Jump to content

पान:Samagra Phule.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेतकऱ्याचा असूड ३४३ राजपुत्रांच्या गळ्याला माकडाप्रमाणे दोरी लावून, साहेब लोकांचे बंगलीबंगली त्यांची धिंड मिरवून, रात्री त्यांना नाचतमाशांचे नादी लावून आपण त्यांच्या दौलतीची वाताहत करीत नसतील कशावरून ? " मी - " जो काळपावेतों आमचे शूद्र राजेरजवाडे शुद्धीवर येऊन आपआपल्या मुलाबाळांसह आपल्या पदरच्या शूद्र मानकऱ्यांस विद्वान करणार नाहींत, तो काळपावेतों ब्राह्मण कारभारी असें करण्याचें सोडणार नाहींत. यास्तव तशा गोष्टींचा येथे उच्चार करून कांहीं फायदा होणें नाहीं. शूद्र आपल्या कर्माप्रमाणे फळें भोगीत आहेत व त्याचप्रमाणे ब्राह्मण कारभारी आपआपल्या केलेल्या कर्माचीं कधीना कधी तरी फळें भोगतील. " बु.- " बरें तर, आतां मी येतों. " मी "आपली मर्जी, या राम राम. जो. गो. फु. पुणे तारीख ६ एप्रिल सन १८८३ ईसवी. -समाप्त- स. शो.स.स.