________________
एकनाथी भागवत. विज्ञाय शककृतमक्रममादिदेव प्राह महस्य गतविसय एजमानान् । मा भैप्ट भो मदन मारुत देवध्यो गृहीत नो बलिमशून्यमिम कुरुध्वम् ।। ८॥ इंद्रे केला अपराध । तरी नारायणासी न येचि क्रोध । बापु निजशांती अगाध । न मनी विरुद्ध कामादिकांचें ॥९३॥ न येचि कामादिकांवरी कोप । इद्रासही नेदीच शाप । नारायणाच्या ठायीं अल्प । कदा विकल्प नुपजेची ॥९४ ॥ अपकायावरी जो कोपला। तो तत्काळ को नागविला । अपकाया जेणे उपकार केला । तोचि दादुला परमार्थी ॥ ९५ ॥ अपकाऱ्यां उपकार करिती । त्याचि नांव गा परम शांती । ते शांतीची निजस्थिती । दावी लोकांप्रती आचरोनी ॥ ९६ ॥ परमार्थाची मुख्यत्वे स्थिती । पाहिजे गा परम शांती । ते शांतीची उत्कट गती । दावी लोकांप्रती आचरोनी ॥९७॥ भयभीत कामादिक । अप्सरोगण साशंक । त्यांतें अभयदाने सुख । देऊनियां देख नारायण बोले ॥९८॥ अहो कामवसतादिक स्वामी । कृपा करून आलेत तुही । तुमचेनि पदाभिगी । आश्रमभूमी पुनीत झाली ॥ ९९ ॥ तुमचें झालिया आगमन । अवश्य करावे आह्मी पूजन । हेचि आमुचें अनुष्ठान । कांही चळिदान अगीकारा माझें ॥१००॥ अवो अप्सरा देवकाता। तुझी भेवो नका सर्वथा । येथ आलिया समस्ता । पूज्य सर्वथा तुह्मी मज ॥ १॥ आश्रमा आलिया अतिथी । जे कोणी पूजा न करिती । त्याची शून्य पुण्यसंपत्ती । आश्रमस्थिती शून्य होय ॥२॥ तुह्मी नागीकारितां पूजन । कांहीं न घेतां वलिदान । गेल्या हा आश्रम होईल शून्य । यालागी कृपा करून पूजा घ्यावी ॥ ३ ॥ आश्रमा आलिया अतिथी । तो पूज्य सर्वास सर्वार्थी । अतिथी आश्रमी जे पूजिती । ते आश्रमकीती शिव वानी ॥४॥ व्याही रुसलिया पायां पडती । तेवी विमुख जाता अतिथी । जे वंदोनिया सुखी करिती । ते सुख पावती स्वानंदे ॥ ५॥ व्याही रुसलिया कन्या न धाडी । अतिथी रुसलिया पुण्यकोडी । पूर्वापर जे का जोडी । तेही रोकडी क्षयो पावे ॥ ६ ॥ वैकुंठी ज्याची निजस्थिती । तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती । जे आश्रमी अतिथी। पूजिती प्रीती ब्रह्मात्मभावे ॥७॥ ऐसे बोलिला तयांप्रती । परी माझी हे अगाध शाती । हेही नारायणाचे चित्ती । गर्व स्थिती असेना ॥८॥ ऐक राया अतिअपूर्व । असोनि निजशांतिअनुभव । ज्याच्या ठायीं नाहीं गर्व । तोचि देवाधिदेव निश्चयेंसी ॥ ९॥ जो नित्य नाचवी सुरनरासी । ज्या भेणे तप साडिजे तापसी । त्या अभय देवोनि कामक्रोधासी । आपणापासीं राहविली ॥११॥ इत्थं अवस्यमयदे नरदेव देवा सनीडनन्नशिरस सधुण तमूचु । नेतद्विभो स्वयि परेऽपिकृते विचित्र स्वारामधीरनिकरानतपादपभे ॥९॥ एवं अभय देत नारायण । स्वमुखें बोलिला आपण । तेणे कामादि अप्सरागण । लाज विरोन अधोमुख झाली ॥११॥ देसोनि निर्विकार पूर्ण क्षमा । श्रीनारायण हा परमात्मा । कळों सरले वसतादि कामा । त्याचाचि महिमा वर्णिती स्वये ॥ १२ ॥ ऐक नरदेवचक्रवर्ती । विदेहा सार्वभौमा भूपती । त्या नारायणाची निजस्तुती । कामादि करिती सदावेंसी ॥१३॥ जे सदा सर्वात छळिती । त्याही देसिली पूर्ण शाती । तेचि गातीची स्तुति करिती । नारायणाप्रती कामक्रोध ॥ १४ ॥ जेणे सतोपे श्रीनारायण । त्यासी कृपा १दाडगी, मोठी २ कुभावना ३ समर्थ, लाधला ४ परमार्थदीक्षा. ५ पविन ६ पूजा उपहारादि ७ पुण्याच्या कोटी ८ कटन धुकरे, कळों आलें राजधा