________________
एकनाथी भागवत. उन्मेखें श्रवणी जें जें काही ऐकें तें तेंनेटके अवधान तुझें ॥७॥रसना जें जें कांहीं चाखे। तें तें तुझेनि स्वादमुखें । वुद्धि जाणपणे तोखे । तेही अतिनिकें वेदकत्व तुझेनि ।। ८॥ मन मनपणे अतिचपळ । तेंही तुझेंचि आगिक बळ । विवेका विवेकु प्रबळ । अतिसोज्वळ तुझेनि ॥९॥वाचा जे जे काही वदे।तें बाचिकत्व तुझेनि शब्दें ।बोधु जेणे उद्बोधे। तो तुझेनि प्रवोधे प्रबोधू ॥ १०॥जागृती जागे तुझेनि हरिखें । स्वप्न स्वमा तुझेनि देखे । सुषुप्ती सुखावे जेणे सुखे । पूर्ण सतोखें तुझेनि ॥११॥ मी जे जे विषय भोगी।तें भोक्तेपण तुझे अंगीं । तुझेनि निजसयोगी। मीपणे जगी वर्तविशी मज ॥१२॥ माझें करूनि खावसूत्र । तूं झालासी सूत्रधार। हालवूनिया निजसूत्र । कर्मे विचित्र करविशी ॥१३॥ ऐशिया श्रीजनार्दना । जग चेतवित्या चिद्धना । कृपाळुवा जगजीवना । नमन श्रीचरणा तुझेनि तुज ॥ १४ ॥ थापरी मजमाजी तूं चाळिता । चाळकत्वे करविसी ग्रंथा। तेथे मी एक कवित्वकर्ता । हे जाणावी तत्वतां स्थूळबुद्धी ॥ १५ ॥ एका एकु जनार्दनी । की जनार्दनु एकपणीं । यथा पृथक नामांची लेणी । लेऊनि एकपणी मिरविसी तूं ॥ १६ ॥ जेवीं कनकाचे भूपण । की भूपणी कनक सपूर्ण । तेवीं एका आणि जनार्दन । एकत्वे जाण जनार्दनचि ॥ १७॥ ऐशी ऐकोन विनवणी । सद्गुरु तुष्टला सतोपोनी । तेथे भिन्नभिन्न सोसणी । न लगे निरूपणी करणे तुज ॥१८॥ जेवीं कापुरा आँगी झगटे । तेव्हांचि कापुरत्व खुंटे । सच्छिष्यासी सद्गुरु भेटे । तेव्हाचि फिटे भिन्नभेदू॥१९॥ जेणे फिटे भिन्नभेदू। तो श्रीभागवतीं निजबोधू । वसुदेवाप्रती नारदू । सांगती सवादू इतिहासाचा ॥२०॥ ज्या इतिहासाचा अर्थ । परिसतां प्रगटे परमार्थ । स्वानंदवोध हृदयात । श्रवणे सदोदित श्रोते होती ॥ २१ ॥ तंव श्रोते सतममुदावो।हणती केसा नैवलावो । सद्गुरुस्तमनी ब्रह्मभावो । साधिला आवो अभेदत्वें ॥२२॥ हे सद्गुरूची विनवणी । की ब्रह्मसुखाची खाणी । परिसता सप्रेम वोलणीं । रिझली आयणी सजनाची ॥ २३ ॥ या देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी । वोल नव्हती है स्पर्शमणी । लागता श्रवणी पालटे जीवू ॥ २४ ॥ यापरी श्रीभागवती । अनुपम अगाध स्थिती । ते कथेची सगती । लावी सुनिश्चिती अर्थावबोधे ॥ २५॥ ऐकोनि सतांचे वचन । गिरी वंदोनि त्याचे चरण । पुढील कथानिरूपण । श्रोती सावधान परिसावे ॥२६॥ येथें तृतीय अध्यायाचे अर्ता । निरूपितां तात्रिक भकी । भजावे आवडेल ते मूर्ती । रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला ।। २७ ।। देवो एकचि त्रिजगतीं । त्याच्या किती अवतारमूर्ती । जन्म कर्म अनेक व्यक्ती । हेंचि मुनीप्रति पुसतु ॥ २८ ॥ राजोवाच-यानि यानीह कर्माणि येथे स्वच्छन्दजन्मभि । चके करोति पर्ता वा हरितानि ब्रुमन्तु न ॥ १ ॥ मुनीश्वराचे अगाध ज्ञान । त्याहीवरी रमाळ निरूपण । तेणे रायाचे वेधले मन । प्रश्नावरी प्रश्न यालागी पुसे ॥२९॥ तो ह्मणे देवाधिदेवो हरी । स्वलीला कैसी जन्में धरी । १ मतोघे २ ज्ञातेपण ३ कळसूत्री बाहुरे ४ मदबुद्धि, जडत्व ५ विचार, वत्पा करणे ६ अमि कापुराची अमी गार पडताच कापुरपण नाहीसे होते, तस शिष्यगुरुचे प्रेम जमताच शिष्यपण माधपत ७भिन्नपण ८ आत्म ज्ञान ९ वल, आश्चर्य १० आकार "येथूनि रसा झाला आवो । रसाळपणाचा' (ज्ञानेश्वरी ०१-३३) ११ चित्तपत्ति, इच्छा "अवधागाचनि हात । यावे हदयााताते । हे रिशवितील आवणीते । राजनाचिये" (माने अ० ६-४९५) 'मायणी' चा अप येथे समुदाय, मेर। असाही केल्यास चारेल १२ वानी,