पान:Samagra Phule.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेच्या ४४ व्या अंकात “ सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट " या मथळ्याखाली अभिप्राय देताना जोतीराव फुल्यांनी लिहिलेल्या “गुलामगिरी' पुस्तकाची टर उडवली. (पहा : निबंधमालेची १९१७ साली चित्रशाळेने काढलेली तिसरी आवृत्ती आवृत्ती, पृ. ४५७-४७३). त्यानंतर “दीनबंधू' या सत्यशोधक समाजाच्या मुखपत्राने जोतीरावांची कड घेऊन निबंधमालाकांवर टीका केली. या टीकेस निबंधमालेच्या चौथ्या वर्षाच्या अखेरच्या अंकात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी “दीनबंधु" या मथळ्याखाली उत्तर दिले. (पहा :१९१७ साली चित्रशाळेने काढलेली निबंधमालेची तिसरी आवृत्ती, पृ. ९२०-९२७). हे उत्तर देताना त्यांनी पुन्हा “गुलामगिरी” पुस्तकात जोतीरावांनी व्यक्त केलेल्या मतांचा उपहास केलेला आढळतो. विष्णुशास्त्र्यांनी लिहिले होते, “आमच्या शुद्र धर्मस्थापकांची तर कशी मौज आहे! त्यांस पुरते व्याकरणाचे व शुद्ध लिहिण्याचेही ज्ञान नाही. मि. फुले यांस सूचना अशी की, जर त्यांस आपल्या ज्ञातिबंधूची सुधारणा कर्तव्य असेल तर ती “गुलामगिरी सारखे ग्रंथ तयार केल्याने व जे आपणांहून सर्व प्रकारे श्रेष्ठ त्यांस नुसत्या शिव्या दिल्याने ती होणार आहे असे मुळीच नाही. 00 H -