सत्सार अंक १ ३७५ सत्सार--१ चे ४ थे मलपृष्ठ जाहिरात बाहेर गांवचे मित्र-मंडळींस विनंति करण्यांत येते कीं सत्सार या पुस्तकाचा पहिला अंक किंमत ०१ आणा. टपाल खर्च ४ प्रतीस अर्धा आणा. गुलामगिरी किंमत ०१२ आणे ट. ख. ०१ आणा. छत्रपति शिवाजीचा पवाडा किंमत ०६ आणे ट. ख. ०॥ आणा. ही पुस्तके पुणे पेठ, जुना गंज, घर नं. ३९५ येथें रा. यशवंत जोतीराव फुले याजकडे विकत मिळतील. ता. १३।६।८५. जोतीराव गोविंदराव फुले जाहिरात सर्व लोकांस कळविण्यांत येते की मौजे वांगणी गावी मी भोळ्याभावीक शूद्रबांधवास आपले पायांचे तीर्थ दिले म्हणून कोणी थोर गृहस्थाने दीनबंधूत मजकूर छापविला आहे तो अजीबात खोटा आहे. याविषयी कच्ची हकीकत पुढे एकादे वेळी दिली जाईल. जोतीराव फुले नोटिस - रा. रा. कोंडजी रावजी पाटील, माळ्याचे कुरुळ, जिल्हा सोलापूर, यास देण्यात येते की आपण माझी पुस्तके अथवा त्यांची किंमत, उसने नेलेले पैसे, असुडाचा चौथा भाग हे सर्व आपण परत केल्यास मी होईन. ता. १३।६।८५. तुमचा आभारी समाप्त- जोतीराव फुले
पान:Samagra Phule.pdf/४१६
Appearance