४४६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय 99 म्हणून त्यांच्या समजुती पाडल्या." धर्मसंस्कार म्हणजे पूजाअर्चा, होमहवन व आहुती, मूर्तिपूजन, नैवेद्यार्पण, भूतपूजा वगैरे सर्व मतलबी साधुंच्या हिताचे असतात, असे सांगून घोल्यांनी म्हटले होते, 'धर्मभोळेपण व धर्मवेड हा ग्रंथ वाचल्याने जाईल. सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकातील जोतीरावांच्या शिकवणीचे स्वरूप स्पष्ट करताना घोल्यांनी लिहिले होते, "त्यांचा लिहिण्याचा मुद्दा असा आहे, कीं एका ईश्वरास भजावे, सद्वर्तनाने वागावे, सर्वांनी बहीणभावंडाप्रमाणे वर्तावे, सर्व मनुष्याला सारखेच हक्क असावे. जातिभेद नसावा, स्त्रियांना व पुरुषांना सारखे हक्क असावे. "गुलामगिरी नामक ग्रंथरूपाची एक गदा उत्पन्न करून तिच्या बिनचुक तडाख्याने जोतीरावांनी बळीराजास फसवणाऱ्या वामनास आणि पृथ्वी नि:क्षत्रिय करू पाहणाऱ्या परशुरामास चीत केले, असेही घोल्यांनी अभिप्रायात म्हटले आहे. DOO
पान:Samagra Phule.pdf/४८७
Appearance