सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक जोतीराव आणि सावित्रीबाई या दांपत्यास मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी एका अनाथ अर्भकाचे तो पोटचा मुलगा असल्याप्रमाणे पालनपोषण केले. त्याचे नाव यशवंत असे ठेवण्यात आले होते. याच यशवंतराव फुल्यांनी जोतीराव २७ नोव्हेंबर १८९० रोजी मध्यरात्र उलटल्यानंतर कालवश झाल्यावर "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक" हे त्यांचे पुस्तक १८९१ साली प्रथम प्रसिद्ध केले. त्यांनी जोतीरावांचे एक छोटेसे चरित्र लिहून ते या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत समाविष्ट केले होते. पहिल्या आवृत्तीत यशवंतराव फुल्यांनी डॉ. विश्राम रामजी घोलें यांनी १ नोव्हेंबर १८८९ रोजी जोतीरावांच्या हस्तलिखितावर दिलेल्या विस्तृत अभिप्रायाचाही समावेश केला होता. "हे पुस्तक अर्धे छापले नाही तोच जोतीरावांना मृत्यूने गाठले” असे यशवंतराव फुल्यांनी प्रस्तावतेन नमूद केलेले आढळते. जोतीरावांनी हे पुस्तक कोणत्या परिस्थितीत लिहिले हे सांगताना यशवंतराव फुले म्हणतात, “जोतीरावांनी शूद्रादि अतिशूद्रास सुस्थितीत आणण्याविषयी अतोनात परिश्रम केले. या परिश्रमाने प्रकृतीचे भान फार बिघडून त्यांस पुढे पक्षघाताचा आजार झाला. रोग फार भयंकर असल्यामुळे त्यांस अनिवार त्रास भोगावे लागले. तथापि रा. ब. डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी फी न घेता अति परिश्रम केल्यामुळे त्यास एक महिन्यातच बरे वाटू लागले. थोडे बरे वाटू लागल्यावर निरोद्योगी राहणे इष्ट न वाटून त्यांनी शूद्रादि अतिशूद्रासह एकंदर सर्व मानवांच्या हितार्थ ग्रंथ रचण्यास प्रारंभ केला. लिहण्याचे मुख्य साधन जो उजवा हस्त तोच पक्षघाताने निरोद्योगी झाल्यामुळे त्यास थोडे दुःख झाले. तथापि ईश्वरेच्छा म्हणून धैर्य न सोडता आपल्या डाव्या हस्ताने व अत्यंत विचाराने "सार्वजनिक सत्य धर्म" नावाचे पुस्तक तयार केले.” ग्रंथाच्या छपाईसाठी आवश्यक त्या द्रव्याची तरतूद जोतीरावांचे परममित्र मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी केल्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होऊ शकले. जोतीरावांचे हस्तलिखित वाचून त्यावर अभिप्राय देताना विश्राम रामजी घोल्यांनी जोतीरावांनी केलेल्या कार्याचे मोजक्या शब्दांत सार सांगितले आहे. “त्यांनी धर्मप्रकरणी सत्यासत्य व कार्यकारणभाव यांचा शोध लावण्यास लोकांस सवय लावली, अमूक चाली बऱ्या किंवा वाईट यांचा न्याय त्यांपुढे मांडला, मूर्तिपूजेचे खंडण केले, एकेश्वरी धर्माचे मंडन केलें. धर्म, कर्म व व्यवहार त्यांत लोक नाडले जाऊ नयेत
पान:Samagra Phule.pdf/४८६
Appearance