Jump to content

पान:Samagra Phule.pdf/७७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय "अस्पृश्यांची कैफियत" ज्यांनी तृतीयावृत्तीत समाविष्ट केली त्यांनी प्रा. रायकरांचा नामनिर्देशही केलेला नाही. मग त्यांनी रायकरांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले त्यात काहीच नवल नाही. मात्र " महात्मा फुले : समग्र वाङ्मय" या ग्रंथाच्या केवळ तृतीयावृत्तीवर विसंबून राहणाऱ्या वाचकांची त्यामुळे फसगत होण्याची शक्यता त्यांनी लक्षात घेतली नाही. "अस्पृश्यांची कैफियत' या पुस्तकाचे कर्ते महात्मा फुले नसावेत असा निष्कर्ष काढल्यास तो चुकीचा ठरणार नाही. 000