Jump to content

पान:Samagra Phule.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४०० महात्मा फुले : समग्र वाङ्मय "पुण्यातील भालेकरांचे सुशिक्षणगृहाच्या व्यवस्थेविषयी लोकांचे मनात दुष्टग्रह भरविल्याबद्दल आमचा काही एक त्याच्याशी संबंध नसता आम्हावर विनाकारण त्याचे मालकांनी आणलेला आरोप दूर करण्याकरिता हे पुढील एका मुंबईच्या थोर गृहस्थापैकी एक पत्र अक्षरश: वाचकांच्या अवलोकनाकरिता सादर केले आहे. याप्रमाणे जर स्थिती असेल तर तिची सुधारणा होऊन आपले शूद्र जातीचे मुलांस खरोखरच सुशिक्षण मिळेल अशाबद्दल योग्य तजवीज ठेवतील अशी आमची त्यांस विनयपूर्वक प्रार्थना आहे. पाहिजेल त्याला लिहिता येईल की, वर नाव सत्सार आणि आत निंदा व मत्सर, परंतु वर सुशिक्षणगृह आणि आत कुशिक्षण असे असू नये म्हणजे बस आहे.' 57 DOO