पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा. देहाँ । चाळक ईश्वरू आहे हृदयी । श्रद्धेनें भजतां त्याचे ठायीं । निजप्राप्ती पाहीं सहजें लाभे ।। ५७ ॥ जें जें आपण सेविजेते ते भगवन्मुखी पाविजे । येणें निजभजने पाविजे। जाण सहजे परमात्मा ॥ ५८ ॥ साडोनि देहींची अहंता । सकळ भोग ईश्वरू भोक्ता। ऐशी दृढ भावना भाविता 1 पाविजे परमार्था अपरोक्षसिद्धी ॥ ५९॥ देह जड मूढ अचेतन । सकळ भोगभोक्ता ईश्वरू पूर्ण । तेथ वाढवूनि देहाभिमान । भोगिती अज्ञान अनेक दुःखें ॥८६०॥ ते साडूनि देहअहता । हृदयस्था शरण जाता । पाविजे पूर्ण परमार्था । जाण तत्वता नृपवर्या ।। ६१ ॥ निःशेष साडिजे मीपण । याचि नाव हृदयस्था शरण ।तूं सहजे परब्रह्म परिपूर्ण । मिथ्या देहाभिमान धरूं नको ।। ६२ ॥ राया येणेचि कम जाण । तुटे कर्माचे कर्मबंधन । पाविजे पूर्ण समाधान । ते हे मुख्य लक्षण नृपनाथा ।। ६३ ।। आगमोक्त निजभजन । कर्मयोगाचे मुख्य लक्षण । ऐकता राजा समाधान । परमानंद पूर्ण निवाला ।। ६४ ॥ जव जव रायाचे पुरले कोड । तंव तंव कथा लागे गोड । अतिशयें श्रवपाची चाड । विशेष चाड योरावली ॥६५॥ राजा निवालेनि परमानंदें । सुखावलेनि निजचोधे । लाचावलेनि स्वानंद । पुढा प्रश्न विनोदै पुसेल ।। ६६ ।। उगे राहतांआपण उठून जाती मुनिगण । यालागी प्रश्नावरी प्रश्न । विचित्रविदान पुसतु ।। ६७ ।। स्वानंद लोधुली चित्तवृत्ती। इंद्रिये वेधली सुखस्थिती । राजा निवाला निश्चिती । तरी प्रश्नोती पुसत ॥ ६८॥ पसेल हरीचे अवतार । ते कथा सुंदर मनोहर । निरूपण अतिअरुवार । निजजिव्हार निववील ॥ ६९ ॥ त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर । कथाकौतुक संनागर । एका जनार्दनाचे किंकर उपानहधर सतांचे ॥ ८७० ॥ सत सजन कृपास्थिती । श्रीजनार्दन वरदमूर्ती पुढील कथेची उत्पत्ती । सागेन यथार्थी अथुनी ॥ ७१॥ श्रीभागवताचे राशीवरी । एकाजनार्दन केला मापारी। तो निजबोधाचे कुडवावारी । भरील वखारी श्रवणाच्या ।। ८७२ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसवादे मायाकर्मब्रह्मनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३॥ अध्याय चौथा. श्रीगणेशाय नमः॥ ॥ ओ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमने जीवत्व जीवा । नुरविसी तेथे देहभावा । कैसेनि रिघावा होईल॥१॥जीवे घेऊनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा । याहीवरी करविसी सेवा । हें लाघव देवा नवल तुझें ॥ २ ॥ जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेपरा । तो तूं रिघोनि मजभीतरा । माझिया शरीरा वागविली ॥३॥ शल मधुर ध्वनी गाजे । तो वाजवि त्याचेनि वाजे । तेवीं म्या जे जे बोलिजे ते ते बोलणे साजे तुझेनि ॥ ४ ॥ आता माझ शरीर जे चळे । ते तुझेनि आगि मेलें । कम निपजती सकळ । सत्ताव तुझेनि ॥५॥माझे देहीचे जे मीपण ते तूंचि झालासी आपण । तुझेनि प्राणे प्राण । माझाही जाण चले देवा ॥ ६ ॥ दृष्टी जे जे काही देखें । ते तं तुझेनि ज्ञान प्रत्यक्ष प्राप्ति कार बाटग ३ अायत चतुर ४ भरली, वेधली ५ मनोहर ६ हृदय, निज निर्धार ५मुदर पायतम जोडे धारण करणारे, सतपर्दी रमणार सताने दास नाधानी एका जमगात सतन्तन मारताना दादर आहे, "सत्त बानी हरिकीर्तना । त्याचे चाहिन मोचे वाहणा ' ९ माप घालणारा १. युडर गजे आठ पायल्याच माप अद्याप पन्हाडांत प्रकारांत आहे ही पायली झणजे पुणे माती अडीच शेर ११ नमन जीरजीचा १२ शिरकाव ११ कोशल्य १४ ताग १५ खागाविप संयोग १६ माराच्या दृष्टा, उदया।