Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० एकनाथी भागवत उद्धवा ॥४॥धावांवोनी पायां पडे । धाय मोकलोनि रडे । मज सांडोनि तूंचि पुढे । कोणीकडे जातोसी ॥४४॥ मी नव्हें पायांवेगळा । क्षण नोसडी चरणकमळा । तुझे प्रयाण जी गोपाळा । अतकाळा मज काळु ॥ ४५ ॥ तुझी थोर लागली संवे । मज न्यावे आपणासवे । हंचि प्रार्थीतसे जीवेभावे । कृपा यादवे मज कीजे ॥ ४६ ।। तूं गरुडारूढ होसी । तेव्हा कृपेने वैसवी पाठीसी । सांडो नको हृषीकेशी । निजधामासी मज नेई ॥४७॥ सलगी दिधली जन्मवरी । अता कां त्यागिसी दुरीं । कृपाळुवा श्रीहरी । कृपा करी सर्वथा ॥४८॥ ह्मणसी मी निजकुळासी काळु । तो तुज केवी होईन कृपालु । हे न ह्मणे तूं दीनदयाळु । अतिस्नेहालु भक्तांसी ॥ ४९ ॥ तुझी कृपा भक्तांवरी । यालागी मी सलगी करी । माते उद्धरी श्रीहरी । झणे ससारी साडिसी ॥ ३५० ॥ तक विक्रीडित कृष्ण नृणा परममङ्गलम् । कर्णपीयूपमासाद्य त्यजत्यन्यस्पृहर जन ॥ १४ ॥ __ तुझी क्रीडा नानाखेळ । प्राणियांसी परम मंगळ । कर्णद्वारे वेल्हाळ । निजनिर्मळ सेविती ॥ ५१ ॥ तुझे कीर्तिश्रवणाचे आवडी । लागली कर्णपीयूपी गोडी । तेथ अमृताची चवी थोडी । हो अर्ध घडी न लागता ॥ ५२ ॥ ऐशी ऐकता तुझी कीर्ती । सवासना स्पृहा नासती । ते भक्तु तुज न विसवती । हृदयीं वाहती सर्वदा ।। ५३ ।। त्या तुज प्रत्यक्ष श्रीकृप्णासी । मज न साहवे वियोगासी । सवे लाविली आझांसी । सौजन्येसी स्वामित्वे ॥५४॥ शय्यासनाटनस्थानस्ताननीडाशनादिपु । कथ त्या प्रियमात्मान वय भत्तास्त्यजेमहि ॥ ४५ ॥ तूं तंव आमुचा स्वामी होसी। मज अधीसनी वैसविसी।मजवेगळे हपीकेशी। निजगुजासी तुज नाहीं ॥ ५५ ॥ अचाट कार्य पडे थोर । तेव्हा मज पुससी विचार । मी सागें जो जो मंत्र । तोतो साचार मानिसी ॥५६॥ जेव्हा भोजन करू रिघसी । माझें ताट ताटेसी माडिसी । जेवितां नाना विनोट करिसी । निजशेप देसी मजलागीं ॥ ५७ ॥ ब्रह्मादिका न लभे पंक्ती। तो मी जेवीं तुझिया पाती । शेषविभागी जी श्रीपती । केलें निश्चिती त्वा मज ॥ ५८ ॥ मातें धरोनिया हाता । एकला वैससी एकातः । ब्रह्मादिकाची विनंती । तुजप्रती मी सागें ॥ ५९ ॥ कळो नेदिता कोणासी । तुवा केले रासक्रीडेसी । ते गुह्य सांगोनि मजपाशी । गोकुळासी धाडिले ।। ३६०॥सेजेचे उठवूनि भीमकीसी । मज आपणाजवळ निजविशी। ते निद्रेचिया मुसासी । समाधि कायसी वापुडी ॥ ६१ ॥ ऐशिया तुझे सगती। रात्री भोगिल्या नेणों किती । त्या मज सांडोनि श्रीपती । जाणे निश्चिती करितोसी ॥ १२ ॥ वेलु न गमे चक्रपाणी । मज बोलावू धाडिसी रुक्मिणी । सारीपाटु आह्मी दोघी जणीं । एकासनी खेळिजे ॥ ६३ ॥ जेव्हा विहाँळिये निघसी । मज आपुले रथी वैसविसी । दोघा गमन एके रथेंसीं । आजि उचगलासी सांघौता ॥ ६४ ॥ जळक्रीडा करितां जळीं । करिता गोपिकासी राडोळी । तेव्हाही मी तुजजवळी । स्नानकाळी सर्वदा ॥ ६५ ॥ ऐसे सागो मी किती। तुजवेगळा जी श्रीपती । नाहीं जालो अहोरातीं। केवी भ्या अती सोडावे ॥६६॥ तूं स्वामी सखा सर्वात्मा । जीवाचा जीय पुरुपोत्तमा । तुझा वियोगु मेघश्यामा । केवीं ५ सयय २ साडिसी-लाग करू नकोरा ३ वामृती ४ घामनेमस्ट खत च्या अध्या आसगावर ६ सय, मालन ७ चाटेसी ८ पगतीला, बाला ९ पलगायर निजलेल्या १० रुक्मिणीरा ११ फेरफटका करण्यासाठी १० कटारलास १३ सगतीमा १४ विनोद, चहामस्वरी " निरा जाईल रांडोळा । आमा सागि रुक्मिया"-रुनिमणीभगवर प्रसग ६.५ उमरा अर्थ 'उपदास' गागे अध्याय १-२३५ पहा १२ तुजपासून दूर व्हावे