पान:Samagra Phule.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० महात्मा फुले : समग्र वाङ्मय जोशाची स्त्री : तुम्हाला बरीच की हो कारणे देता येतात. विदूषक : कारणे देण्याला फारच श्रमच पडतात की नाहीं; कारण जिभेला तरी हालविली पाहिजे कां नकों? करवून, यांना जोशी : मग काय करावे आपण ब्राह्मणाचा असे केल्याशिवाय गुजारा तरी कसा होईल? विदूषक : बाबा तुम्ही रोजगारधंदा करा, म्हणजे तुमचा गुजारा (मांगमहाराचे फटसट बोलून घेतल्याशिवाय) फारच उत्तम रीतीने या जगात होईल. आता या सर्व ठकबाज्या सोडा; कारण पुढे मला तुमची बरी गत दिसत नाही. (इतक्यात जोशाचे जेवण संपलें, नंतर आचमन घेऊन, अंग व वस्त्र अंगाला भोवताली गुंडाळून, सोवळे खुटीवर टाकून, घाबऱ्या- घाबचाने धोतर नेसून, अंगरखा रस्त्याने चालतां चालतां अंगात घालून, सासुबाईच्या घरी जाऊन तिजजवळ सर्व जेवणाची वासलांत सांगून तुम्हाला घरी उद्यां कसेही करून तिने बोलावले आहे असे सांगून, कापडगंजात जाऊन, एक धोतरजोडा उधार जांगड म्हणून घेऊन, स्नेही वगैरे लोकांच्या भेटी घेण्यांत सुमारे रात्रीच्या दहा वाजविल्या. नंतर घरी येऊन स्त्रीस रुपये पावल्यांचे विचारून, कुणबी निजावयास आलेला पाहून, तीस शाबासकी देऊन, बिछान्यावर पडून सर्व रात्र झोप यथासांग घेतली. दुसरे दिवशी सुमारे दहा वाजेपर्यंत कुणब्याजवळून, सर्व बायका पोरानिशी, सोयऱ्याधायांनिशी काम घेऊन जोशाने यास असे सांगितले की आता तूं घरी जा, आणि आंघोळ कर, आणि तुझ्या बायकोला घेऊन, सुमारे बारावर एक वाजता येथें ये म्हणजे मी सर्व ब्राह्मणाकडून भोजन मारुतीच्या देवळी दक्षिणा देण्यांस घेऊन (आपण) जाऊं. नंतर तेथेच तुला त्याजकडून आशीर्वाद देववीन, असें म्हणताच कुणबी मोठा हर्ष पावून, घरी येऊन बायकोस सांगू लागला की, आतां सर्व झालें, परंतु एक आपण उभयतांनी बारावर एक वाजता देऊळी जाऊन आशीर्वाद घेतला म्हणजे झाले.) बाई : आता माझा जीव घोरानिराळा झाला बरे हो. बाईचा नवरा : घोरानिराळा होईना तर काय ? (इतक्यांत बाराची तोफ पडलेली ऐकून मोठी त्वरा करून, सुमारे साडे-बारा वाजता जोशाचे घरी जाऊन, पहातात तो त्याची नुकतीच पात्रे पडत होती. असे पाहून तेथेच बाहेरल्या बाजूला ओळचणीखाली थोडीशी सावली होती तेथे स्वस्थ सुमारे बारावर तीन वाजेपर्यंत दोघे उभयतां गिनगिनवाणी तिष्ठत बसली. इतक्यात सर्व मंडळींसहित जोशाची स्वारी भोजन करून उठली नंतर पानसुपारी खाऊन काही वेळ विसांवा खाल्यासारखे करून, जोशाने घरांत जाऊन एका पत्रावर या दोघांकरिता कांही शिजले अन्न घालून कुणब्याजवळ येऊन, उभा राहिला आणि असें त्यास म्हणाला की, 'हा प्रसाद आहे बरें, त्यातिकडे पलीकडे बसून स्वस्थ आणि सावकाश खा' नंतर दुरूनच त्याच्या पदरांत ते पात्र टाकले.