पान:Samagra Phule.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

44 28 > 11 गुलामगिरी १२१ गुलामगिरी गुलामगिरी ' हे लहानसे पुस्तक आपण लोकहितार्थ केले असल्याचे जोतीराव फुल्यांनी त्यांच्या प्रथमावृत्तीतील (१८७३) मुखपृष्ठावर नमूद केले होते. हे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी “सत्यशोधक समाजाची" स्थापना केली. पुढे सत्यशोधक समाजाचा झेंडा मोठ्या थाटाने पुणे शहरातून मिरवून भटांच्या गुलामगिरीतून दीनांस मुक्त केल्याचे त्यांनी मोठ्या समारंभात जाहीर केले. या मिरवणुकीत जोतीरावांचे परममित्र आणि इमारतींच्या बांधकामाची कंत्राटे घेणारे मुंबईचे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्याचारू सहभागी झाले होते. १९११ साली रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी "श्री. जोतीबासारख्या आपल्या प्रेमळ मित्राचे अंशतः उतराई व्हावे व त्यांचे अल्पसे स्मारक करावे" म्हणून “ गुलामगिरी पुस्तकाची दुसरी आवृती प्रसिद्ध केली. या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत रामय्या अय्यावारूंनी म्हटले होते “ ब्राह्मणी धर्माच्या जडबेडीने जखडलेल्या गुलामांमध्ये विद्येचा प्रसार कमी असल्याने या पुस्तकाचा पहिल्या आवृत्तीचा खप व्हावा तसा झपाट्याने झाला नाही. तथापि, छापलेल्या सर्व प्रती संपून गेल्या. श्री. जोतीराव व त्यांचे मागून त्यांचे पुत्र यशवंतराव मरण पावल्याने दुसरी आवृत्ती छापण्याचे काम अंगावर घेण्यास कोणीच पुढे येईना. आपण प्रकाशित केलेल्या दुसऱ्या आवृत्तीबाबत रामय्या अय्यावारूंनी खुलासा केला होता, “ यात पूर्वीचा सर्व मजकूर कायम ठेविला आहे. त्यात कमीजास्त काही केले नाही. फक्त पूर्वीच्या भाषेतील दुर्बोधपणा, दूरान्वय वगैरे काढून शुद्धाशुद्ध पाहून सर्वांस चांगल्या रीतीने समजेल अशी तजवीज केली आहे." रामय्या अय्यावारूंनी परिश्रमपूर्वक तयार केलेली गुलामगिरीची ही दुसरी आवृत्ती विश्वसनीय व प्रमाण समजणे योग्य होईल असे वाटते. रामय्या अय्यावारूंनी प्रकाशित केलेली दुसरी आवृत्ती अवघ्या दहा महिन्यांतच संपली. मात्र, या काळात त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी श्रीमती रत्नम्माबाई यांनी “गुलामगिरी" पुस्तकाची तृतीयावृत्ती १९१२ साली प्रकाशित केली. दुसऱ्या आवृत्तीस जोडलेल्या जोतीरावांच्या अल्पचरित्राचा कर्ता कोण याबद्दल नामनिर्देश केलेला आढळत नाही. हे अल्पचरित्र बहुधा रामय्या अय्यावारूंनीच लिहिले असावे. तिसऱ्या आवृत्तीस जोडलेले जोतीरावांचे चरित्र नारायणराव नवल्यांनी पाठविलेल्या चरित्राच्या आधारे सुधारले असल्याचा स्पष्ट उल्लेख रत्नम्माबाई अय्यावारूंनी प्रस्तावनेत केलेला आढळतो. पहिल्या महायुद्धामुळे कागदाचे भाव वाढले व छपाईही महाग झाली. तरीही "गुलामगिरी' पुस्तकाची चौथी आवृत्ती रामय्या अय्यावारूंचे चिरंजीव केशवस्वामी यांनी १९२१ च्या सप्टेंबरमध्ये प्रकाशित केली. ही आवृत्ती दुर्मिळ झाल्यामुळे “गुलामगिरी' पुस्तकाची पाचवी आवृत्ती सत्यशोधक समाजाचे सरचिटणीस श्री. लक्ष्मणराव केशवराव विचारे यांनी १९६१ साली प्रसिद्ध केली. 1