Jump to content

पान:Samagra Phule.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करण्याची गरज नाही

२४२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय कंटाळवाणे होईल असे खुद्द हंटरसाहेबांनीच एका खाजगी पत्रात भाकित केले आणि ‘“आपण लिहिलेल्या भागाची मांडणी अशी रीतीने करण्यात आली आहे की, त्यात आपले असे काही राहिलेले नाही' अशी कबुलीही त्यांनी दिली. (पहा : फ्रान्सिस हेन्री स्काइन यांनी लिहीलेले लाईफ ऑफ सर विल्यम विल्सन हंटर हे १९०१ साली प्रसिद्ध झालेले चरित्र : पू. ३२६) हंटर शिक्षण आयोगाच्या शिफारशी फुल्यांना समाधानकारक वाटल्या नाहीत. १८९१ साली प्रसिद्ध झालेल्या "सार्वजनिक सत्य धर्म" पुस्तकात तर जोतीरावांनी हंटरसाहेबास "हिंदूतील आर्य ब्राह्मणखेरीजकरून शूद्रादि अतिशूद्र, भिल्ल, कोळी वगैरे लोकांविषयी बिलकूल ज्ञान नाही म्हणून ते तसा वाचाळपणा करीत आहेत' अशी हंटरसाहेबांवर परखड शब्दात टीका केलेली आढळते. BOWFE E