पान:Samagra Phule.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मणांचे कसब हिंदुस्थानांत ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री कोण कोण व कसकसे अधिकारी कोठकोठे होते व ब्राह्मणांनी हा देश काबीज करून लढाईत मोड होऊन सांपडलेल्या लोकांस दास करून बाकीच्या उरल्या महाअरींतून परशुरामाने कित्येकांस देशोधडी करून बाकी उरलेल्या सर्व महाअरींस पाताळी घालून आद्यापि त्यांस कसे गांजीत आहेत याविषयी पवाडा. 9 सत्ता नऊ खंड । होती अखंड ।। 11 दाहावी तशीच काशीस ।। जपले बहुत एकीस ॥ गुणगंभीर ।। रणामधीं शूर । नेमिले प्रत्येक खंडास ।। खंडोबा नांव दिले त्यास || वीरप्रचंड ॥ उभे मार्तंड ॥ मुख्य केले काळबैहिरिस ॥ वागवी नऊ खंडोबास ॥ देश आभंड ॥ सुभे उदंड ।। योजिले पाहून खाशास ॥ मानिती सर्व नवलोबास ॥ मुख्य माहा सुभा' ।। पाठिशी उभा ।। कमी नाहीं खबरदारीस ।। दुय्यम काळबैहिरिस ॥ न्याय चौकशी ॥ सोपी सुज्ञाशी ।। नेमिले बहुत मदतनीस ॥ मुख्य नव खंडच्या न्यायास ॥ अनेक पायदळ ।। घोड्याचे बळ ।। कमी नाहीं तिरंदाजांस ।। भिडविले भाले खांद्यास ॥ राजनितीने ॥ लढती शरतीनें ।। झोंबती मल्ल ते युद्धास ॥ जपले बहुत एकीस ॥ १ ॥ RE हासोबा. नवखणची जाणाई