________________
२१० एकनाथी भागवत. होती क्षिती । तैशी लीन होऊनि प्रकृति । केवळ सुखमूर्ती उरलासे ॥ ६॥ ऐसा निरुपाधिकू केवळ । सुसस्वरूपानंदकल्लोळ । चिन्मात्रतेजे बहळ । नित्यनिर्मळ संदंश ॥७॥ तेणें ज्ञानस्वरूपें अनंते । सर्जनकाळ अवस्थेतें । स्रजिता जाला सृष्टीत । तेही निरुते अवधारी ॥८॥ केवलात्मानुभावेन स्वमाया त्रिगुणात्मिकाम् । सक्षोभयन् सृजत्यादी तया सूरमरिन्दम ॥ १९ ॥ तामाहुम्मिगुणव्यक्ति सृजन्ती विश्वतोमुखम् । यस्मिन्प्रोतमिद विश्व येन समरते पुमान् ॥ २० ॥ तेणे निजात्मकाळसत्ते । अवलोकिले निजमाये । ते क्षोभोनि तेथें । निजसूत्रातें उपजवी ॥९॥ तेचि बोलिली क्रियाशक्ती । करिती जाली त्रिगुणव्यक्ती । अहंकारद्वारा स्त्रजिती । जगउत्पत्तीत मूळ ॥ २१० ॥ तेथे गुणागुणविभाग । सुर नर आणि पन्नग । अध ऊर्ध्व मध्यभाग । रचिलं जग तत्काल ॥ ११ ॥ ब्रह्मांडी सूत्र जाण । पिंडू वर्तवी प्राण । पिंडब्रह्माडविदान । की जाण क्रियाशक्ती ॥ १२ ॥ जीव करावया ससारी । पडूविकार वाढवी शरीरी । पडूी त्यामाझारी । जीव संचारी सचरवी ॥ १३ ॥ एवढी ससारउत्पत्ती । करावया इची व्युत्पत्ती । यालागी नांवे क्रियाशकी । सांख्यसमती वोलिजे ॥ १४ ॥ या क्रियाशक्तिसूत्राचे ठायीं । जग ओतिलें असे पाहीं । आडवेतिडवे ठायींचे ठायीं । गौवून लवलाही वाढत ॥१५॥ हेढबंध देहाभिमाना । देऊनि संसारी करी जना । उपजवी अनिवार वासना । योनी नाना जन्मवी ॥ १६॥ पित्याचेनि रेतमेळे । रजस्वलेचेनि रुधिरवळे । उकडता जठराग्निज्वाळे । बहुकाळें गोठले ॥ १७ ॥ तेथ निघाले अवयवाकुर । करचरणादिक लहान थोर देह जाला जी साकार ।तरी अपार यातना ॥१८॥ जठरीगर्भाची उकडता उंडी।नानी दुःखाची होय पेडी" रिघे विष्ठा कृमी नाकतोडी। तेणें मस्तक झाडी पुरे पुरे ॥१९॥ थोर गर्भाची वेदना । आठवितां थरकांपू मना । भगद्वारे जन्म जाणा । परम यातना जीवासी ॥२२० ॥ ऐसे जन्मवूनि जनीं । पाली स्वर्गाच्या वंदिखानीं। का पचती अधःपतनी । देहाभिमानेकरूनियां ॥ २१॥ ऐसी सुखदुःखाची कडी । घालोनि त्रिगुणी दृढ वेडी । भोगवी दु.साच्या कोडी । तरी न सोडी अविद्या ॥ २२॥ हा थोर मायेचा खटाटोपू । तुज नाहीं भयकपू । तुवा दृढ धरोनि अनुतापू । अभिमानद' छेदिला ॥ २३ ॥ तुझी पालटली दिसे स्थिती । हृदयीं प्रगटली चिच्छती । मावळली अविद्येची रोती । बोधगभस्ति उगवला ॥ २४ ॥ जेथ छेदिला अभिमान । तेथे कामादि वैरी निमाले जाण । जेवी शिर छेदिल्या करचरण । सहजे जाण निमाले ॥ २५ ॥ यापरी तूं अरिमर्दन । बोलिलो ते सत्य जाण । ऐकोनि अवधूतवचन । सुससपन्न नृप जाला १ बहुत २ सत्यस्वरूपामुळ ३ सृष्टीचा उत्पत्तिकाळ ४ रारे, निश्चयाने ५ उत्पन्न होणे, आहेस दिसणे, वाढणे, परिणामाम पावणे, क्षीण होणे, मरण हे सहा विकार ६ जन्म, मरण, क्षुधा, तृपा, शोक व मोह, या सहा ऊमी मगजे लाटा ५ नात्मानात्मविचारान ८ ब्रह्मादातर्वता प्राण तो हाच श्रुति सागते "वायुवे गौतम सून वायुना वा गौतम सप्रेणाय च लोक परश्च लोक सर्वाणि च भूताी सहब्धानि." ९ देहाची य गीपणाची पछी गाठ घालन जन ससारी केरे १० नाना दुस होय दिंडी ११ जुही, भारी १२ योनिद्वाराी १३ माया १४ पश्चात्ताप, विरक्ति १५ रान १६ ज्ञानसूर्य १७ देहात्मबुद्धि नष्ट झाली हणजे कामादिक चिकार संपले देहाचे ठिकाणचा मीपणा स्वरूपाचे ठिकाणी पाचण्यास चार साधनाना युक्त व्हावे लागते ती सत्समागम, योगज्ञानामध्ये गति,गुरुभक्ति आणि वैराग्य या सलमान राई अज्ञान नाहीस होऊन स्वरूपाचे ठिकाणी मीपणा जातो ज्ञानेश्वरी अध्याय १५-४२१-२३