचार जगद्गुरू ॥ ४५ ॥ सद्गुरुकृपा नव्हता नव्हती देवांची कथावार्ता । देवासी देवपी स्थापिता ।, सत्य सर्वधा सद्गुरू ॥ ४६॥ सद्गुरुकृपेवीण पाहीं । देवो असतूचि जाला होता नाही। त्यासी देवपणे ठेवूनि ठायीं । भजविता पाहीं गुरुरावो ॥४७॥ त्या सद्गुरूची कथा । चुकोनि जालो बोलता । थोर अपराधु हा माझे माथा । क्षमा श्रोता करावी ॥४८॥ प्रथा वोलिलो नाही जाण । जाले वोलावया कारण। दत्तात्रेयशिष्यकथन करिता जनादन आठवला ।। ४९ ।। मी जरी नाठवीं जनार्दनासी । परी तो विसरो नेदीच आपणासी । 'टें देतुसे आठवणेसी । अहर्निशी सर्वदा ॥ ४५० ॥ जिकडे जिकडे मी पाहें । तिकडे तिकडे तोचि होऊनि राहे । मी जरी त्याकड़े न पाहें । तेन पहाणेही होय तो माझें ।। ५१ ॥ जिकडे मी विसरोनि जायें । तिकडेचि तो येऊनि राहे । मी जरी त्याकड़े न पाहे । तें न पहाणे होये तो माझें ॥५२॥ घटु सांडूं पाहे आकाशासी । तंव आकाश न साडी घटासी । तेवीं जनार्दनु आझासी । अहर्निशी लागला ॥ ५३ ॥ मी न करी त्याची १ कमांची मर्यादा कायम ठेवून २ मठिण होत नाही मच्छित, बेशुद्ध ४ विलार फेला, कया सोहन मायेच विषयांतर करें ५ गुरस्मरण, गुरुसवर्धा विचार ६ सर्यकाल हर्पित ५ बांकरितात ८ जीवफा १जे सोचा भाधार असा ज्यार कोगाचा आधार नाही, १० धर्मरहित १५ सहर, १२ माली नाही तर १३ असरेला, भसूनही १४पढ़ेंच, भामहान