या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
उपोद्घात हल्ली या देशांतील इंग्रज बहादराचे राज्याच्या प्रतापानें गांजलेल्या स्त्रियांस तुरळक तुरळक लिहितां वाचतां येऊ लागलें आणि तेणेंकरून आज हजारों वर्षांपासून आर्य धूर्त जनांकडून एकंदर सर्व स्त्रियांचा सर्वोपरी छळ झाला व हल्ली होत आहे, ही सर्व पुरुषांची ठकबाजी, स्त्रिया डोळ्यापुढें आणून मांडावी म्हणून या अंकांत थोडासा प्रयत्न केला आहे. यात कित्येक स्त्रियांच्या उपटसूळ मुलास एकदोन ठिकाणीं निक्षून लिहिलें आहे, याबद्दल एकंदर सर्व माझ्या मायाळू मायभगिनी मला क्षमा करोत, म्हणून त्या सर्वांस माझी करद्वय जोडून विनवणी आहे. दुसरा सलाम घ्या. 000 DOO