________________
१४० एकनाथी भागवत - भोग । शिवशक्तींचा सयोग । थापरी अभ्यासोनि योग । हा भजनमार्ग योग्यांचा ॥१३०॥ तुझी जाणाचया माया । एक भजो लागले तुझिया पाया । सर्वथा अतयं तुझी माया । देवराया श्रीकृष्णा ॥ ३१॥ माया न लक्षेचि लक्षितां । तोचि मायामोह जाला चित्ता। मग ते सिद्धीलागी तत्त्वता । चरण भगवंता पूजिती ॥ ३२॥ आणिकही एक पक्ष । तुज भजावया मुमुक्ष । जाले गा अतिदक्ष । अध्यात्मपक्षनिजयोगे ॥ ३३ ॥ आत्ममायेचा नाशू । करावया जिज्ञासू । निजात्मवोध सावकाश । अतिउल्हासू पूजेचा ॥ ३४ ॥ विवे. काचिया भावना । नित्यानित्याची विवंचना । करूनि आणिता अनुसधाना । सर्वत्र जाणा तूंचि तूं ॥ ३५ ॥ जे अनित्यपणे वाळिले । ते मायिकत्वे मिथ्या जाहले । मग चिन्मात्रक उरले । निर्वाळिलं निजरूप ॥ ३६॥ एवं पाहतां चहूकडे । तुझेचि स्वरूप जिकडे तिकडे । मग पूजिती वाकोडें । निजसुरवाडे सर्वत्र ॥ ३७ ॥ जे जे देखती जे जे ठायीं । ते ते तुजवाचूनि आन नाही । ऐसा सर्वत्र चरण पाहीं । ठार्याचा ठायीं पूजिला ॥ ३८ ॥ पर्युष्टया तव विभो वनमारयेय सस्पधिनी भगवती प्रनिपतिवच्छी ।। य सुप्रणीतममुयाऽहणमाददानो भूयारसदाऽदिरशुभाशयधूमकेतु ॥ २॥ ऐसे सर्वत्र तूते पूजिती । ते भक्त पढियते होती । त्याची पूजा तेही अतिप्रीती । स्वयं श्रीपती मानिसी ॥ ३९ ॥ रानीची रानवट वनमाळा । भक्ती आणनि घातली गळां । रमा साडोनि उताविळा । स्वयें भाळला माळेसी ॥ १४० ॥ भक्ती अर्पिली आवडी । ह्मणोनि तियेची अधिक गोडी । शिळी जाली तरी न काढी । अर्धघडी गळाची ॥४१॥ भक्ती भावार्थे अपिली । देव सर्वांगी धरिली । यालागी सुको विसरली । टवटवीत सर्वदा ॥४२॥ तिचा आस्वादिता गंधु । भावे भुलला मुकुदु । श्रियेसी उपजला झोपु । सव. तीसबंधु माडिला ॥ ४२ ॥ मज न येता आधी । भक्ती अर्पिली नेणो कधी । मी तरुण साडोनि त्रिशुद्धी । ते वृद्ध खादी वाहातसे ॥४४॥ देव नेणे भोगाची खूण । ती वृद्ध मी तरुण । परी तिशीच भुलला निर्गुण । गुणागुण हा नेणे ॥ ४५ ॥ मज चरणसेवा एकादे वेळा । हे सर्व काळ पडली गळा । मजहूनि स्नेह आगळा । नेला वनमाळा सर्वथा ॥४६॥ माते डावलूनि वेगी। हे वैसली दोही अंगी । इसी बोलो श्रीशाही । मजचिलागी त्यागील ॥ ४७ ॥ मज दीधली चरणाची सेवा । इचा मत्सरू किती सहावा । आपाद आवरिले यादवा । माझी सेवा हरितली ॥ ४८ ॥ मी कुळात्मजा क्षीरॉब्धीची। हे रानट रानीची । खादी वैसली देवाची । भीड भक्तांची ह्मणयूनी ॥ ४९ ॥ हे भक्तिवळे वैसली खांदी । कहीं नुतरेचि त्रिशुद्धी। रमा चनमाळेते बंदी। देपवुद्धी सांडोनी ॥ १५० ॥ ऐसी भक्ताची पूजा । तुज आवडे गरुडध्वजा। संप्रणीत भावो वोजा । चरणी तझ्या अपिल्या ॥५१॥ तो चरणधूमकेतु तुझा । आमुच्या पापाते नाशू वोजी । पुन पुन गरुडध्वजा । पापसमाजा निर्दळू ।। ५२ ॥ करिता चरणाचे वर्णन । न धोये देवाचे मन । पुढतपुढती चरणस्तवन । ध्वजलक्षण वर्णिती ॥५३॥ १ योगाचा जाणण्याची इच्छा करणारे ३ विचारास ४ टाकलं ५चिट्टप ६ शुद्ध केलेले ७ आवडीन ८ अवडते ९ टक्लन "मिया रस्मा । टावलोनि केली परौती'-ज्ञानेश्वरी अध्याय ९-४८० १० वैसविली ११ पायापर्यंत १२ इया देवा १३ हरण करून घेतली १४ क्षीरसागराची कुलयत कन्या १५ नत्रमावाने १६ स्वच्छ, निर्मर १७ चरणरूपी चूमोतु पापवासनाना जाटुन टामो १८ तेजान १९ तृप्त होत नाही