५६८ (६) महात्मा फुले : 'मग्र वाङ्मय ईश म्हणे आर्य परशरामास । वधी अर्भकांस ॥ क्षत्रीयांच्या ॥ १ ॥ दांभीक पेशवे पानपतीं जाती ।। पालथे पडती म्लेंछापुढें ॥ २ ॥ मर्द रावबाजी इंग्रजास भ्याला । गौप्रदानी झाला ॥ बिठूरास ॥ ३ ॥ धूर्त आर्य नाना सोंवळें दावीतो । गोऱ्यासंगें खातो ॥ जोती म्हणे ॥ ४ ॥ एका सूर्य सर्वां प्रकाशास देतो मानवासहीत प्राण्यांचें जीवन | सर्वां सूख देई जनकाच्या परी ॥ मानवांचा धर्म एकच असावा | एक चंद्र नित्य भ्रमण करीतो ॥ ॥ (७) उद्योगा लावीतो ॥ प्राणीमात्रा ॥ १ ॥ सर्वांचें पोषण ॥ तोच करी ॥ २ ॥ नच धरी दूरी । सत्यानें वर्तावा कोणी एका ॥ ३ ॥ ॥ जोती म्हणे ॥ ४ ॥ (c) सर्वां सूख देतो ॥ निशीदिनीं ॥ १ ॥ भरती आहोटी समुद्रास देतो ॥ जल हालवीतो ॥ क्षारांसह ॥ २ ॥ पाणी तेंच गोड मेघा योगें होतें । संतोषी करीतें ॥ सर्व प्राण्यां ॥ ३ ॥ मानवांचे साठीं बहु धर्म कसे ।। झालां कां हो पिसे ।। जोती म्हणे ॥ ४ ॥ (९) सर्वांसाठी एक वायु केला खास ॥ घेती श्वासोच्छवास ॥ प्राणीमात्र ॥ १ ॥ वृक्षवल्लीसह सर्वांचें जिवन ॥ करीतो पालन ॥ जगामाजीं ॥ २ ॥ वायुच्या योगानें हवा शुद्ध होती ॥ प्राण्या सूख देती ॥ निशीदिनीं ॥ ३ ॥ मानवांनों, तुम्ही ईशा नित्य भ्यावें ॥ सर्व सूखी व्हावें । जोती म्हणे ॥ ४ ॥ (१०) इराणी धाडस दंगेखोर बंड ॥ स्वाऱ्या त्या उदंड ॥ केल्या त्यांनीं ॥ १ ॥ बळीस्थानीं त्यांचें वरचस्व झालें । क्षेत्र स्थापीलें ॥ अतोनात ॥ २ ॥ आर्य अपभ्रंश इराण्यांचा झाला ।। दिमाखें म्हणाला || भट श्रेष्ठ ॥ ३ ॥ पाखांडेंही सारी वेद लपवीती ॥ जगालागीं भीती । जोती म्हणे ॥ ४ ॥ क्षत्रियांनो, तुम्ही कष्टकरी व्हावें ॥ नित्य मुलींमुलां शाळेत घालावें ॥ सार्वभौम सत्य स्वतः आचरावें ॥ (११) कुटुंबा पोसावें ॥ आनंदानें ॥ अन्नदान द्यावें ॥ १ ॥ विद्यार्थ्यांस ॥ २ ॥ सुखें वागवावें ॥ आर्य भट्टा ॥ ३ ॥ अशा वर्तनानें सर्वां सूख द्याल | स्वतः सुखी व्हाल ॥ जोती म्हणे ॥ ४ ॥
पान:Samagra Phule.pdf/६०९
Appearance