Jump to content

पान:Samagra Phule.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय शेतकरी बांधवांचे मुलांकरितां गावोगांव शाळा घालवून त्यामध्ये एकदोन विद्वान् करावयाचे होते ! अहो, यांच्यापेक्षा परदेशस्थ असून अन्यधर्मी भिक्षुक पाद्री हजार वाटेनें बरे म्हटले पाहिजेत का नाही ? कारण शूद्रादि अतिशूद्र लोक आज हजारों वर्षांपासून या ब्राह्मण लोकांच्या पाशांत राहून दिवस काढीत आहेत. त्यांना त्यातून मुक्त करण्यास्तव त्यांनी आपल्या मुलखांत ख्रिस्ती लोकांपाशी भिक्षा मागून त्या पैशांने येथें शिंदे, होळकर, गायकवाड वगैरे शूद्र राजेरजवाड्यांचे जातबांधवांस सरकारी शाळेतील ब्राह्मण विद्यार्थ्यांचे तोलाचे विद्वान केल्यामुळे, ते ब्राह्मण कामगारांचे बरोबर मोठ्या शेखीनें वकिलीची व सरकारी हुद्यांची कामे करीत आहेत. ह्यावरून त्यांना आतां मूळची आपली स्थिती कशी होती आणि हल्ली आपली स्थिती कशी होत चालली आहे, हे कळत नसेल काय ? परंतु शूद्र लोक किती हतभाग्य व किती असमंजस समजले पाहिजेत कीं, त्यांना या कामी एवढ़ें मोठे इंग्रज सरकारचें सहाय्य मिळूनही, या पाशांतून मुक्त होण्याची इच्छा न होता, हल्ली मिळालेले पोकळ वैभव कदांचित हातचें जाईल, या भीतिस्तव ब्राह्मण कामगारांचे पुढे हांजी हांजी करून एवढ्यांतच कृतार्थ मानून आपआपल्या डौलांत गुंग झाले आहेत. बु.- " असे जर आहे. तर आपण आपल्या शूद्र राजेरजवाड्यांकडे जाऊन त्यांनी आपल्या शूद्र बांधवांचे मुलांकरिता गांवोगांव शाळा घालून त्यांस विद्या द्यावी, म्हणून त्यांची प्रार्थना कां करीत नाहीं ? " मी " अहो महाराज, त्यांच्या दरबारांत ब्राह्मण कारभाऱ्यांचे इतकें प्राबल्य वाढलें असतें कीं, तेथे माझी गरिबाची दाद ते कशी लागूं देतील ? " बु.-" असें कसें म्हणता ? अहो, जेथें तुमच्या पुण्यांतील नाच्या पोरांच्या मागें तुणतुण्यावर झील धरून गाणें गाणाऱ्या कुशा धोंगड्यानें बडोद्याहून हजारों रुपये कमावून आणिले; आणि तशा ठिकाणी फक्त त्यांस त्यांच्या जातबांधवांच्या बऱ्याच्या दोन गोष्टी सांगण्यापुरती त्याजपाशीं तुमची दाद लागणार नाहीं, म्हणून म्हणतां हें कसें? " मी - " राजेसाहेब तमासगिरांचे छंदास लागावेत हा कारभाऱ्यांचा मूळ हेतु असतो. त्याप्रमाणें ते त्यांचे नादी लागले म्हणजे यांस त्यांच्या राज्यकारभारांत हात घालून आपला फायदा करून घेता येतो. त्याचप्रमाणें परभारें राजेसाहेबांकडून " युरोपियन " कामगारांस मोठमोठाल्या मेजवान्या देववितात व आमच्यासारख्यांच्या सल्ल्यावरून कारभारी लोकांचे नुकसान आहे, कारण, राजेसाहेबांनी शूद्र शेतकऱ्यांचे मुलांस विद्वान केल्यामुळे ते पुढे मोठमोठ्या हुद्यांची कामे करूं लागल्यास कारभाऱ्यांच्या ब्राह्मण जातबांधवांचे मुलांस नांगर हांकून कपाळी शेतीचा धंदा व चिखलमातीचीं कामें करण्याचें येईल का नाही बरें ? " बु.-" असा डावपेच ब्राह्मण लोकांत नसेल असें मला आजपर्यंत वाटत होतें. परंतु आज माझी खात्री झाली, यावरूनच बावा! हे धूर्त ब्राह्मण कारभारी शूद्र राजेरजवाड्यांची मुलें वयात आल्याबरोबर त्यांस राज्यकारभार चालविण्याचे ज्ञान नाही, म्हणून तूर्त राज्यकारभार देऊ नये, असें इंग्लिश सरकारास लिहिण्यास कमी करीत नाहींत, कारण तसे केल्यापासून आपली सरकारास हुषारी आणि राजपुत्रांची गाफली समजून आपण तेथील कारभारी होतांच, दिवसा तेथील