Jump to content

पान:Samagra Phule.pdf/७७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ४ अस्पृश्यांची कैफियत "अस्पृश्यांची कैफियत" या नावाचे एक पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिले होते असे फुल्यांचे चरित्रकार पंढरीनाथ पाटील आणि धनंजय कीर यांनी म्हटले आहे. पंढरीनाथ पाटील यांनी फुल्यांचे चरित्र लिहिण्यासाठी जमवलेल्या साधनसामग्रीत 'अस्पृश्यांची कैफियत' चे अपुरे हस्तलिखित आढळले. ते प्रथम प्रा. सीताराम रायकर यांनी “पुरोगामी सत्यशोधक" त्रैमामिकाच्या [ वर्ष ५, अंक २, ३, ४] एप्रिल ते डिसेंबर १९८० च्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांचा "महात्मा फुले : समग्र वाङ्मय या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीत समावेश करण्यात आला. ज्यांनी “अस्पृश्यांची कैफियत” चा तृतीयावृत्तीत समावेश केला त्यांनी मुळात प्रा. सीताराम रायकर यांनी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना नेमकी गाळली. “अस्पृश्यांची कैफियत" जरी प्रा. रायकरांनी प्रथम प्रकाशात आणली तरी ती त्यांना जोतीराव फुल्यांनी लिहिलेली वाटत नाही हे प्रस्तावनेच्या अखेरीस त्यांनी तो लिहिला आहे यावरून स्पष्ट होते. प्रस्तुत आवृत्तीच्या संपादकाचेही प्रा. सीताराम रायकर यांच्या प्रमाणेच मत झाले असल्यामुळे "अस्पृश्यांची कैफियत" चा समावेश चौथ्या आवृत्तीत परिशिष्टात केलेला आहे. प्रा. रायकरांनी प्रस्तावनेच्या अखेरीस लिहिलेला मजकूर खालीलप्रमाणे :- मजकूर "अस्पृश्यांची कैफियत” नावाचे पुस्तक महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिले होते याबद्दल पाटील आणि कीर यांनी केलेल्या विधानांवर विसंबून प्रस्तुत पुस्तक महात्मा पुस्तक येथे फुले यांनीच लिहिले आहे असे म्हणणे धाष्टर्यांचे होईल. आम्ही हे अभ्यासकांच्या अवलोकनार्थ ठेवीत आहोत. आमच्या मते या पुस्तकाच्या पहिल्या भागात आर्यांच्या आगमनानंतर त्यांनी येथे काय केले, याबद्दलचा मजकूर फुल्यांच्या इतर लिखाणाशी तुलना करता बराचसा विसंगत वाटतो. पुस्तकातील पुनरुक्ती ही कंटाळवाणी व विषय पुढे कसा न्यावा या विवंचनेतून निर्माण झाल्यासारखी वाटते. फुल्यांच्या लिखाणात पुनरुक्ती खूपच आहे. पण एकच मुद्दा अनेक वेळा अनेक ठिकाणी मांडताना ज्या ठाशीवपणे आणि आक्रमकतेने फुले आपला मुद्दा मांडतात त्यांचा अभाव या पुस्तकात आढळतो. येथे आलेले शिक्षणाविषयक विचारही हंटर कमिशनपुढे फुल्यांनी केलेल्या निवेदनाच्या संदर्भात खूपच विसविशीत वाटतात. महात्मा फुले यांच्या नावावर जमा असलेले एक पुस्तक चिकित्सेसाठी आम्ही येथे प्रस्तुत करीत आहोत. एच-२२ ५०