Jump to content

पान:Samagra Phule.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय अंगावर थंडीवारा निवारणार्थ एक हातभरदेखील फडकें नाहीं. त्याचप्रमाणें त्यांचें खाण्याचीहि मोठी दशा आहे आणि आपण हा सर्व माल घेऊन गेल्यावर या बालकांची काय दशा होईल ? त्यांनी आपलें दीनमुख कोणापुढें पसरावें ? महाराज, आपले ठायीं दया, क्षमा, आणि शांती हे गुण मूर्तिमंत वास करीत आहेत. आपण दीनानाथ, दीनबंधु आहांत आणि त्याच गुणांमुळें आपणांस भूदेव म्हटलें आहे. याजकरितां या गरीब बालकांची तरी दया घेऊन त्यांचे पोटापुरतें कांहीं थोडेंसें धान्य ठेवा, अशी मी आपणांस हात जोडून, पायां पडून विनंती करीत आहे. तिचा अव्हेर करणें हें आपणांस सर्वथैव अनुचित आहे. ' 39 इतकें तिचें भाषण ऐकून महाराजांनी रागावून डोळे लाल करून म्हणावें कीं, 'काय गे मूर्खे, शूद्रीण होऊन तूं कां आम्हांस ज्ञान सांगतेस ? तुझे मनांत आम्ही आपले कर्ज सोडून द्यावें, मागूं नये. स्वस्थपणें आम्ही आपले घरी बसावें म्हणजे झालें !” हे त्याचे शब्द ऐकून बिचारीनें हुं चूं न करितां उगीच बसावें. त्याचप्रमाणें घरचे सर्व मनुष्यांनी त्याची विनवणी करावी. परंतु तो तिच्याकडेस लक्ष न देतां जो वसूल आपण आरंभलेला दुष्ट हेतु सिद्धीस न्यावा, म्हणून सर्व माल गोळा करून, होईल तो, रकमेतून वजा देऊन, बाकीबद्दल पुनः त्याचप्रमाणें दुष्ट क्रम चारपांच वर्षांपर्यंत चालला, म्हणजे त्या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याची फारच दुर्दशा होऊन जात असे. त्या एका लहान अशा सात-आठ रुपयांचे रकमेकरितां त्याचें सर्व शेत जाई, गुरेढोरे जात, विहिरीमळे जात आणि सरतेशेवटीं तोहि देशोधडी जाण्यास अथवा आपले प्राणत्याग करण्यास सिद्ध होई. असो. ह्या ब्राह्मण वगैरे सावकारांनी आपले या इंग्रज सरकारचे दयाळू राज्यांतहि त्या गरीब शूद्राजवळून व्याज मुद्दलासुद्धां पैसा जरी घेतला, तरी त्यांस धुळीस मिळवीत; तर स्वकीय राज्यामध्यें, त्यांस जेव्हां एक वर्ष पाऊस न पडल्यामुळे असा कर्ज काढण्याचा प्रसंग पडे, तेव्हां ते त्यांची काय दशा करीत असतील याची, सूज्ञ जनहो, तुम्हीच कल्पना करा. त्या वेळेस त्या सरकारांत फिर्याद वगैरे करावी लागत नसे. कारण त्यांचे घरांतच सरकार होतें. मनास वाटेल त्याप्रमाणें कुळास मारावें, झोडावें, त्याचा माल सर्व हिसकावून घेऊन जावा, त्याची बैलंढोरे विकांवीं, त्याचे माणसांचें हालहाल करावे, ते त्याचे प्राण जाईंतोपर्यंत पाहिजे तसे करीत. त्याचे डोक्यावर अथवा पाठीवर मोठें थोरले धोंडे देऊन त्यास भर उन्हामध्ये उभे करीत आणि खालून मिरच्यांचा धूर देत. त्याचे शरिराचे नाजूक भागास चाप लावीत व कोलदांडा घालून त्यास बेदम मार देत. सदरहूप्रमाणेंच त्या वेळचे सरकारचे ब्राह्मण कामगार करपट्टी वसूल करतेवेळीं त्यास नानाप्रकारचे जाच करीत असत.